घे उसंत
थांब थांब आता
घे जरा उसंत
किती बरशील अजून
नको पाहू अंत
तुझ्या अजून बरसण्याने
भरतेय आम्हा थंड
थांब थांब आता
घे जरा उसंत
किती बरशील
किती गर्जशील
बास कर आता
तुझा कहर
थांब थांब आता
घे जरा उसंत
नद्यांचा भरला उर
म्हणूनच अलता पूर
माणसांची तारांबळ
संसाराची वाताहत
थांब थांब आता
घे जरा उसंत
बस झाला तुझा राडा
पेलावेना संसार गाडा
पिकांचा झाला पार चूथडा
घरांचा झाला की रे ढिगारा
थांब थांब आता
घे जरा उसंत
दाखव जरा दया