Submitted by kulu on 14 February, 2015 - 10:19
खरं तर ही कविता देण्याची हे योग्य स्थळ, वेळ न लायकी नव्हेच. पण कवितेपेक्षाही गायनाच्या सन्दर्भात असल्याने ही कविता मी इथे लिहीतोय. कदाचित याला काव्य म्हणुन काहीच मोल नसेल पण खुप भक्तीने लिहीलीय ही कविता मी!
गानसरस्वती
पवित्र हळवे सूर निराळे,
भैरवाची त्या जात कबिरी,
स्वरश्रुतींच्या हिंदोळ्यावर झुलत
निघाली आर्त किशोरी!
शांत मुद्रा मिटले डोळे,
तर हाती स्वरमंडल बाजे
दो बाजू दो तानपुरे अन
मध्ये शारदा जशी विराजे.
जिने साधुनी सख्य स्वरांशी,
स्वरा-स्वराला समूर्त केले,
दिव्य तिचा हा यमन ऐकण्या,
देवी -देवता उभे ठाकले!
जिने लाविता श्रुती बिभासी,
धैवतासही धैवत कळला.
तिने "सहेला रे" गातसा,
भूपाला गंधार गवसला!
सूर तिचे हे भरुनी राहिले,
अनंत कोटी विश्वांमधुनी,
राग-रागिणी स्वतःच म्हणती,
सरस्वतीच ही नच ही किशोरी!
- कुलदीप मोरे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुलदीप खरंच सुंदर लिहिलं आहेस
कुलदीप खरंच सुंदर लिहिलं आहेस रे, संगीताच्या सोबतीने तू कवितेच्या प्रेमात पडत चालल्याची ही सुलक्षणं आहेत
वा ! सुंदर
वा ! सुंदर
खूब भालो ! मस्तच रे..फारच छान
खूब भालो !
मस्तच रे..फारच छान उतरलीये कविता. भक्तिभाव ओतप्रोत भरलाय अगदी ! आणि धैवतासही धैवत कळला,
भूपाला गंधार गवसला... या अतिशय छान उपमा !!
लिहीत रहा.
भूपाला गांधार गवसला..!! क्या
भूपाला गांधार गवसला..!! क्या बात है! सुंदर!
भारतीताई खुप धन्यवाद! तु
भारतीताई खुप धन्यवाद! तु स्वतः इतकी सुंदर कविता करतेस, तुझा प्रतिसाद म्हणजे ग्रेटच
चैतन्य, जाई, के अंजली खुप खुप धन्यवाद!
वा कुलु, तुझ्यात हा गुणही
वा कुलु, तुझ्यात हा गुणही आहे. क्या बात है. सुरेख.
ओहो... अरे क्या बात है. कशी
ओहो... अरे क्या बात है. कशी सुरेख लयीत आहे...
भक्तीभाव... नक्की. पण कविता म्हणूनही उच्चं आहे, रे.
छान कविता. भक्ति पोचतेय.
छान कविता.
भक्ति पोचतेय.
सुरेख कविता!
सुरेख कविता!
कुलदीप, खूप आतून ओळी आल्या
कुलदीप, खूप आतून ओळी आल्या आहेत... भावनेनं पार ओथंबल्या आहेत! खूप छान!
सुरेख कुलु भारतीताई +१
सुरेख कुलु
भारतीताई +१
मस्त..!
मस्त..!
खूप सुंदर. किशोरीताई माझं ही
खूप सुंदर. किशोरीताई माझं ही दैवत. त्यांच्या गाण्या एवढ मला दुसर्या कोणाचच गाण आवडत नाही. त्यामुळे मनाला भिडली. .
छान लिहिली आहेस.. एखादी
छान लिहिली आहेस.. एखादी रागमाला म्हणून गाताही येईल, नव्हे तू तशी गात असशीलच अशी दाट शंका मला आहे.. त्यामूळे पुढच्या मैफिलीत कुलूला जोरदार आग्रह करावा हि ( इतरांना ) विनंति !
मस्त !!!
मस्त !!!
वा वा .. मस्त कविता.
वा वा .. मस्त कविता.
अंजु, शरद, अमेय, शोभना,
अंजु, शरद, अमेय, शोभना, मनीमोहोर, बी, लीलावती, जिज्ञासा, योग, दाद धन्यवाद!
दिनेश, मी नाही रे म्हणत रागमालेसारख पण आता तुझी आयडिया ढापुन बघतो तसं म्हणता येतं का ते !
वाहवा ! बहोत खुब ! खुप चांगली
वाहवा ! बहोत खुब ! खुप चांगली प्रतिभा लाभली आहे तुम्हाला. लिहित रहा.
क्या बात है!!!! मस्तच
क्या बात है!!!!
मस्तच रे..फारच छान उतरलीये कविता. भक्तिभाव ओतप्रोत भरलाय अगदी ! आणि धैवतासही धैवत कळला,
भूपाला गंधार गवसला... या अतिशय छान उपमा !!
लिहीत रहा.>>>>>>>>>>>>>>+१००००००
छान लिहिलयस कुलु..
छान लिहिलयस कुलु..
क्या बात है कुलु - खूपच
क्या बात है कुलु - खूपच सुर्रेख ...
महेश, जिप्सी, सायली, पुरंदरे
महेश, जिप्सी, सायली, पुरंदरे काका धन्यवाद!
कुलु, कविता पण फॉर्मात येत
कुलु, कविता पण फॉर्मात येत आहेत .
धन्यवाद निलेश!
धन्यवाद निलेश!
कुलु, नुसतीच लिवलीस.
कुलु,
नुसतीच लिवलीस. मेल्या... इतकी सुंदर कविता, गाउन तरी दाखव.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=erg2k7BOR_Q&feature=youtu.be
ही कविता मला अशी गाविशी वाटली.
कुलु.... "...खुप भक्तीने
कुलु....
"...खुप भक्तीने लिहीलीय ही कविता मी...." ~ हे फार सुंदररितीने मांडले आहेस तू. काव्याच्या व्याख्यांनुसार कविता लिहिण्याच्या मागे तू लागलेला नाहीस तर किशोरीताईंविषयी तुझ्या मनी असलेला प्रगाढ आदर आणि भक्ती यांचा मिलाफ हा होय. तो शब्दात बांधण्याचा प्रयत्न वाचल्यावर पद्यात ती भावना चांगली मांडू शकतोस असेच इथल्या प्रत्येक प्रतिसादकाला वाटत आहे...मला वाटते तुझ्या काव्यप्रतिभेला यापेक्षा अन्य कुठली पावती नकोच आहे.
नुसतीच लिवलीस. मेल्या...>>>>
नुसतीच लिवलीस. मेल्या...>>>> अनिलभाई मला चालच सुचेना
मामा कसली भारी प्रतिक्रिया
देव काका, थांकु. मस्त संगीतबद्ध केलीत कविता!
आता त्रितालात...थोडी
आता त्रितालात...थोडी वेगळी
https://www.youtube.com/watch?v=CT0iHzAQzAk&feature=youtu.be