मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.
जेवणखान आटोपून अंड्या दुकानात परतला अन पाहतो तर आपला गण्या लॅपटॉप उघडून त्यावर लागला होता. फेसबूकच दिसेल या अपेक्षेने नजर टाकली तर त्याचे "मीच तुझी रे चारोळी" नावाची मराठी वेबसाइट उघडून त्यातील कवितांचे रसग्रहण चालू होते. "तुला रं गण्या कधीपासून हा छंद?" या प्रश्नावर माझ्याकडे न पाहताच मंद स्मित देऊन तो आपल्याच कामात व्यस्त. दहा पंधरा मिनिटांनी त्यानेच मला आवाज दिला, "अंड्या, ही कशी वाटते बघ.. ऐक हं..
ऐन दुपारी.. नदी किनारी..
फेसाळलेल्या.. लाटांना पाहूनी..
तुझ्याच आठवणीत.. माझ्याच मनाने..
घेतली भरारी.. वगैरे वगैरे.. वगैरे वगैरे..
"अंड्याचे फंडे - २" कडे वळायच्या आधी "अंड्याचे फंडे -१" खाली दिलेल्या लिंकवर जाऊन क्लीअर करू शकता.
अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://www.maayboli.com/node/41484
घाईत असाल तर तसे नाही केले तरी चालेल, कारण दोन्ही लेखांचा आपसात काडीचाही संबंध नाही.
ती लिंक देण्याचे प्रयोजन वाचकांची सोय नसून स्वताच्या लेखाची जाहिरात हे आहे.
....................................................................................................................................................
नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला. आता त्या पाणीपुरीच्या गाडी कम स्टॉलवर "विठ्ठल शिंदे पाणीपुरीवाला, आमची कुठेही शाखा नाही" असे शुद्ध मराठीत लिहिले असले तरी विठठल भाऊंनी पाणीपुरीवाटप करायला हाताखाली एक भैय्याच ठेवला होता. कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना..
"प्रेम म्हणजे काय?" यावर धागा काढला तर हजारो पोस्ट पडूनही प्रश्न अनुत्तरीतच राहणार यात कोणालाही शंका नसावी.
प्रत्येकाची व्याख्या वेगळी आणि तरीही बरोबर असू शकते.
पण हे जे काही प्रेम आहे ते "एकाच वेळी" दोघींशी होऊ शकते का हो?
(मी मुलगा आहे म्हणून दोघींशी लिहिले, आपण यापुढच्या लेखात आपल्या सोयीनुसार "दोघींशी" किंवा "दोघांशी" असे काहीही वाचू शकता.)
इथे प्रेम म्हणजे मैत्री, ममता, वात्सल्य असे काही अपेक्षित नाही, तर स्त्री-पुरुष वयात आल्यानंतरचे होणारे प्रेम ज्याला प्रमाण मानून आपण आयुष्याचा जोडीदार निवडतो त्याला डोळ्यासमोर आणा.
काही जण म्हणतात, एकीवरच प्रेम कसे करणार...
कुणी पुसावे डोळे म्हणून आसवं येत नाहीत
का होतात सर्द पापण्या मलाच नाही माहीत
सरत नाही संध्याकाळ विरत नाही अंधारात
दिवस रात्रीच्या वेशीवरती हरवलेपण आत
कळले नाही कधी निसटला हातामधला हात
गेले सारे उरे निशाणी हातावरल्या रेषांत
सगळे आहे तरी रितेपण झाकळल्या मनात
काय मिळे हे सुख मलाही तु दिलेल्या कळांत
काळालाही काही कळेना हि स्तब्धता जगात
सुखावते अस्वस्थ वेदना, शांती तळमळण्यात
दुखावला जो उरी झेलुनी कट्यारीची पात
तोच जाणतो लपवुन अश्रु जगणे आनंदात
खूप दिवसांनी एक विचार करायला भाग पाडणारा चित्रपट पाहिला. ओह माय गॉड ..!!
वादाने उत्सुकता वाढवली होतीच, तसेच मी देखील सतत सोयीनुसार आस्तिक नास्तिक असे पारडे बदलत असल्याने मला या चित्रपटात मांडलेले विचार माझ्या विचारांशी मेळ खातात का? किंवा माझे विचार चुकीचे आहेत आणि ते बदलायला हवेत का? हे जाणून घ्यायची उत्सुकता जरा जास्तच होती.
दोन-चार दिवसांपूर्वीच हे लिहिणार होतो पण इथे मायबोलीवर असे चर्चेचे विषय कुठे मांडायचे ते शोधूनही न सापडल्याने इथेच टाकतोय.
बहुधा चालत असावे, कारण विषय निवडताना त्यात क्रिडा, क्रिकेट अश्या कॅटेगरीही सापडल्या.
पण जर इथे चालत नसेल तर कुठे हे कोणीतरी मला प्रतिसादात सांगा.
-------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------
काहीतरी लिहायला मला आवडते. लिहिताना मी विचार नाही करत की कोण वाचेल की नाही की कोणाला आवडेल की नाही. जेव्हा माझे मनातले विचार कागदावर उमटतात तेव्हा मला स्वताला बरे वाटते. एक समाधान मिळते. माझ्यापुरते ते खरे तर तिथेच संपते.
तरीही पण मग का ठाऊक नाही, लिहिले आहेच काही तर ते कोणालातरी वाचायला दिल्याशिवाय सार्थकी लागणार नाही असा विचार मनात येतो. असेच मग एका संकेतस्थळावर ते टाकले जाते. कधीकधी जेव्हा स्वताला असे वाटते वाह छान लिहिलेय, ईतरांशीही हे नक्की रीलेट होईल तेव्हा प्रतिसादांची उत्सुकता देखील असते.