दुष्काळ

दुष्काळाचे पायरव

Submitted by दत्तात्रय साळुंके on 29 September, 2024 - 02:32

हाडं गोठवणारा गार वारा
वर वांझोट्या ढगांची गर्दी
कधी ऊन कधी सावली
तिच ती अंग जाळणारी सावली

पाऊस पेरणी करून गेला
परत फिरकलाच नाही
भुईतला आशेचा कोंब
गर्भातच मेला

आता उरलेत

दुष्काळाचे पायरव
आढं मोडकी कणाहीन घरं
मुकाट सुन्या सुन्या वाटा,पार
तहानलेले पाणवठे , विहिरी

मूक हंबरणारे
शेणामुताच्या वासाला आसुसलेले गोठे
आ वासलेल्या रिकाम्या गव्हाणी
गोठ्याकडं डोळे लावलेल्या चारा छावण्या

शब्दखुणा: 

दुष्काळ

Submitted by दत्तात्रय साळुंके on 6 August, 2023 - 01:40

दिवसभर कोंदटलेल आभाळ
बर्फासारखा थंडगार वारा
वाटतं कधीही बरसतील धारा
पण पोकळ पर्जन्यभास सारा

पाऊस काय, पुढारी काय
अगदी बांधापर्यत येतात
अन् फक्त वचनं बरसतात
माणसं कुठं बरं चुकतात ?

टीचभर ओलीवर पेरलेल्या
आशा आकांक्षा वटतात
स्वप्नांचे धुमारे फुटण्या आधी
कायम माना टाकतात

वावराच्या तडा गेलेल्या आरशात
दिसतात विवश चेहरे ठिकरलेले
सैरभैर, धरणाच्या कामावर
खडीच्या ढिगा-यावर विखुरलेले

शब्दखुणा: 

निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका

Submitted by मार्गी on 12 May, 2016 - 02:09

पाणी फाउंडेशन : दुष्काळाला हरविण्याचे आव्हान पेलताना आमीर खान

Submitted by घायल on 15 April, 2016 - 22:49

महाराष्ट्राच्या दुष्काळावर कसा मार्ग काढावा याबद्दल अद्याप म्हणावी तशी चर्चा सुरू झालेली दिसत नाही. प्रमुख राजकीय पक्षांकडे असलेला इच्छाशक्तीचा अभाव, तज्ञांच्या इशा-यांकडे होत असलेले दुर्लक्ष, वारेमाप उधळपट्टी आणि बेपर्वा वृत्ती यामुळे संकट गडद होत चाललेले आहे.

सांग सांग भोलानाथ...

Submitted by प्रज्ञा९ on 2 March, 2016 - 00:48

kavita.png

काल लेकीला भरवताना ही कविता सुचली. आम्ही रोज भोलानाथाचं गाणं म्हणत जेवतो. काल मात्र गाणं म्हणताना मी काहीतरी वेगळं म्हटलंय अशी शंका मला गाणं संपल्यावर आली. ती ३-४ मिनिटं मी बहुधा हरवल्यासारखी झाले असेन, एरवी लक्षात आलंच असतं. मग जरा डोक्याला ताण देऊन आठवायचा प्रयत्न केला. जे आठवलं ते लिहून काढलं. शेवटचे ३-४ शब्द सोडले तर संपूर्ण कविता जशी सुचली तशी आहे, कोणतेही यमक वगैरे संस्कार केलेले नाहीत.

पाणी!!!

Submitted by गौरी on 8 September, 2015 - 03:23

मी हवामानशास्त्र, शाश्वत विकास, शेती यापैकी कुठल्याही क्षेत्रातली तज्ञ नाही. उत्सुकतेतून जे काही वाचलं, त्यातून जेवढं मला समजलंय ते इथे शेअर केल्यावाचून राहवलं नाही, म्हणून हे लिहिलंय. पाणी वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी, दुष्काळाविषयी आधीच धागे निघालेले आहेत. त्यामुळे इथे फक्त पाणी प्राश्नाची व्याप्ती, आणि दुष्काळ नसला तरी काय होतंय यावर भर देण्याचा प्रयत्न आहे.

