आगीचा रोम्बाट..

Submitted by गिरिश सावंत on 3 April, 2013 - 08:48

कोकण आणि होळी यांचे वेगळेच नाते आहे. कोकणातील गावागावात होळी निमित्त विविध चालीरिती आणि उत्सवात नाविण्य पहायला मिळते. कणकवली तालुक्‍यातील करूळ या गावी होळीच्या मांडावर आगीचे खेळ खेळले जातात. ढोलताशांचा उत्साहवर्धक आवाज त्याच्या सोबतीने नाचणारे खेळे आणि निशाण, समोर ग्रामस्थांकडून सुरू असलेले आगीचे खेळ आणि आग विझवण्यासाठी झाडांचे टाळ यामुळे वातावरणात धुळ पसरली होतीच,
आगीच्या बोळ्यांमधून बाहेर पडणारे आगीचे तुकडे आणि रॉकेलचे थेंब या सर्वांपासूनच कॅमेरॅला वाचविताना त्रेधातिरपीटच उडत होती. १०-१२ वर्षाच्या मुलांपासून ७०-८०च्या वृध्दापर्यंत सर्वांच्या उत्साहाने या परंपरेला आगळे रूप दिले होते. सोबत फटाक्‍यांच्या आतषबाजीत वेगळाच रंभ भरला होता.
कॅनॉन ५५० डी आणि १०-२२ची वाईड अँगल लेन्सच्या सोबतीने स्लो शटर्स स्पीड आणि बल्ब मोडचा पुरेपूर आनंद घेताना दीड-दोन तासाचा हा खेळ संपल्याचे लक्षातही आले नाही.

प्रची १

karul_1 copy

प्रची २

karul_3 copy

प्रची ३

karul_4 copy

प्रची ४

karul_2 copy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Oh, my Holiness ! अफलातून !!
[ सांवंतानुं, हेच फोटू जर मीं काढले असते, तर त्येंचां जां काय झालां असता, त्येकां 'रोंबाट' म्हणतत !]

जबरी Happy