दुष्काळाचे पायरव

Submitted by दत्तात्रय साळुंके on 29 September, 2024 - 02:32

हाडं गोठवणारा गार वारा
वर वांझोट्या ढगांची गर्दी
कधी ऊन कधी सावली
तिच ती अंग जाळणारी सावली

पाऊस पेरणी करून गेला
परत फिरकलाच नाही
भुईतला आशेचा कोंब
गर्भातच मेला

आता उरलेत

दुष्काळाचे पायरव
आढं मोडकी कणाहीन घरं
मुकाट सुन्या सुन्या वाटा,पार
तहानलेले पाणवठे , विहिरी

मूक हंबरणारे
शेणामुताच्या वासाला आसुसलेले गोठे
आ वासलेल्या रिकाम्या गव्हाणी
गोठ्याकडं डोळे लावलेल्या चारा छावण्या

लढता लढता शहीद झालेले
वा-यावर भुरभुरते करपलेले कोंब
रापलेले निस्तेज चेहरे, अन्
त्यावर दुकाळाच्या सुरकुत्या
पिचलेली मनगटं, निर्जीव डोळे
अन् घोंगावणा-या माशा
दारिद्रयाचा ठेवाच त्या

टंचाई, कष्टाचे डोंगर
अन् काळाची भेसूर चाहूल
वडिलोपार्जित वाट्याला आलेले

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दसा
ह्यावर्षी तरी नाही होणार पायरव.

धन्यवाद केकू...
काही ठिकाणी आडसाली अथवा दर दोनतीन वर्षात दुष्काळ असतो.

@हपा
@ फार‌एंड
अनेकानेक धन्यवाद...हे सगळं अनुभवलंय...