मित्रमंडळींच्या एका व्हॉट्सअॅप ग्रूपवर एकाने ताजमहालाचे स्वतः काढलेले काही अप्रतिम फोटो पोस्ट केले. आम्ही सारे फोटोंचं कौतुक करत असताना तो म्हणाला, ‘साडेचार तास रांगेत उभे होतो, खूप गर्दी होती’... ते वाचून माझ्या पोटात गोळाच आला...
गर्दी पर्यटनाचे आमचे एक-एक अनुभव डोळ्यांपुढे यायला लागले...
[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा. ]
*********************
दुनियेचे जीवघेणे इशारे
आणि लचके तोडण्यास सरसावलेले हात
चौफेर वखवखलेली नजर
आणि अंग चोरून चालणारी ती…
दुनियेच्या खोचक कमेंट सहन करत
कानाडोळा करून, रस्ता कापणारी
थोडी घाबरलेली,
मनात असंख्य विचारांचं काहूर घेवून
एकटी घराबाहेर पडलेली ती….
गावात माकडांची गर्दी बरीच झाली
माझी भविष्यवाणी आता खरीच झाली
बागेतली गुलाबी झाडे मलूल झाली
मीही तसाच झालो, तीही तशीच झाली
आव्हान देत होती ही जात देवतांना
स्वर्गात माणसांची चर्चा बरीच झाली
वाडे उभारताना झाडे जळून मेली
देवास मानवाची बुद्धी उगीच झाली
काळोख वासनांचा भारी मुजोर होता
बेधुंद लांडग्यांची नुस्ती सुगीच झाली
केल्या कितीतरी मी पायी बळेच यात्रा
कोटी उपासनांची भक्ती फुकीच झाली
मी भूतकाळ होतो, कोणी न भीक घाली
प्रीती कधी कुणाची माझ्यावरीच झाली ?