दुष्काळ
रंगपंचमी - एक विनंती
दुष्काळ कविता
महाराष्ट्रातील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील दुष्काळी परिस्थितीवर मी लिहिले आहे.....
-----------------------------------------------------------------------------------------------------
तप्त झळा...बोचऱ्या कळा....कोरडा गळा
हलत लांब पळताहे थांबवा त्या मृगजळा
शेतात पिक ते झाले की सापळा
गर्द हिरव्या निवडुंगाचे काटे करती वाकुल्या
अवचित कधी झाकोळून जाई लागे वेडी आशा
परी वाहून नेई घन ते सारे पवन दुसऱ्या देशा
कडाड कड घनघोर घन
शीतल सुंदर आता वन
थेंब भिजविती कणा मृदेच्या
वाफा उठती निश्वासाच्या
झिरपते भेगा - भेगातून पाणी
क्षणात होई पुन्हा एकसंध धरणी
क्षुब्धरान
रान भाबडे रडु लागले,
देत आठवणींचे हुंदके,
हिरवीगार काया सरली
रुक्ष या समया आगे ..
काळचक्रे फिरली अशी की,
अगतिक झाले पाखरु,
असुनही माता जवळी,
रडू लागले गोंडल वासरु .!
हिरवे पातेही नाही रानी,
हतबल झाला बळीराजा,
दुष्काळ समयी नमले सगळे,
"काय देव आणि काय ख्वाजा?"
जनावरांच्या दिमतीला नाही ,
कोवळा पिवळा चारा,
निसर्गाचे अमानुष तांडव,
आहे आपुलाच दोष सारा .!
रान म्हणाले,"हे दुष्काळा
काय केलीस आमुची थट्टा?"
तो निर्दयी म्हणतो असा की,
"खेळा 'जीवन' मरणाचा सट्टा...!"
काय पुरावा हवा तुम्हाला माझ्या बैल असण्याचा
जनावरांची छावणी सुरू झाली अन् माणसं राहायला आली...
वर्षा कुलकर्णी - सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, May 07, 2012 AT 01:30 AM (IST)
पुणे - जनावरांची छावणी सुरू झाली आणि लगोलग एका रात्रीत तिथे माणसं राहायला आली. जनावरांना मिळणारं पाणीच माणसं पितात. तिथेच दगड मांडून दोन घास रांधतात आणि जनावरांना वाचवताना आपणही उभे राहिलो, असं समाधान मानण्याची वेळ माणदेशी बाया-माणसांवर आली आहे. माण तालुक्यातील म्हसवड येथे जनावरांसाठी पहिली छावणी चेतना सिन्हा यांच्या माणदेशी फाउंडेशनने सुरू केली आहे.
दै. सकाळमधील वरील बातमीवरुन सुचलेली ही कविता.
राजकीय नेतृत्व : दुष्काळ विकासाच्या इच्छाशक्तीचा,संसद ६० वर्षे
भारतीय पूर्ण झाली. संसद सदस्यांनी आपण ६० वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन बलस्थाने अधिक मजबूत करणे तर अडचणींवर उपाय शोधणे अपेक्षित होते. पण संसदेत उत्सव होण्यापलीकडे काहीच झाले नाही. संसद आणि गोंधळ हे समानार्थी शब्द झाले आहेत. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रातले तज्ञ असताना ६० वर्षानंतरही समस्या आहे तशाच आहेत किंबहुना त्यात काही अंशी वाढच झाली आहे.कुठलेही क्षेत्र घ्या फक्त गोंधळ आणि बजबजपुरी माजली आहे.
पानी आनाया जावू कशी
पानी आनाया जावू कशी
हांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी
पन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||धृ||
दुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया?
आगं विहीर कोरडी, हापसा तुटका
नाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी
मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||१||
दरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी
हिवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा
प्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती
मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||२||
दिस सारा पान्यात जायी त्याच्यासाठी सारी घाई
दोन मैल गेल्याबिगर पानी काही दिसत न्हाई
दुष्काळाच्या झळा
दुष्काळाच्या झळा
दुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा
पाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा
डाळींबाचे होवूनी हाल द्राक्षबाग ती उखडली
गहू होणे दुरच होते मान मोडून बाजरी पडली
कुठून आणावे पाणी विहीर तर सुकली
बांधावरची जुनी बाभूळ आताशा वठली
कोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून
पान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून
दुर दिशेला चुकार ढग आस दाखवी
तेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई
कसे जगावे कळेना कसे जगवावे न उमजेना
दुष्काळाने मन कोरडे पण पाणी येई डोळा
हातपंप
हातपंप
ह्या दुष्काळानं लई ताण दिला ग बया
मला हातपंपाचा आधार हाय ग बया ||धृ||
घरचा नळ नाय कामाचा
सार्वजनीक हाय नळ गर्दीचा
वाही रातंदिस पानकाळ्याचा
त्याला उन्हाळ्यात पानी काही येईना ग बया
मला हातपंपानं आधार दिला ग बया ||१||
खालीवर दांडा करावा बरं
थोडं कष्टांचं काम हाय सारं
पानी येतंयं हापसून न्यारं
बाकी ठिकाणी माझी घागर रिकामी र्हाती ग बया
मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||२||
सार्या बायांनी याची चव घेतली
एकजात सार्यांनी पसंती दिली
हंडेगुंडेकळशांची रांग मोठी लागली
Pages
