गाणी

Submitted by शायर पैलवान on 5 December, 2012 - 05:24

गझल विडंबनाचा तिसरा प्रयत्न
---------------------------------------------

अशी अचानक तंबोर्‍यासह आली ऐकू गाणी
थरथरली धरणी मानला खेद ऐकून ती गाणी

घाबरलेले कान फाटले शिरली त्यात गाणी
थांबायाचे नाव घेत नाही शेजार्‍याची गाणी

तुझ्या शिवारी वादकांचा ताफा आसुसलेला
अखंड बेसूर सिंचन करून गेली तुझी गाणी

बाहेर पडताच शेजारी ओळख दाखवेना
सबंध गावास चालली त्रासून तुझी गाणी

मुशायर्‍यात तुम्हाला नाही कधीच नाही भेटायचे
आणखी अत्याचार नको पुरेत तुमची पेटी आणिक् गाणी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users