आनंद

आनंद सिंचन

Submitted by दत्तात्रय साळुंके on 7 July, 2022 - 21:59

आनंद सिंचन

झिरमिर झिरमिर पानांमधूनी
थेंब कोवळे करती दंगा
धूवून जाता मलीन सारे
रस्तोरस्ती लाल गंगा

ओशाळ मनाचे धुवून गेले
आनंदी अंतरंग ओले
आत बाहेर इथे तिथे
ताथै ताथै सर बोले

ही थेंबाची जुनीच किमया
अभ्र मनाचे पोक्त फेकूया
रुजुन येऊ नव्याने दरवेळी
नवे कोंब नवी नव्हाळी

भिजली झाडे, भिजले वाडे
जुनाट भिंतीवर हरीत सडे
सृजनाचे सिंचन होता
रंग कळकट आपसूक झडे
© दत्तात्रय साळुंके
१-०७-२०२२

शब्दखुणा: 

बाकी अजून होते कित्येक श्वास माझे (गझल)

Submitted by गणक on 18 April, 2021 - 05:17

मी पहिल्यांदा एखादी गजल वृत्तात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुका असल्यास नक्की सांगा.
वृत्त : आनंद ( गा गा ल गा ल गा गा )

बाकी अजून होते कित्येक श्वास माझे !

वाऱ्यात दरवळू द्या आता सुवास माझे
ठेवून जात आहे खोटे सुहास माझे !

गावून गीत माझे शाबासकी तुम्हाला
माझेच ओठ बोले गाणे उदास माझे !

मांडून स्तूत खोटे "चेले" उदंड जगली
घटवून घेतले मी आयुष्य "मास" माझे !

वैऱ्यास ठार केले वाटे कुणी न बाकी
त्यांनीच घात केला जे आसपास माझे !

आशेत आदराच्या शाई लयास गेली
दरसाल फक्त झाले काव्य झकास माझे !

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३७. आनंद (१९७१)

Submitted by स्वप्ना_राज on 28 June, 2020 - 12:16

याला जीवन ऐसे नावं

Submitted by पशुपत on 12 July, 2018 - 02:24

माझा नोकरीच्या स्थळी जाण्या येण्याचा रोजचा प्रवास कंपनीने करार तत्वावर ठेवलेल्या खाजगी बस मधून होतो.
त्या अनुशंगाने या बस चालवणार्या चालकांशी रोज बातचित होते, माझा स्टॉप शेवटचा असल्याने...

शब्दखुणा: 

नॉस्टॅल्जिया ईदचा

Submitted by सई. on 25 June, 2017 - 08:46

मी मुस्लिम मोहल्ल्यात लहानाची मोठी झाले. घराभोवती पाच मशिदी होत्या. शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड, गंजी गल्ली, आझाद गल्ली, शिवाजी मार्केट, महानगरपालिका, जेल ते पार मटण मार्केट एवढ्या परिसरात पसरलेल्या. बोहरी समाजाची एक मशीद तर घराच्या अगदी समोर. त्यामुळे पहाटे पाच ते रात्री आठ, अशी नियमित अजान कानावर पडायची. तीही एकोनं. कारण सगळ्या मशिदींची बांग एकानंतर एक सुरू व्हायची. त्यापैकी काही अत्यंत अत्यंत सुरेल, ऐकताना ब्रह्मानंदी लागावी, इतक्या.

जणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका)

Submitted by गणेश पावले on 24 July, 2015 - 02:38

[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा. ]

*********************
balatkar-pidita1.jpgदुनियेचे जीवघेणे इशारे
आणि लचके तोडण्यास सरसावलेले हात
चौफेर वखवखलेली नजर
आणि अंग चोरून चालणारी ती…
दुनियेच्या खोचक कमेंट सहन करत
कानाडोळा करून, रस्ता कापणारी
थोडी घाबरलेली,
मनात असंख्य विचारांचं काहूर घेवून
एकटी घराबाहेर पडलेली ती….

विषय: 

आनंद.. !

Submitted by मनमानसी... on 18 March, 2015 - 06:02

रविवार सुट्टीचा दिवस , म्हणून सकाळी सकाळी पायीच फिरायला बाहेर पडले. कोकण एक्सप्रेस - कर्वे पुतळा अस करत मृत्युंजयेश्वर च्या मंदिरात गेले.

सकाळी कोणीच नव्हत मंदिरात. फक्त दोन भटजी, साफसफाई करणाऱ्या मावश्या आणि मी. शांतता भरून राहिली होती मंदिरात. एरवी कुणीना -कुणीतरी असतच. जोरात घंटा वाजवून आत शिरले , मनातले विचार पूर्णपणे बाजूला पडलेले आणि फक्त सुरेख सजावट केलेली पिंड दिसत राहिली.

शब्दखुणा: 

आनंदयात्री

Submitted by सुमुक्ता on 16 December, 2014 - 10:18

"आनंदयात्री मी आनंदयात्री" -- कधीतरी लहानपणी वाचलेली मंगेश पाडगावकरांची कविता मध्यंतरी पुन्हा एकदा वाचनात आली आणि शाळेतल्या न-कळत्या वयातला न उमगलेला कवितेचा अर्थ मनाला भिडला. विशेषतः कवितेचे शेवटचे कडवे.

हलके काढून कंटक पायींचे
स्वरांत विणिले सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.

नाम बडे और लक्षण खोटे!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 August, 2014 - 12:16

काही किस्से शेअर करतो, विथ डिसक्लेमर - नाव-संदर्भ बदललेले आहेत.

पहिला किस्सा क्रमांक १

नवीन जॉब, नवीन ऑफिस, नवीन कामाची जागा आणि नवीन सहकर्मचारी. प्रत्येकाची नव्याने प्रथमच ओळख होत होती. प्रत्येकाबद्दल पहिल्याच भेटीत काही ठोकताळे माझ्याकडून बांधले जात होते, मात्र त्यातील किती खरे अन किती खोटे ठरणार..., ये तो अब आनेवाला वक्तही बतानेवाला था.

पण अश्यातच मेंदूच्या टेंपररी मेमरी डिस्कवर ठसठशीतपणे कोरले गेलेले एक व्यक्तीमत्व म्हणजे प्रल्हाद सर!

Pages

Subscribe to RSS - आनंद