अंड्या
बघतोय रिक्षावाला .. ग्ग वाट माझी बघतोय रिक्षावाला
ट्रेन तशी रिकामीच होती, जे फर्स्टक्लास म्हटलं की ओघाने आलेच. पण जरा जास्तच रिकामी बघून ‘च्याईला सेकंडक्लासच्या तिकिटाने पण काम झाले असते की राव’ अशी चुटपुट लागलीच. आता एक पैसा वसूल झोप घ्यावी असे ठरवले आणि वारा खिडकीचे गज कापत आत येईल अशी विंडोसीट पकडून लवंडलो. दुसर्याच मिनिटाला डोळा लागला आणि पाचच मिनिटांत उघडावा लागला. च्याईला, फर्स्टक्लासमध्ये पण भिकारी. ते देखील इंग्लिशमध्ये गाणारे, पेटीच्या जागी गिटार आणि तबल्याच्या जागी ड्रमसेट. झोपेच्या नादात चुकून ट्रेन ईंग्लंडला तर नाही ना घेऊन आलो. श्या, वैतागतच डोळे उघडले तर समोरच एक महाशय मांडीवरती लॅपटॉप उघडून बसले होते.
ए फ्यांड्री SSSS ईई ..
ए फ्यांड्री SSSS ईई ..
अंधारातून चाललेल्या एका सावलीला मी हाक मारली..
"ए अंड्या, XXXच्या, मर ना मेल्या.." तितक्याच उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया आली.
यारी दोस्ती मध्ये हे असे चालतेच.
फँड्री चित्रपट पाहिल्यापासून मी माझ्या दोन कृष्णवर्णीय मित्रांचे नामकरण फँड्री असे केलेय. पैकी हा एक. तितकेच स्पोर्टीगली घेणारा आणि पलटून एक कचकचीत शिवी घालणारा.
दुसर्याला मात्र काय माहीत, ते फारसे रुचले नाहीये. काल मात्र त्याला गाठून मी विचारलेच, "काय बे रताळ्या, मोठा झालास का? राग का येऊन राहिला?"
तर म्हणला कसा, "अंड्या, आमची जात एवढ्या पण खालची नाहीये रे ..... "
एफर्टलेस मॅगी नूडल्स - रोहीत शर्मा
६ नोव्हेंबर २०१३. भारत बनाम वेस्टईंडिज. पहिला कसोटी सामना. सारा प्रकाश झोत सचिन रमेश तेंडुलकर वर. कारण देखील तसेच. क्रिकेटच्या या देवाची अखेरची कसोटी मालिका. कारकिर्दीतली शेवटून दुसरी आणि १९९ वी कसोटी. पहिल्या दिवशी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारी वेस्टईंडिज २३४ ला गारद आणि भारत बिनबाद ३७. दुसर्यादिवशी सचिन बॅटींगला येणार म्हणून काही जणांनी चक्क सुट्ट्या टाकलेल्या. ज्यात एक मी देखील होतो, जो दुकान सोडून घरी थांबलेलो. सचिन बॅटींगला २ गडी बाद झाल्यावर येतो म्हणून घरी तशी सक्त ताकीदच देऊन ठेवली होती की दुसरी विकेट पडल्यापडल्याच मला उठवा.
बैल आहे साक्षीला ..
तिहेरी शतशब्दकथा - लाडका - लाडका - लाडकी
लाडका
तो सर्वांचाच लाडका होता.. तीन भावांत शेंडेफळ म्हणून आईचा लाडका.. आपले नाव हाच काढणार म्हणून बापाचा लाडका.. अभ्यासात हुशार म्हणून शिक्षकांचा लाडका.. आणि मित्रांच्या ग्रूपची, बोले तर जान होता.. शांत स्वभाव आणि लाघवी बोलणे, कामानिमित्त जिथे जाईल तिथे आपली छाप पाडणारच.. ऑफिसमधल्या बॉसचाही लाडका न झाल्यास नवलच..!!
एक दिवस पुढे आलेल्या पोटावरून हात फिरवत बायको म्हणाली, इथेही आईपेक्षा बाबाच जास्त लाडके होणार वाटते.. तो फक्त हसला, तशी पुढे म्हणाली, "आता माझ्या बाबांचाही लाडका जावई होणार आहेस, नातवंड देण्यात पहिला नंबर लावला म्हणून दिवाळीला तुला बाईक घेऊन देणार आहेत.."
जराशी गंमत
मध्यरात्र उलटून गेल्यानंतरची गाढ झोपेची वेळ, पण तरीही सदानकदा बिछान्यात चुळबुळत पडलेला सदा. इतक्यात डोळ्यासमोर अचानक लक्ष लक्ष काजवे चमकल्यासारखे झाले अन तो दचकून बिछान्यातच उठून बसला. पाहतो तर समोर एक तेजस्वी सिद्धपुरुष ज्याच्या शरीरातून निघणार्या प्रकाशाने बेडरूमच्या डिमलाईटच्या प्रकाशाला पुरते झाकोळून टाकले होते. आपण स्वप्नात तर नाही ना हे बघण्यासाठी म्हणून सदा स्वताला चिमटा काढायला जाणार इतक्यात समोरूनच आवाज आला, "अरे राजा, स्वप्न पडण्यासाठी आधी झोप तरी यायला नको का?" .... हे मात्र सदाला पटले, गेले कित्येक दिवस त्याला मनासारखी झोप लागली नव्हती..
लंडनचे भिकारी आणि स्लमडॉग मिलेनिअर
आता जब तक है जान बघतोय.. लंडनचे चकचकीत पॉश रस्ते आणि त्यावर गिटार वाजवत गाणे म्हणत पैसे गोळा करणारा शाहरुख.. येणारी जाणारी पब्लिक निव्वळ त्याला पैसेच देत नव्हती तर टाळ्या वगैरे ही देत होती.. मागेही शाहरुखच्या एका चित्रपटात असाच सीन होता, फरक इतकाच की त्यावेळी तो गाणार्या भिकार्याला टाळी देऊन पुढे गेला.. या उलट आपल्या कडे ट्रेनमधील गाणारे भिकारी निव्वळ इरिटेट करतात, अन पैसे मागायला पायाला येऊन हात लावतात तेव्हा कसली किळस वाटते म्हणून सांगू..
अंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल
अंड्याने तिसर्यांदा पलटून पाहिले. अन खात्री केली की ती पुतळाबाईच आहे. फसलोच जरा, पण अंड्याची फसायची ही काही पहिलीच वेळ नव्हती. बरेचदा असे होते ना, मोठमोठ्या मॉलमध्ये फिरताना, कृत्रिम चेहर्यांच्या गर्दीमध्ये, एखादा टवटवीत चेहरा उठून दिसावा. आपला चेहरा हरखून यावा, पण निरखून पाहता तो कपड्यांचे प्रदर्शन मांडण्याकरता उभारलेला मानवी पुतळा निघावा. एखाद्या मेनकेचा असल्यास एवढा कमनीय बांधा निर्जीव असल्याची हळहळ वाटावी अन मदनाचा निघाल्यास पुतळादेखील आपल्यापेक्षा रुबाबदार दिसतो कसा याची जळजळ वाटावी.
अंड्याचे फंडे ५ - शर्यत
मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.