परवाच्या दिवशी सकाळी सकाळी शेजारच्या जोशी वैनी चा पौडर मागायला आल्या होत्या. जोशी काका अगोदरच आमच्या घरातल्या सोफ्यावर पेपरसोबत पसरले होते. त्यांचा चहा नुकताच उरकला होता. अर्थात, आमच्याच घरचा. जोशी वैनी मात्र उसुलाच्या पक्क्या असल्याने त्या दुसर्याच्या घरची तयार चहा पित नाही. काका-वैनींची नजरानजर झाली तसा त्यांना त्यांचा घरगुती प्रॉब्लेम आठवला. त्यांचे आणि आमचे फैमिली रिलेशन आहेत, असेच ते समजत असल्याने त्यांनी लागलीच तो आम्हाला सांगायला घेतला..
अंड्याने तिसर्यांदा पलटून पाहिले. अन खात्री केली की ती पुतळाबाईच आहे. फसलोच जरा, पण अंड्याची फसायची ही काही पहिलीच वेळ नव्हती. बरेचदा असे होते ना, मोठमोठ्या मॉलमध्ये फिरताना, कृत्रिम चेहर्यांच्या गर्दीमध्ये, एखादा टवटवीत चेहरा उठून दिसावा. आपला चेहरा हरखून यावा, पण निरखून पाहता तो कपड्यांचे प्रदर्शन मांडण्याकरता उभारलेला मानवी पुतळा निघावा. एखाद्या मेनकेचा असल्यास एवढा कमनीय बांधा निर्जीव असल्याची हळहळ वाटावी अन मदनाचा निघाल्यास पुतळादेखील आपल्यापेक्षा रुबाबदार दिसतो कसा याची जळजळ वाटावी.
मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.
जेवणखान आटोपून अंड्या दुकानात परतला अन पाहतो तर आपला गण्या लॅपटॉप उघडून त्यावर लागला होता. फेसबूकच दिसेल या अपेक्षेने नजर टाकली तर त्याचे "मीच तुझी रे चारोळी" नावाची मराठी वेबसाइट उघडून त्यातील कवितांचे रसग्रहण चालू होते. "तुला रं गण्या कधीपासून हा छंद?" या प्रश्नावर माझ्याकडे न पाहताच मंद स्मित देऊन तो आपल्याच कामात व्यस्त. दहा पंधरा मिनिटांनी त्यानेच मला आवाज दिला, "अंड्या, ही कशी वाटते बघ.. ऐक हं..
ऐन दुपारी.. नदी किनारी..
फेसाळलेल्या.. लाटांना पाहूनी..
तुझ्याच आठवणीत.. माझ्याच मनाने..
घेतली भरारी.. वगैरे वगैरे.. वगैरे वगैरे..
"क्या दगडूशेट, सुबह सुबह लॉलीपॉप.."
ह्यॅं ह्यॅं ह्यॅं अंड्या, तू नाही सुधारणार बघ बोलत दगडूने शेवटचा झुरका मारत दातात खोचलेल्या बिडीचे थोटूक रस्त्याकडेच्या गटारात फेकले आणि अण्णाला कटींगचा आवाज देतच आमच्या दुकानात एंट्री मारली.
"अंड्याचे फंडे - २" कडे वळायच्या आधी "अंड्याचे फंडे -१" खाली दिलेल्या लिंकवर जाऊन क्लीअर करू शकता.
अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://www.maayboli.com/node/41484
घाईत असाल तर तसे नाही केले तरी चालेल, कारण दोन्ही लेखांचा आपसात काडीचाही संबंध नाही.
ती लिंक देण्याचे प्रयोजन वाचकांची सोय नसून स्वताच्या लेखाची जाहिरात हे आहे.
....................................................................................................................................................
रविवारची रटरटीत दुपार. कोण निघणार बाहेर त्या उन्हात. एकीकडे सारी दुनिया मस्त आरामात. आमचेच दुकान तेवढे खुले. म्हणून हा अंड्या तेवढा व्यस्त आपल्या कामात. अर्थात, दुकानात दुपारच्या वेळेला फारसे कोणी येण्याची शक्यता नसल्याने आराम हेच एक काम. पण भिंतीला तुंबड्या लाऊन बसेल तर तो अंड्या कसला. हल्ली फावल्या वेळेत माझे काही ना काही खरडवणे चालूच असते. दुकानाच्या दारात काऊंटरवर बसल्या बसल्या कधी मी आकाशातल्या पाखरांकडे बघून एखादी चारोळी रचतो, तर कधी समोरच्या चाळीतले एखादे पाखरू नजरेस पडल्यास त्याच कागदावर शेरोशायरी उतरते. पान भरभरून निबंध मी कधी शाळेतही लिहिला नव्हता.