गंमत
'एका मुलीची' गंमत
छोटंसं टुमदार गाव ! अगदी खेडं नाही आणि शहर नाही. वेळ सायंकाळची. सोनेरीकेशरी प्रकाश सर्वत्र पसरलेला. गावातून जाणारा एकमेव मध्यवर्ती डांबरी रस्ता. लहान मुले शाळेतून उड्या मारत,पाठी दप्तर टाकून किलबिलत घरी जात आहेत. वर आकाशात कावळ्यांची देखील शाळा सुटली आहे. त्यांची विजेच्या तारेवर कावकाव चालली आहे. बगळ्यांच्या माळा शांतपणे उडत आहेत. रस्त्याच्या कडेने छोट्या झुडुपांवर चिमण्यांची चिवचिव सुरू आहे. एका कडेने शिस्तीत गायवासरे लगबगीने शेतातून घरी जात आहेत. त्यांच्या गळ्यातील घंटा वाजत आहेत. त्याचवेळी दूरवर देवळात घंटानाद होत आहे.
प्रेमा तुझा गंज कसा?
'हॅलो! कोण बोलतंय?'.. राजेशनं आवाज बदलून बबिताचा फोन घेतला.
'हॅलो! मी बबिता बोलतेय! राजेशला फोन द्या जरा!'
'सॉरी मॅडम! पण राजेश सर प्रचंड कामात आहेत. काही मेसेज आहे का? ते नंतर फोन करतील'.. बबिताला राजेशकडच्या या नवीन असिस्टंटने थोडं संभ्रमात टाकलं खरं पण लगेचच तिची पेटली.
'राजेsssssश! यू ब्लडी प्रिक! हौ कुड यू?'
'हाsssssय बब्बड!' .. राजेशनं आवाजात खोटं खोटं मार्दव आणलं.
'अरे हाय काय म्हणतोस? स्टुपिड!!'.. बबिताचा चढलेला सूर राजेशला अपेक्षितच होता.
'हाय नाहीतर काय बाय म्हणू?'.. विनोद करून ताण सैल करायच्या प्रयत्नाला यश मिळालं नाही.
ठरविले अनंते
(टीपः हा लेख मायबोलीच्या २००८ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता तो इथे परत टाकतोय. त्याला ३ कारणं आहेत. १) मायबोलीच्या काही दिवाळी अंकामधले लेख बघताच येत नाहीत सध्या! त्यात २००८ चा पण आहे. २) २००८ साली दिवाळी अंकातल्या लेखांवर प्रतिक्रिया देता येत नव्हत्या. त्यामुळे मला हा लेख लोकांना कसा वाटला ते कधीच समजलं नाही. ३) कॉपी-पेस्ट करणं हा प्रत्येक कोडग्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. )
आमचा ठराव
आम्हीच आमुच्या काळजाशी
भलता ठराव केला
हाती जे जे लागेल ते ते
वाचायचा सराव केला
खरडले काही बाही अन्
शब्दांचा भराव केला
सेट फायर टू द रेन - क्षणाक्षणाची गंमत!
आज संध्याकाळी काम संपल्यावर चालता चालता लहर आली, म्हणून सहज काहीतरी चघळायला घ्यायला दुकानात घुसलो. शेंगदाणे, चॉकलेट असे काहीतरी घेणे माझ्याकडून बरेचदा होते. माझ्या नेहमीच्या स्टोरमध्ये गर्दीही फार नसते. आजही नव्हती. उगाच २-३ जण माझ्यासारखीच काहीतरी सटरफटर खरेदी करायला आले असावेत. काही विद्यार्थी, काही कामावरचे लोक ... पूर्वी एकांकिकेत काम करताना पार्श्वभूमीवर काही 'नेहमीची मंडळी' वातावरण निर्मिती करायला इकडून तिकडे जात असायची तसाच सगळा माहौल होता एकंदरीत.
जराशी गंमत
मध्यरात्र उलटून गेल्यानंतरची गाढ झोपेची वेळ, पण तरीही सदानकदा बिछान्यात चुळबुळत पडलेला सदा. इतक्यात डोळ्यासमोर अचानक लक्ष लक्ष काजवे चमकल्यासारखे झाले अन तो दचकून बिछान्यातच उठून बसला. पाहतो तर समोर एक तेजस्वी सिद्धपुरुष ज्याच्या शरीरातून निघणार्या प्रकाशाने बेडरूमच्या डिमलाईटच्या प्रकाशाला पुरते झाकोळून टाकले होते. आपण स्वप्नात तर नाही ना हे बघण्यासाठी म्हणून सदा स्वताला चिमटा काढायला जाणार इतक्यात समोरूनच आवाज आला, "अरे राजा, स्वप्न पडण्यासाठी आधी झोप तरी यायला नको का?" .... हे मात्र सदाला पटले, गेले कित्येक दिवस त्याला मनासारखी झोप लागली नव्हती..
गंमत,गीत
संत्री,केळी,चिक्कू, पॊपई,
बाबा किंवा आणते आई.
खाण्याची मग होते घाई,
अननस,खरबूज,लाल कलिंगड,
कापल्याविना खायला अवघड,
मज्जा ऎका-नको धडपड
कशात असतात सांगा फोडी?
बिया सुद्धा लहान-मोठ्या
रंगरुपेरी, लाल अन् काळ्या,
दाखवा त्यांना कचरापेटी,
साल केळिचे नक्की टाका-
पडाल घसरुन-रडाल धसकुन
पावसाची गंमत
पावसाच्या निमित्ताने माझीच एक जुनी कविता. अलेक पदमसीच्या घराच्या खिडकीतून पाउस बघताना सुचलेली.
-----------------------------------------
तिची एक छोटीशी गंमत आहे.
तिने स्वत:च गुंफलेली,
स्वप्नाळू डोळ्यांनी कायम बघितलेली.
पाउस येतो ना तेव्हा ती पावसाकडे बघते,
आजूबाजूच्या भिंती
अलगद विरघळून जातात,
सगळेच आकार धुसर होतात,
तिचा कणनकण पाऊस पिऊन घेतो,
हळू हळू पाऊसच होत जातो,
शेवटी तीही विरघळून जाते,
पावसाच्या थेंबासारखी,
अम्लान, अनावृत.
गंमतीची गोष्ट
मी लिहायचं
तुम्ही नावाजायचं
मी आनंदायचं
परत लिहायचं
हा आपलातुपला गंमतनाच!
नाचातली गंमत पळून जाताना पाह्यली पर्वा.
लिहिण्याचा हात धरून पळून गेली.
खूप विनवलं तिला थांब म्हणून.
पण ऐकेना.
तिचं टुमणं एकच
आळस सोड कष्ट कर
कसं जमावं?
जातेस तर जा बाई, मी कोण अडवणार तुला!
पण शक्य असेल तर लिहिण्याला सोड.
'त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय लिहिणं
कल्पना तरी कशी करू शकतेस तू?'
गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!!
गेलीच निघून
