आत्ता त्याने फलंदाजीचा वेगळा स्तर दाखवला आहे. सध्या त्याची देहबोली, वर्तन हे सगळे सुखद वाटावे असे आहे. खरे तर या वयात आयुष्यभराची कमाईसुद्धा झालेली आहे.
पुढे सातत्य, तंदुरुस्ती वगैरे विषय उभे ठाकायला लागतात. वयानुसार इतर प्रलोभनेही असतात व वाईटावर असणारे लोक असे काही मुद्दामही करू शकतात. उत्तेजक द्रव्य चाचण्या, खोटे हनी ट्रॅप, मानसिक खच्चीकरण वगैरे गोष्टी मुद्दाम घडवल्या जाऊ शकतात किंवा खरोखरही होऊ शकतात.
IPL चा हंगाम सुरू झाला की चाहत्यांमध्ये उत्साह संचारतो आणि सगळे या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत
असतात. IPL मधील “PL” या अक्षरांनी मला एक गमतीशीर विचार सुचला आणि तोच या लेखातून
मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
पु. ल. (PL) हे महाराष्ट्रातील अतिशय लाडके साहित्यिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या विनोदी लेखनामुळे त्यांना
आजही प्रचंड चाहतावर्ग लाभला आहे. रोजच्या आयुष्यातील वेगवेगळ्या माणसांचं त्यांनी इतक्या रम्य
आणि विनोदी पद्धतीने व्यक्तिचित्रण केले की ती पात्रे अक्षरशः अजरामर झाली.
३१ जानेवारीला फेसबुक फीडमधे १९९९ च्या चेन्नई मॅच बद्दल बर्याच क्लिप्स व माहिती आली आणि त्यामुळे तेव्हाच्या बर्याच आठवणी जाग्या झाल्या. कॅलेंडर मधे पाहिले तर त्या दिवशी रविवार होता. पण आम्हाला गुरूवारी सुट्टी असल्याने आम्ही ऑफिसात होतो. भारताला २७१ करायचे होते. तेव्हा पाकचा प्रचंड धाक होता. त्यामुळे मॅच जिंकायची शक्यता कमीच होती. जिंकण्याची सवय नसलेल्या संघांना अचानक जिंकण्याची संधी आली की काय करायचे कळत नाही असे भारताचे तेव्हा खूप वेळा व्हायचे. पण दुपारपर्यंत भारत २०० च्या जवळ पोहोचला आहे आणि सचिन अजून खेळत आहे वगैरे स्कोअरवरून लक्षात आले होते.
नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं!
ही फेसबुक पोस्ट असती तर मी याची सुरूवात "लंडन मधल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउण्डला सगळेच लाइक करतात. पण त्याच शहरात असलेल्या या ओव्हल ला एक लाइकतरी बनतोच" अशी केली असती. हे लंडनमधेच असलेले ओव्हल क्रिकेट ग्राउण्ड. पूर्वी केनिंग्टन ओव्हल किंवा नुसतेच द ओव्हल म्हणत - आता अधिकृत नाव " "किया ओव्हल". क्रिकेटप्रेमींच्या लंडन ट्रिपमधला टीआरपी लॉर्ड्स खेचून घेते आणि हे तितकेच चांगले मैदान उपेक्षित राहते. मी लॉर्ड्स याआधीच पाहिले आहे, त्याच्या टूरबद्दल काही वर्षांपूर्वी इथे लिहीलेही आहे.
(पूर्वप्रसिद्धी : 'तुषार' दिवाळी अंक)

(पूर्वप्रसिद्धी - 'शिवतेज' दिवाळी अंक २०२४)

‘मार्च’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
‘मार्च’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘प्रभावशाली, कल्पक, उत्साही, धाडसी’ असतात असे म्हटले जाते. सध्या चालू असलेल्या मार्च महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकणे नक्कीच रंजक ठरेल.