ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना २६
टहनीपर बैठा था वो...
नीचे तालाब था पानीका, और -
तालाबके अंदर आसमान था
डूबनेसे डर लगता था
न तैरा, न उड़ा, न डूबा
टहनीपर ही बैठे बैठे बिलाखिर वो सूख गया
एक अकेला शाखका पत्ता!
टहनीपर बैठा था वो...
नीचे तालाब था पानीका, और -
तालाबके अंदर आसमान था
डूबनेसे डर लगता था
न तैरा, न उड़ा, न डूबा
टहनीपर ही बैठे बैठे बिलाखिर वो सूख गया
एक अकेला शाखका पत्ता!
काही दिवसांपूर्वी २०१९ च्या दिवाळीतला लोकमतचा चुकून वाचायचा राहिलेला अंक वाचत होते. तेव्हा एका लेखात Langston Hughes नावाच्या अमेरिकन कवीच्या काही ओळी वाचनात आल्या:
How still,
How strangely still
The water is today,
It is not good
For water
To be so still that way
ह्या पावसाची एक काय भानगड आहे ते कळत नाही. आभाळ झाकोळून गेलं, भणाणा वारा सुटायला लागला, टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली की आतल्या आत मिटून बसावंसं वाटतं. एखाद्या खोलीत जोराने पंखा लावला की खोलीच्या कानाकोपर्यात दडलेल्या केरकचर्याने चोहो बाजूंनी बाहेर येऊन फेर धरावा तसं कुठलं कुठलं काय काय आठवायला लागतं. काही दिवसांपूर्वीचं, काही महिन्यांपूर्वीचं, काही वर्षांपूर्वीचं....कदाचित काही मागच्या कुठल्याश्या जन्मीचंही असेल. एकमेकांशी कुठलाही ताळमेळ नसलेल्या गोष्टी. मनाच्या कोपर्यात अस्ताव्यस्त पडलेल्या गोष्टी. सांधीकोपर्यात दडवून ठेवलेल्या गोष्टी.
माणसाचं मन ही काय अजब चीज आहे नाही? एकाच वेळेस इतकं सगळं कसं वाटू शकतं आपल्याला? 'भावनांचा कल्लोळ' ह्या तद्दन छापील वाटणार्या शब्दांचा खरा अर्थ आज हा पन्ना लिहायला बसल्यावर लागला. आधी 'प्रथमग्रासे मक्षिकापातः' ह्या न्यायाने मायबोलीची साईट ओपन होईना. झाली चिडचिड. मग लिहायला बसले तर इतकं काही लिहायचं असून शब्द सुचेनात. शेवटी लॅपटॉप बाजूला ठेवून बसले पाच-एक मिनिटं स्वस्थ. म्हटलं आजच लिहायचंय असं काही नाहीये. नाही जमलं तर बंद करून ठेवून देऊ. पण लिहायचं जमलं तर काय लिहिणार आहोत आपण?
१९६१ सालच्या ‘ससुराल’ ह्या चित्रपटातल्या एका गाण्याच्या ह्या ओळी. आजकाल त्याची वारंवार आठवण व्हायचं कारण म्हणजे आयुष्य – ज्याला तुम्ही आम्ही नेहमीच्या भाषेत ‘जगणं’ असं म्हणतो. तर मी आणि माझं जगणं ह्यांच्यात हा सवाल-जवाबाचा कलगीतुरा आजकाल भलताच रंगात आलाय. फरक एव्हढाच की आयुष्याने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर असावं अशी त्याची अपेक्षा आहे. मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला मात्र उत्तर म्हणून त्याच्याकडून एक नवा प्रश्न समोर ठेवला जातो.
मला Writer's Block आलाय. पण वेगळ्या तऱ्हेचा बरं का. लिहायला काही नाही अश्यातली गोष्ट नाही. लिहायला खूप काही आहे. पण खच्चून भरलेल्या पिशवीत गोष्टी एकमेकांत अडकून बसाव्यात तसं सगळं गुंतलंय मनात. अशी पिशवी उघडून आतलं सामान खेचून बाहेर काढताना जी चिडचिड होते तशी चिडचिड होतेय.
उम्रने तलाशी ली तो जेबोंसे लम्हे बरामद हुए
कुछ गमके, कुछ नम थे, कुछ टूटे
बस कुछ सही सलामत मिले
जो बचपनके थे
इतना क्यो सिखाये जा रही हो जिंदगी
हमे कौनसी सदियां गुजारनी है यहा
लम्हों की खुली किताब है जिंदगी
खयालों और सासोंका हिसाब है जिंदगी
कुछ जरुरते पूरी, कुछ ख्वाहिशें अधुरी
इन्ही सवालोंके जवाब है जिंदगी