सर्वप्रथम समस्त मायबोलीकरांन्ना होळी व धुलिवंदन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सकाळच्या (वृत्तपत्र नव्हे!) बातम्या मध्ये युक्रेन युद्ध, अर्जेंटीनातील मोर्चे, श्रीलंकेतील महागाई, आफ्रिकन देशांतील खालावत चाललेली परिस्थिती व आपल्या भारतातील राजकिय धुळवडीच्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर जो शिणवटा जाणवला तो दूरदर्शन वरील चित्रहार मध्ये आजच्या दिवशी लागलेल्या रंगपंचमी विशेष गाण्यांन्नी क्षणात नाहीसा झाला!
सर्व रसिकांना व मित्र परिवारास होळीच्या खूप खूप शुभेच्छा!
होळी
आज काल धुलीवंदनाच्या दिवशी मधूनच कोणीतरी अचानक समोर येतो आणि "हॅपी होली" असं काहीतरी म्हणत तोंडावर रंग फासतो. तेव्हा "अरे अरे .... हा तो दिवस नाही" असं म्हणण्याची संधी देखील मिळत नाही. रंग लावल्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण आज धुळवड असते. रंग हा रंगपंचमीला लावतात - अशी आपली एक संकल्पना लहानपणापासून मनात फिट्ट बसलीये. हे म्हणजे नागपंचमीला कोणी "हॅपी राखीपौर्णिमा" असं म्हणून हातात राखी बांधली तर त्या भावाला किती विचित्र वाटेल, तसं धुलीवंदनाला कोणी रंग लावला कि वाटतं.
मंडळी, नमस्कार आणि रंगोत्सवाच्या शुभेच्छा.
गणपती आणि शिमगा ... होळी नाही, या दोन सणांशी कोकणातल्या लोकांचे अगदी जिवा भावाचे आणि अतूट नाते आहे . हे दोन सण म्हणजे कोकणी माणसाच्या मनातला अगदी हळवा कोपरा आहे. या दोन सणांना जगाच्या पाठीवर पोटासाठी कुठे ही फिरणारा कोकणी माणूस आपल्या कोकणातल्या मूळ घरी येण्यासाठी जीवाचं रान करतो आणि जर नाही शक्य झालं कोकणात येणं तर मनाने तरी या दोन सणांना तो कोकणातच असतो. इथे होळीच्या सणाला शिमगा असं म्हणतात
आज सकाळी घडलेली घटना. दहाच्या सुमारास दारावरची बेल वाजली. दारात किशोरवयीन मुलांचं टोळकं उभं होतं. ओळखीची नव्हतीच. होळीची वर्गणी मागायला आली होती. ‘ शाळा नाही का रे? शाळेच्या वेळेत कसे काय फिरताय?’ असं विचारलं तर शाळेला सुट्टी आहे असं त्यांनी उत्तर दिलं. अशी मध्येच कशी असेल सुट्टी?
खरं तर हा मार्च महिना म्हणजे परीक्षांचे दिवस. अभ्यासाचे दिवस. ते सोडून होळीची वर्गणी मागत मुलं फिरत होती. आणि समजा सुट्टी असली तरी शाळेत असण्याचा वेळ प्राधान्याने अभ्यासासाठी देऊन नंतरच वर्गणी साठी फिरणे वगैरे व्हायला हवे.
लिस्बन ची होळी
'बलम पिचकारी जो तूने मुझे मारी तो सीधी-साधी छोरी शराबी हो गई...
हिंदी गाणे? भर अस्सल युरोपीयन चौकात? आणि ते पण full-fledged साऊन्ड सिस्टीम वर... आपसूकच पाय आवाजाच्या दिशेने वळले. रस्त्याच्या टोकावर चौकात ओळखीची अशी गडबड आणि गोंधळ दिसत होता. नेहमीचा युरोपीयन उत्साह (party spirit) आज भारतीय गाण्यांवर बागडत होता आणि त्यात आप आपली पंजाबियत, गुजरातीपणा सांभाळत होणारी भारतीय नृत्ये आणखीनच बहार आणत होती. तरुणाईने भारलेले बातावरण.
कोकण आणि होळी यांचे वेगळेच नाते आहे. कोकणातील गावागावात होळी निमित्त विविध चालीरिती आणि उत्सवात नाविण्य पहायला मिळते. कणकवली तालुक्यातील करूळ या गावी होळीच्या मांडावर आगीचे खेळ खेळले जातात. ढोलताशांचा उत्साहवर्धक आवाज त्याच्या सोबतीने नाचणारे खेळे आणि निशाण, समोर ग्रामस्थांकडून सुरू असलेले आगीचे खेळ आणि आग विझवण्यासाठी झाडांचे टाळ यामुळे वातावरणात धुळ पसरली होतीच,
मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते गाव, आगाशी (विरार), सर्व सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात माहिर होते. होळी आणि धूळवड हा तर साजरा करण्यासाठीचा आमचा टवाळांचा हक्काचा सण. आगाशीत पूर्वी भरपूर वाडे आणि आळ्या होत्या. मी राहायचो मराठेवाड्यात. होळीला रात्री वाड्यातील सर्व 'सीनियर' मेंबरांबरोबर दारू चढवायची आणि रात्रभर पुरंदरे आळीपासून सुरुवात करून मराठेवाडा, पाध्येवाडा, फडकेवाडा असे वाडे पालथे घालत शेवटी देवआळी अश्या मार्गाने शिव्या घालत, बोंबाबोंब करत शिमगा साजरा केला जायचा. सगळे जुने स्कोर्स व्यवस्थित आणि पद्धतशीर सेटल करण्यासाठी हा सण आमच्या फारच आवडीचा होता.