केरळामधे १९२४ नंतर सर्वात मोठा महापूर आलेला आहे. १६४ जणांचा मृत्यू झालेला आहे. ५०००० घरे वाहून गेली आहेत. १४ जिल्ह्यांपैकी १३ जिल्हे पूरग्रस्त आहेत. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. ६०००० हेक्टर कृषी जमिनीचे नुकसान झाले आहे. एकूण रूपयातले नुकसान ७७० कोटी. २ लाख शेतकरी उद्ध्वस्त. ४००० ट्रान्सफॉर्मर्स उडालेत. सबस्टेशन्स बंद ठेवावे लागल्याने वीज नाही. १३ पूल वाहून गेले. ८०००० किमी रस्ते उखडले गेले आहेत. ३५ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
पूरग्रस्त जनतेला मदतीची गरज आहे. ज्यांना प्रत्यक्ष मदतकार्य करायचे आहे त्यांचे कौतुक आणि शुभेच्छा. ज्यांना ते शक्य नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन मदत करण्यासाठी खालीलप्रमाणे सुविधा आहे. ही राज्य सरकारची अधिकृत वेबसाईट आहे. याशिवाय काही खाजगी संस्थळे आहेत. इच्छुक शोधून त्याचा वापर करू शकतात.
१. https://donation.cmdrf.kerala.gov.in/
२. https://kerala.gov.in/web/guest/CMDRFService
( आपत्ती व्यवस्थापन /नैसर्गिक आपत्ती यासारखा ग्रुप न सापडल्याने या ग्रुपात हे तातडीचे आवाहन केले आहे. योग्य ग्रुपात धागा मागाहून हलवला गेल्यास आभार)
ऑनलाईन पेमेंट करताना बँकेचा
ऑनलाईन पेमेंट करताना पहिल्या संस्थळावर बँकेचा पर्याय निवडला की अडचण येतेय. बँकेत प्रत्यक्ष जाऊन तिथे दिलेल्या आयएफएससी क्रमांकाचा वापर करता येऊ शकेल. कदाचित काही काळाने संकेतस्थळ पुन्हा पूर्ववत होऊ शकेल. दुसरे राज्य सरकारचे संस्थळ व्यवस्थित आहे.
इतर पर्याय.
Other Donation Options
BANK TRANSFER
Bank : State Bank of India (SBI)
Account Number : 67319948232
Branch : City Branch, Thiruvananthapuram
IFSC : SBIN0070028
PAN: AAAGD0584M
Account Type: Savings
SWIFT CODE : SBININBBT08
Name of Donee:
Chief Ministers Distress Relief Fund
Address :Govt of Kerala
District: Thiruvananthapuram
State Kerala
Pin 695001
अत्यंत दुर्दैवी आणि
अत्यंत दुर्दैवी आणि निराशाजनक
https://www.facebook.com/TheWireHindi/videos/443595799459871/
खरोखर खुप खुप दुर्दैवी ,आणि
खरोखर खुप खुप दुर्दैवी ,आणि आता प्रत्यक्श जाउन जेव्हा पहिल तर खरोखर खुप वाईट वाटलं .. आमच्या घरात ४ फूट गाळ साचला आहे.. म्हणजे अन्दाज होता जेव्हा बंगलोर मध्ये राहून केरळ च्या बातम्या बघत होतो.. पण घरी पोहचलो ( chettuva - Thrissur district ) आणि रडायला आला.. नवर्याच्या त्याच्या आई बाबा न बरोबरच्या खूप आठवली होत्या/आहेत त्या घरात,म्हणाला परत एकदा आई बाबा गेले तेव्हा जे फीलिंग आला होता ते आलं ...
केरळावरील आपत्ती नक्कीच
केरळावरील आपत्ती नक्कीच महाविध्वंसक स्वरूपाची आहे. परन्तु मण्डळी भावनेच्या भरात वाहुन जाउन अस्थाणी व अनाठाई मदत वाया जाऊ नये असे वाटते .
https://english.manoramaonline.com/districts/idukki/2018/08/25/cpm-hijac...
.
अ) इस्राईल ने पाठवलेली मदत स्विकारायला मुस्लिम संघटनांनी विरोध केल्याने त्या वस्तू विमानतळावरच सडत पडल्या आहेत
.
