धुळवड

धुळवड की रंगपंचमी?

Submitted by WallE on 25 March, 2024 - 04:14

मित्र आणि मैत्रिणींनो,
सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा :). काल होलिका दहन झाले आणि आज धुळवड. रस्त्यावर, सोसायटी, इत्यादी ठिकाणी रंगबिरंगी आणि प्रसन्न चेहरे दिसले. आमच्या सोसायटीमध्ये नेहमीप्रमाणे बालगोपाल मंडळीने पाणी, रंग, पिचकारी घेऊन धुळवडीच्या मनसोक्त आनंद घेतला तर मोठ्यांनी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या. बऱ्याच घरात आज पुरणपोळीचा बेत असतो पण आमच्याकडे मात्र आज श्रीखंड पुरीचा बेत असतो. श्रीखंडपुरी वर ताव मारून डोळे जड झाले आहेत आणि रणरणत्या उन्हात कूलर सुरू करून मस्त वामकुक्षी घेण्याचा बेत आहे.

होळी, धुळवड, रंगपंचमी, भारताची उत्सवप्रियता व इतर जग!

Submitted by यक्ष on 18 March, 2022 - 00:00

सर्वप्रथम समस्त मायबोलीकरांन्ना होळी व धुलिवंदन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळच्या (वृत्तपत्र नव्हे!) बातम्या मध्ये युक्रेन युद्ध, अर्जेंटीनातील मोर्चे, श्रीलंकेतील महागाई, आफ्रिकन देशांतील खालावत चाललेली परिस्थिती व आपल्या भारतातील राजकिय धुळवडीच्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर जो शिणवटा जाणवला तो दूरदर्शन वरील चित्रहार मध्ये आजच्या दिवशी लागलेल्या रंगपंचमी विशेष गाण्यांन्नी क्षणात नाहीसा झाला!

विषय: 

"तो, ती, अन् .....लाल रंग."

Submitted by बग्स बनी on 13 March, 2017 - 17:23

आज मुळी इच्छाच न्हवती त्याची, म्हणूनच जरा उशिरा उठला. खिडकीतून डोकावून पाहिलं, रंगांची उधळण, दंगा, मस्ती. उगाचच रेंगाळत, तो बराच वेळ बसल्याजागी डोळे बंद करून विचार करत होता. आयुष्यात खूपच कालवाकालव, उलटापालट झाली होती. जगणं निरस, बेचव वाटत होतं. इतक्यात दारावर मित्रांची टोळकी जमा झाली. दार वाजवलं गेलं. सगळे मित्र हाका मारू लागले. उगाचच दिसावं म्हणून त्यानं खोटं खोटं हसु आणून चेहऱ्यावरचा भाव बदलला. अन दरवाजा उघडला. मित्रांनी ओढूनच घराबाहेर काढलं. प्रथेप्रमाणे रंगानं पार बरबटवुन काढलं. आता खरा तो त्यांच्यात मिसळल्यागत दिसत होता.

Subscribe to RSS - धुळवड