पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक घटक. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. पृथ्वीवर सर्वत्र एकसारखे हवामान नाही. त्यानुसार माणसाची पाणी पिण्याची गरज वेगवेगळी राहते. अलीकडे काही वृत्तमाध्यमांतून रोज किती पाणी प्यावे यासंदर्भात काही विधाने वाचण्यात आली. वास्तविक निरोगी व्यक्तीने रोज किती पाणी प्यावे याची ठोस शास्त्रीय शिफारस नाही. तरीसुद्धा काही लोक, अमुक इतक्या प्रमाणाच्या वर पाणी पिऊ नका, त्याने मूत्रपिंडावर ताण येईल किंवा अजून अमुक-तमुक होईल, अशा स्वरूपाची विधाने माध्यमांमधून करीत असतात. त्यामध्ये शास्त्रीय तथ्य किती याचा आढावा या लेखात घेत आहे.
आमच्या ठाण्याच्या घराच्या खिडकीत बसून, वाफाळणाऱ्या चहाचा आस्वाद घेत बसायला मला फार म्हणजे फारच आवडतं. सोबतीला एखादं छानसं पुस्तक किंव्हा ताजं वृत्तपत्र. मधून मधून बाहेर नजर टाकत असं चहा पिण्यातली गंम्मत काही औरच. माझी निवांतपणाची ती व्याख्या आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यात बाहेर पाऊस पडत असेल तर काही विचारायलाच नको.
पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!
कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.)
(शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.)
एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी!
दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी?
पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी.
हा विषय राजकारणाशी संबंधित नाही.
हे आपल्यामुळे घडत आहे.
आपण कधी हयाचा गंभीरपणे विचार केला नाही, त्यामुळे पाणी आणि पावसाचा प्रश्न आज एवढा मोठा झाला आहे.
पाण्याच दुर्भिक्ष आज सगळीकडे पहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण हया भागातही हे चित्र आता पहायला मिळत आहे , तीव्रता थोडी कमी आहे हाच एक दिलासा आहे, पण हे सगळं वाढत चाललय एवढ मात्र नक्की.
हा पाणी प्रश्न कसा सोडवावा, काय उपाययोजना कराव्या म्हणून हा धागा.
माबोकरांनी त्यांचे विचार मांडावेत.
पाणी
पाण्यावाचुन घसा कोरडा,
सर्वांचा जिव कोंडला।
पाण्यामुळ बळीराज्याचे कर्ज वाढले,
जिव देऊन केले मोकले।
मुक्या जिवाचे हाल देखवेना,
काय करावे काय सुचेना।
पाण्यासाठी केला निसर्गाचा धावा,
निसर्ग म्हणाला पाहिले झाड़े लावा।
झाड़े लावून करू धरती हिरवीगार,
निसर्गाचे मानु आभार।
माणुस म्हणुन आपले कर्तव्य,
पाणी संवर्धन हेच आपले लक्ष।
७-८ दिवसान्च्या सुट्टी साठी आपण बाहेर जातो तेव्हा, कुन्डीतिल झाडान्ची किवा ग्यालरीतील बागेला पान्याचि काय सोय करता येइल???/
एके ठिकाणी कापसाच्या वाति करुन त्या पान्याच्या बाद्लीतुन कुन्डीत सोड्न्याबद्दल ऐकले आहे....कुनाला अधिक माहीती असेल तर द्या प्लिज....इतर कोनत्या प्रकारे पाण्याची सोय करता येइल का...????
खरे तर आयपीएल हा काही माझ्या फारसा आवडीचा प्रकार नाही. क्रिकेट बघायला आवडते म्हणून हा तमाशाही बघतो, क्रिकेटवर चर्चा करायला आवडते म्हणून या सर्कशीवरही चर्चा करतो. मागे माझ्या रंगपंचमीच्या धाग्यावर कोणीतरी क्रिकेटसाठी होणार्या पाण्याच्या नासाडीचा विषय काढलेला आणि मला यावरही धागा काढायला सुचवले होते. पण एक क्रिकेटप्रेमी म्हणून हा धागा काढण्यास मी मनापासून उत्सुक नव्हतो.
गेल्यावर्षी भारतात खूप कमी पाऊस पडला. तो कमी पडला किंवा जास्त पडला तरी वाढती लोकसंख्या, वाढती बांधकामं, क्षेत्रफळ आणि त्यावर राहणारी लोकं ह्यांचं व्यस्त प्रमाण ह्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उग्र होत आहे. शहराचे काही ठराविक भाग सोडल्यास कॉर्पोरेशनचे ( धरणांतून येणारे )पाणी नीट उपलब्ध नाही. त्यामुळे पाण्यासाठी बेसुमार बोअरवेल्स खणल्या जात आहेत आणि टँकर लॉबी फोफावल्या आहेत.
विडंबन या साहित्यप्रकारांतर्गत एक निव्वळ विनोदी लेखनाचा प्रयत्न.
प्रशासनाला हरकत असल्यास डिलीट केले जाईल.
कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही.
टवाळा... धाग्यावर दिनेशदांनी दिलेल्या प्रचंड १-० बहुमताचा आदर करुन स्वतंत्र धागा काढलेला आहे.
========================================================================
मी हवामानशास्त्र, शाश्वत विकास, शेती यापैकी कुठल्याही क्षेत्रातली तज्ञ नाही. उत्सुकतेतून जे काही वाचलं, त्यातून जेवढं मला समजलंय ते इथे शेअर केल्यावाचून राहवलं नाही, म्हणून हे लिहिलंय. पाणी वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी, दुष्काळाविषयी आधीच धागे निघालेले आहेत. त्यामुळे इथे फक्त पाणी प्राश्नाची व्याप्ती, आणि दुष्काळ नसला तरी काय होतंय यावर भर देण्याचा प्रयत्न आहे.