यावर्षी अजिबातच पाऊस झालेला नाही आणि आता तो गणपतीत तरी पडेल, नवरात्रात तरी पडेल या आशेवर जगण्यातही फारसा अर्थ नाही. आतापर्यंत जो काही पाणीसाठी झालेला आहे तोच पुन्हा पाऊस पडेपर्यंत पुरवुन वापरणे याशिवाय दुसरा उपाय नाही. दुर्गम भाग किंवा जिथे पाणी कमी आहे तिथे लोक आधीपासुनच कमी पाण्यात दिवस भागवतात कारण जवळपास दरवर्षी तिथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. मात्र मुंबईसारख्या शहरात फारसे पाणी बचतीचे उपाय करावे लागत नाहीत. इतर शहरातले फारसे काही माहित नाही मात्र मोठ्या शहरात सहसा दिवसभरातुन एखाद वेळा तरी पाणी उपलब्ध होत असावे .
हताश, निराश आणि भकास नजरेने मी माठाच्या नळाकडे बघत होतो. त्या वयात या शब्दांचा आणि त्यामागच्या भावनांचा अर्थही मला समजत नसावा. समजत होती ती फक्त तहान. तिच गळ्यातून उचकटून त्या माठावर मारावी आणि फोडून टाकावा माठ असा विचार मनात तरळून गेला. पण तसे केले असते तर आईने खूप मारले असते..
गावोगावी शिवांबू-बंधारे-योजना राबवा.
खरेच जगाच्या इतिहासात असा अभिनव उपक्रम झाला नसेल. पण जलसंपदा मंत्र्यांनी त्यांच्या खात्याला केवढी मोठी टीप दिली आहे.. बंधार्यांचे तपशीलवार आराखडे त्या खात्यातील चतुर मंडळींनी तयार केल्याची आजची ऐकीव बातमी आहे. त्यासाठी खूप मोठा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लवकरच मंजूर करून घेण्याचे घाटत आहे. दादा-बंधारे असे नावही निश्चित झाले असल्याचे कळते. या योजनेसाठी लोकसहभाग प्रचंड प्रमाणात लाभेल अशी खात्याला खात्री वाटते.
[ नाव न सांगण्याच्या अटीवर सदर गोपनीय माहिती खात्यातील उच्च पदस्थांनी दिली आहे]
खात्याला प्रेरणा मिळाली ती अशी :
सध्या नवीन ठिकाणी शिफ्ट झालोय.
तेथे पाण्याचा एक प्रॉब्लेम आहे.
सध्या टाकीमध्येच कॉर्पोरेशनच व बोअरच पाणी मिक्स होतं.
त्यामुळे वॉटर प्युरीफायर घ्यायचा आहे.
हा धागा सध्या मार्केट मध्ये अस्तित्वात असलेल्या वॉटर प्युरीफिकेशन सिस्टीम्स बद्दल, त्यांच्या मेन्टेनन्स कॉस्ट, त्यांची उपयुक्तता, त्यांची सर्व्हीस, त्यांचे फायदे ह्याची चर्चा व्हावी ह्या उद्देशाने काढलाय.
सोबतच पाण्यातील टिडीएस लेव्हलस त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अशी माहितीही मिळाली तर अजुन छान.
गझल विडंबनाचा तिसरा प्रयत्न
---------------------------------------------
अशी अचानक तंबोर्यासह आली ऐकू गाणी
थरथरली धरणी मानला खेद ऐकून ती गाणी
घाबरलेले कान फाटले शिरली त्यात गाणी
थांबायाचे नाव घेत नाही शेजार्याची गाणी
तुझ्या शिवारी वादकांचा ताफा आसुसलेला
अखंड बेसूर सिंचन करून गेली तुझी गाणी
बाहेर पडताच शेजारी ओळख दाखवेना
सबंध गावास चालली त्रासून तुझी गाणी
मुशायर्यात तुम्हाला नाही कधीच नाही भेटायचे
आणखी अत्याचार नको पुरेत तुमची पेटी आणिक् गाणी
दिनांक : 8 ऑगस्ट 201२
कै. एस. आर. उर्फ आप्पासाहेब भागवत जयंतिनिमित्त
आताच आजचा सत्यमेव जयतेचा "पाणी-प्रत्येक थेंब महत्वाचा" या विषयावर झालेला भाग बघितला. अंत्यत सुंदर सादरीकरण, मुद्देसुद झालेली चर्चा आवडली..... या भागावर मायबोलीकरांच्या प्रतिक्रिया जाणुन घेउ या म्हणुन इथे आले तर अजुन चर्चा किंवा त्यावरील धागा सुरू झालेला दिसला नाही, या भागावर चर्चा करण्यासाठी काढलेला हा धागा......
सत्यमेव जयतेचा हा भाग खालील लिंकवर बघायला मिळेल ------http://www.satyamevjayate.in/issue12/
या आधीचे धागे मायबोलीकर आनंदयात्री आणि ज्ञानेश यांनी काढलेले आहेत त्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे --------
या आधीच्या भागांच्या लिंक्स-
पाणी पाणी रे............
खारे पाणी रे..............
नयनांचे झाले स्वस्त रे .........
न उरला कुणी सानी रे.........
नशिबी दुष्काळ र कसा .......
येतो नेमीची कसा.......
त्यासी हसू मी कसा......
त्रिश्ने ओठ फाटला कसा........
नयनी आहे ओलावा..........
दुष्काळ,मग , कसा म्हणावा ........
पानी आनाया जावू कशी
हांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी
पन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||धृ||
दुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया?
आगं विहीर कोरडी, हापसा तुटका
नाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी
मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||१||
दरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी
हिवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा
प्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती
मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||२||
दिस सारा पान्यात जायी त्याच्यासाठी सारी घाई
दोन मैल गेल्याबिगर पानी काही दिसत न्हाई