विडंबन या साहित्यप्रकारांतर्गत एक निव्वळ विनोदी लेखनाचा प्रयत्न.
प्रशासनाला हरकत असल्यास डिलीट केले जाईल.
कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही.
टवाळा... धाग्यावर दिनेशदांनी दिलेल्या प्रचंड १-० बहुमताचा आदर करुन स्वतंत्र धागा काढलेला आहे.
========================================================================
यावर्षी अजिबातच पाऊस झालेला नाही आणि आता तो गणपतीत तरी पडेल, नवरात्रात तरी पडेल या आशेवर जगण्यातही फारसा अर्थ नाही. आतापर्यंत जो काही पाणीसाठी झालेला आहे तोच पुन्हा पाऊस पडेपर्यंत पुरवुन वापरणे याशिवाय दुसरा उपाय नाही. दुर्गम भाग किंवा जिथे पाणी कमी आहे तिथे लोक आधीपासुनच कमी पाण्यात दिवस भागवतात कारण जवळपास दरवर्षी तिथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. मात्र मुंबईसारख्या शहरात फारसे पाणी बचतीचे उपाय करावे लागत नाहीत. इतर शहरातले फारसे काही माहित नाही मात्र मोठ्या शहरात सहसा दिवसभरातुन एखाद वेळा तरी पाणी उपलब्ध होत असावे .