ब) भारत सरकार ने ६०० कोटी रुपयांची मदत केलेली असताताना सुद्धा निव्वळ खिजवण्या साठी दुबई च्या शेख लोकांचे आणि थँक यु दुबई चे फ्लेक्स आणि बॅनर्स लावण्यात येत आहेत
क ) भारतीय सेना गेले १०-१२ दिवस इथे २४ तास मदत कार्यात गुंतलेली असताना सेनेच्या सेवेबद्दल अभद्र शेरेबाजी करण्यात येत आहे
महापुरानंतर जे एका ट्वीट वरुन USSI वेगळा देश करण्याबद्दल राजकारण चघळले गेले त्यामुळे वेदना झाल्या . जरी कम्युनिस्ट लोकांनी हा विषय काढला असेल पण असला वेगळेपणा जिथे जोपासला जातोय त्या प्रदेशाबद्दल सहानुभूती कमी होते . केरळ मुख्यमन्त्री निधी ला मिळणाऱ्या प्रचंड आर्थिक मदतीचा विनियोग तिथले सध्याचे कम्युनिस्ट राज्यकर्ते कसा करतील याबद्दल खरंच चिंता वाटते कारण हा पैसा कम्युनिस्ट आणि चर्च मशिदी यांच्याकडे वळवणार नाहीत असे ठामपणे म्हणता येत नाही+ यास्तव सेवाभारती सारख्या खर्याखुर्या सेवाभावी संस्थेस मदत करणे हेच प्राप्त परिस्थितीत सर्वथैव योग्य ठरेल असे वाटते.
http://www.sevabharathi.org
http://www.sevabharathi.org/donate/
आज काल एक messege जास्त फिरत
आज काल एक messege जास्त फिरत आहे की केरळला मदत करायची तर मंदिरातील पेट्या उघडा...!!
त्या लोकांना माहीत नसेल तर मी सांगू इच्छितो की हिंदूंचा खूप मंदिरातून केरळला मदत जात आहे. फक्त ती सांगून केली जात नाही.. शिर्डी साई बाबा मंदिरातून 5 कोटिंची मदत जाहीर करण्यात आली आहे आणि आजच मुबंईचा सिद्धिविनायक मंदिरातून सुद्धा देणगी गेली व लालबागचा राजा जो मुंबई व महाराष्ट्रा मध्ये मानला जातो तो आमचा देव त्या मंडळा कडून पण मदत गेली आहे. व हे मंडळ दरवर्षी काही मुलं दत्तक पण घेते शिक्षणा साठी व कुठे मदत लागली तर आमच्या हिंदूंचा मंदिरातूनच मदत केली जाते...
पण मला एक सांगा. तुम्हाला कुठे दिसली का की कोणत्या चर्च मधून किंवा कोणत्या दर्गा मदरश्यातून मदत गेली म्हणून. किंवा दरवर्षी असे कोणते मदरशे दर्गे आहेत की ते गरिबांचे मुलं दत्तक घेते..??
अशा पुरोगाम्यांना आमचे मंदिरच का दिसतात ओ...???
चर्च मदरशे का नाहीत आणि खास करुन दर्गे का दिसत..
नेहमी हिंदू व मंदिरेच टार्गेट का केली जातात...???
*अग्रेषित
सेवाभारती सारख्या खर्याखुर्
सेवाभारती सारख्या खर्याखुर्या सेवाभावी संस्थेस मदत करणे हेच प्राप्त परिस्थितीत सर्वथैव योग्य ठरेल असे वाटते.
सहमत
केरळाला भारतीय नागरिकांनी
केरळाला भारतीय नागरिकांनी खारीचा वाटा उचलून ७०० कोटी रूपयांची मदत केली. त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. अडचणीत असलेल्या माणसाची विचारसरणी काय, जात, पंथ, धर्म, लिंग , प्रांत हे पाहून जो मदत करतो तो माणसातून उठलेला असतो. आयुष्यभर हेच करायचे आहे. उद्या रेशीमबागेत प्रलय आला तरी मदत केलीच पाहीजे. सन्नी लिओनीने ५ कोटी रूपये दिले. तसेच अन्नधान्न्याने भरलेले शंभर कि पाचशे ट्रक्स केरळला स्वखर्चाने पाठवले. माझ्यासाठी ती हिरो झाली.
आमच्याकडे उत्पन्नाच्या १० टक्केचा प्रस्ताव ठेवला तर खूपच कावकाव झाली. एक टक्के सुद्धा जास्त वाटले लोकांना. शेवटी उत्पन्नाप्रमाणे गट करावे लागले. एका रिक्षावाल्याने पाच हजार रूपये दिले. कौतुक वाटलं. छोट्या छोट्या व्यावसायिकांनी सुद्धा मदत केली. शेवटी माणुसकी महत्वाची.
मदत करू नका अशी आवाहने पाहून वाईट वाटले. आमच्या सोसायटीच्या ऑफिशियल ग्रुपवर पेव फुटले होते अशा मेसेजेसचे. शेवटी तक्रार केल्यानंतर बंद झाले. नसेल करायची तर नका ना करू. पण इतरांना का आवाहन ?
रमेश भिडे सारखे लोक ह्या
रमेश भिडे सारखे लोक ह्या देशात जन्मतात हे ह्या देशाचे दुर्दैवच आहे.