माझा नोकरीच्या स्थळी जाण्या येण्याचा रोजचा प्रवास कंपनीने करार तत्वावर ठेवलेल्या खाजगी बस मधून होतो.
त्या अनुशंगाने या बस चालवणार्या चालकांशी रोज बातचित होते, माझा स्टॉप शेवटचा असल्याने...
हे सारे मध्यम वयाचे तरूण असतात, साधारण पणे पुण्यालगतच्या छोट्या गावातले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. छोटेसे कुटुंब . अपरिमित कश्ट करण्याची तयारी. पहाटे ५ वाजता उठून PMT ने पुण्यात येवून पार्क केलेली बस घ्यायची. आमचे कर्मचारी घेत घेत कंपनीत पोहोचायचे. काहीजण तिथून पुढे दुसर्या कंपनीची किंवा शाळेची ट्रिप करायला जातात किंवा घरी जाऊन दिवसभर इतर शेती वगैरे कामे करून संध्याकाळी पर कंपनीत येवून पुण्याची बस ट्रिप करतात . बस पुण्यात पर्किंग मधे लावायची , PMT पकडून गाव गाठायचे. रात्री कमितकमी साडेआठ - नऊ वाजेपर्यंत !
बोलणे नेहेमी नम्र. सदा उत्साही आणि आनन्दी.
वयानुरूप अंगात रग ! पण पुण्यातल्या रस्त्यांवरच्या बेशिस्त रहदारीत डोके शांत ठेवून , आडव्या - तिडव्या येणार्या रिक्षा , मोटारसायकली , आणि Unpredictable स्त्रीवर्गाला शांतपणे माफ करत , उशीर झाला तर पगार कापला जाण्याचे टेंशन , चुकून सिग्नल मोडला तर पोलिशी खाक्याचे टेंशन, कुणाला धक्का लागला तर ते निस्तरण्याचे प्रसंगावधान , अशा विविध धारदार व्यवधानांची टांगती तलवार शिरावर धारण करून बस चालवणारे हे चालक खरेच स्थितप्रज्ञतेचे मूर्तीमंत चालते बोलते संतच म्हणावे लागतील.
सहज बोलताना कोणी त्याच्या आजारी आइचे दु:ख सांगतो , कोणी सिनीयर के जी तल्या त्याच्या मुलीला रोज सकाळी अंघोळ घालून तयार करून शाळेत सोडायला तिला बाबाच कसा लागतो हे अभिमानाने सांगतो , कोणी स्वतः ड्राइविंग करून , कर्ज घेउन स्वतःच्या एक - दोन बसेस चा वेगळा व्यवसाय जोडीने कसा करतो ... हे सांगतो.
हे सगळे मला सांगताना खरे तर sharing सोडून दुसरा कुठलाच हेतू त्यामागे नसतो.
ही जिद्द ; जीवन समरसून जगण्याची त्यांची मानसिकता , आव्हानांना सामोरे जाण्याची मूक धडाडी , आनंदी व्रुत्ती हे पाहून खरच मनात एक अनामिक आश्वस्तता निर्माण करतात...माझ्या चेहेर्यावर एक स्फुट स्मित मगे सोडून जातात .....
याला जीवन ऐसे नावं
Submitted by पशुपत on 12 July, 2018 - 02:24
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलय. अजुन सविस्तर
छान लिहिलय. अजुन सविस्तर लिहिले असते तरी चालले असते.