आमचा ठराव
आम्हीच आमुच्या काळजाशी
भलता ठराव केला
हाती जे जे लागेल ते ते
वाचायचा सराव केला
खरडले काही बाही अन्
शब्दांचा भराव केला
आम्हीच आमुच्या काळजाशी
भलता ठराव केला
हाती जे जे लागेल ते ते
वाचायचा सराव केला
खरडले काही बाही अन्
शब्दांचा भराव केला
गझल विडंबन
----------------------------------------------------------------------------
एवढे मी टंकले की, वाचणेही शक्य नाही!
बेगडी आंतरजालावरी ह्या मज थांबणेही शक्य नाही!!
वैवकुंनी आजवर त्याच्या परीने खूप केले....
आज पर्यायी परंतू शेर देणेही शक्य नाही!
एकटे गाठून मजला घेरले सा-या वाचकांनी....
या बिचार्यांना तसे समजावणेही शक्य नाही!
जे तिन्हीत्रीकाळ असती चोवीशीत वेढलेले;
हुंदके ललितातले त्यांचे टाळणेही शक्य नाही!
वाचक नाहीत, मते पिंकणारे थुंकबंधू!
संकेतस्थळाबाहेर त्यांना गाठणेही शक्य नाही!!
गझल विडंबनाचा तिसरा प्रयत्न
---------------------------------------------
अशी अचानक तंबोर्यासह आली ऐकू गाणी
थरथरली धरणी मानला खेद ऐकून ती गाणी
घाबरलेले कान फाटले शिरली त्यात गाणी
थांबायाचे नाव घेत नाही शेजार्याची गाणी
तुझ्या शिवारी वादकांचा ताफा आसुसलेला
अखंड बेसूर सिंचन करून गेली तुझी गाणी
बाहेर पडताच शेजारी ओळख दाखवेना
सबंध गावास चालली त्रासून तुझी गाणी
मुशायर्यात तुम्हाला नाही कधीच नाही भेटायचे
आणखी अत्याचार नको पुरेत तुमची पेटी आणिक् गाणी
शिजवलेले जरा मस्तच झाले
पाककृती तू टाक इथे
अमुक आज तू तेल लावले
घसरून सगळ्यांना पाड इथे
उपवासाला काय पौष्टिक
सल्ला फुकट तू फेक इथे
कमळ, चरखा, घड्याळ, हत्ती
बस उरावर, ठोक इथे
स्वेटर, मोजे, ब्रह्मकमळ ते
काढ फोटो टाक इथे
दर दहाव्या प्रतिसादानंतर
धन्यवाद तू फेक इथे
समस्त बाप्ये घाबरती का
ते बळेच दादा होती इथे
चढला डोंगर, सुचला वृत्तांत
दुसर्याच दिवशी टंक इथे
विपु, समस, अन विपत्र खाते
फिरवी रिक्षा रोज इथे
दोन डझनांची कर्तबगारी
क्रमशः पिडूनी टंच इथे
आखाड्यातल्या पैलवानाला
'जमीनी'वर शब्द सुचे
मतला, काफिया, तरही देऊन
सुचली गझल टाक इथे