केरळातील नैसर्गिक महाआपत्ती : मदत व कार्य - तातडीचे आवाहन
Submitted by नाचणी सत्व on 18 August, 2018 - 01:53
केरळामधे १९२४ नंतर सर्वात मोठा महापूर आलेला आहे. १६४ जणांचा मृत्यू झालेला आहे. ५०००० घरे वाहून गेली आहेत. १४ जिल्ह्यांपैकी १३ जिल्हे पूरग्रस्त आहेत. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. ६०००० हेक्टर कृषी जमिनीचे नुकसान झाले आहे. एकूण रूपयातले नुकसान ७७० कोटी. २ लाख शेतकरी उद्ध्वस्त. ४००० ट्रान्सफॉर्मर्स उडालेत. सबस्टेशन्स बंद ठेवावे लागल्याने वीज नाही. १३ पूल वाहून गेले. ८०००० किमी रस्ते उखडले गेले आहेत. ३५ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.