शब्दखुणा: 

थेंबे थेंबे तळे साचे - पाणी बचतीचे उपाय

Submitted by सावली on 8 September, 2015 - 02:23

यावर्षी अजिबातच पाऊस झालेला नाही आणि आता तो गणपतीत तरी पडेल, नवरात्रात तरी पडेल या आशेवर जगण्यातही फारसा अर्थ नाही. आतापर्यंत जो काही पाणीसाठी झालेला आहे तोच पुन्हा पाऊस पडेपर्यंत पुरवुन वापरणे याशिवाय दुसरा उपाय नाही. दुर्गम भाग किंवा जिथे पाणी कमी आहे तिथे लोक आधीपासुनच कमी पाण्यात दिवस भागवतात कारण जवळपास दरवर्षी तिथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. मात्र मुंबईसारख्या शहरात फारसे पाणी बचतीचे उपाय करावे लागत नाहीत. इतर शहरातले फारसे काही माहित नाही मात्र मोठ्या शहरात सहसा दिवसभरातुन एखाद वेळा तरी पाणी उपलब्ध होत असावे .

दुष्काळ

Submitted by बेफ़िकीर on 31 August, 2015 - 11:37

महाराष्ट्रात यंदा विशेष पाऊस झालेला नाही. उरलेल्या दिवसांत तो पुरेसा होईल असेही काहीजण म्हणत आहेत आणि यंदा पाऊस दगा देणार असेही काहीजण म्हणत आहेत. काल तर असे समजले की येते दशकभर हा पाऊस कमी असण्याचा प्रश्न सतावण्याची शक्यता असून त्या प्रश्नाचे पुढचे स्वरूप कल्पनेपेक्षाही उग्र, भयानक असेल.

दात कोरून पोट भरता येत नसले तरी पाणीबचत हा जीवनशैलीचा, दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनवण्याचा काळ केव्हापासूनच आलेला आहे. आता त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. अजून दोन महिन्यांनी आणखीन जाणवतील आणि नंतर दिवसेंदिवस कदाचित अधिकच! पाऊस पडला तर मात्र विशेष परिणाम जाणवणार नाहीत.

शब्दखुणा: 

चिंता करितो वृष्टीची

Submitted by वरदा on 14 January, 2014 - 09:39

१८१८ साली मराठेशाहीचा अंत झाला आणि टोपीकराचा अंमल दख्खनदेशी सुरू झाला. या भूमीवर राज्य करायचे तर इथले लोक, ही भूमी, इथली समाजव्यवस्था समजून घेतली पाहिजे हे उघड होतं. नव्याने आर्थिक घडी बसवायची तर जमीन मोजणीपासून आणि नव्याने करपद्धती घालून देण्यापासून सुरूवात करणं नवीन राज्यकर्त्यांच्या दृष्टीने आवश्यक होतं. राज्याच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा हा या शेतसार्‍यापासून आणि जमीनविषयक इतर करांमधून येणार असल्याने साहाजिकच इथली ग्रामीण अर्थव्यवस्था ब्रिटिशांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय बनली. भारतात इतरत्रही हेच होत होतं.

एका दुष्काळाची गोष्ट..

Submitted by Manasi R. Mulay on 11 May, 2013 - 06:46

गावामध्ये पाण्याचा tanker आल्यावर पळापळ ही व्हायचीच.. tanker आल्यावर मागे धावणारी ही छोटी छोटी मुलं, स्त्रिया, वयोवृद्ध.. बाळ रडतय पण आईला त्याच्याकडे लक्ष देता येत नाही.. कितीही जीव कळवळला तरी तिला माहित असतं कि तिने पाणी भरलं नाही तर सगळ्या घराला पाणी मिळणार नाही.त्यामुळे ह्या लहानग्या बाळाला कडेवर घेऊन तिला ““tankerवरची कसरत”” करावी लागते
dushkal5.jpg
पाण्याचे tanker आल्यावर पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची उडणारी तारांबळ..घाई.. पाण्यासाठी जीवघेणी स्पर्धा.. मालेवाडीतील दृश्य!

Pages

Subscribe to RSS - दुष्काळ