लंडन मधील दोन आयकॉनिक पुलांची एकमेकात गुंतलेली ही गोष्ट नक्की वाचा.
दोन पूल... लंडन ब्रीज आणि टॉवर ब्रीज
थेम्स किनारी वसलेलं लंडन हे अंदाजे दोन हजार वर्षांचा इतिहास असलेलं आणि हा ऐतिहासिक वारसा नीटपणे जपलेलं एक खुप जुनं शहर आहे. लंडन ब्रीज हा त्या पैकीच एक मौल्यवान वारसा.

Drawing by Hana Kruzikova

“काय गो, भाताचं काय करता तिकडे? आपला उकडा तांदूळ मिळतो का परदेशात?” लंडनहून पहिल्यांदा रत्नागिरीला गेल्यावर एका काकूंनी विचारलं.
“नाही, बासमती मिळतो.” मी त्यांची काळजी दूर करायच्या हेतूने म्हणाले, पण झालं उलटंच!
“मेलीस! रोज तो लांबलांब दाणा खायला लागतो की काय?” त्या ओरडल्या.
कोकणातला तांदूळ लंडनमध्ये मिळत नाही तो नाहीच, वर पोरीला रोज अख्खा बासमती खाऊन दिवस काढावे लागतायत म्हणजे परांजप्यांवर भलताच प्रसंग गुदरलाय असं वाटून काकूंना आमची फार दया आली होती त्यवेळी.
नमस्कार मंडळी! २०१७ सालच्या लंडन मराठी सम्मेलनाच्या तयारीला जोमाने सुरुवात झालेली आहे. लंडनच्यामहराष्ट्र मंडळाची ८५ वर्ष साजरी करताना सहली, सांस्कृतिक आणि औद्योगिक कार्यक्रम, स्नेहसम्मेलनं अशाउपक्रमांबरोबरच मंडळाच्या आणि मंडळींच्या या प्रवासाचा एक लेखी उत्सव एका स्मरणिकेच्या रुपात व्हावा असाही विचार आहे.
ही नुसत्याच आठवणींची स्मरणिका नाही...
काही आठवणी, काही भविष्याचे वेध, काही अनुभव असावेत गाठीशी,
किंवा ठेच लागलेले पुढचे कसे उभे आहेत मागच्यांच्या पाठीशी...
पाच दिवसांच्या कॉर्नवॉलच्या कंडक्टेड टूरमध्ये आमच्या टूरगाईड स्टीवनं आम्हाला खूप सुरेख सुरेख ठिकाणं दाखवली. त्यातलंच हे एक झळाळतं रत्नं - मिनॅक थिएटर!
जुनच्या शेवटी १० दिवसांसाठी इंग्लंड-स्कॉटलंड करत आहोत. २ फॅमिलीज आहेत - ऐकूण ७ जणं.
तर खालील विषया संदर्भात सल्ले हवे आहेत.
१. इथलं ड्रायव्हिंग लायसन्स तिथे चालतं ना? लंडनमध्ये पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणार आहोत. पण लंडनहून स्कॉटलंडला जाताना कार हायर करून घेऊन जाण्याचा विचार आहे.
२. लंडनहून हायर केलेली कार पुढे ग्लासगो अथवा एडिंबरो ला सोडून देता येईल ना? कारण परत येताना वेळ वाचवण्यास ट्रेननं येण्याचा विचार आहे.
३. स्कॉटलंड कारनं करावं ना? आम्हाला जी ठिकाणं बघायचीयेत त्याकरता कार असल्यानं फ्लेक्सिबिलिटी राहील ती बरी पडेल असं वाटतंय.
कठोर परिश्रम, चिकाटी आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर दीडशे पेक्षा अधिक वर्षांपूर्वी लंडनमध्ये सुरु झालेली जगातली पहिली भुयारी रेल्वे, जिला लोक भाषेत ट्युब म्हणतात, ते एक मानव निर्मीत आठवं आश्चर्यच वाटत मला. आणि म्हणूनच मी जेव्हा या टुयबने पहिल्यांदा प्रवास केला तेव्हा गाडी जरी जमीनीखालुन जात होती तरी मी मात्र अक्षरशः हवेत होते.
आम्ही आत्ता ९ दिवस लंडन , paris , इटली , स्विझर्लंड इथे जात आहोत . आत्ता फक्त इथून लंडन आणि येताना zurich वरून परत असे flight चे बुकिंग झाले आहे .
आतील सर्व ट्रीप plan करायची आहे. इथे ज्यांनी अशी ट्रीप केली आहे किंवा जे मायबोलीकर ह्या भागात राहतात त्यांनी 'काय बघावे ? काय बघू नये , कुठे राहणे सोयीस्कर होईल आणि इतर काही टिप्स जरूर द्या. तुमच्या अनुभवाचा , माहितीचा व सल्ल्यांचा नक्कीच उपयोग होईल. '
माझ्या एका मित्राला एम बी ए करण्यासाठी लंडन ला यायचे आहे. प्रत्य्क्ष अॅड्मिशन अगोदर जुलै महिन्यातच तिथे येउन एक महिना राहुन विद्यापीठ नक्की करावे अन तिथे अॅडमिशन घ्यावी असा विचार आहे. टुरिस्ट व्हिसा वर तेथे येउन मग तिथेच विद्यार्थी म्हणुन प्रवेश मिळु शकेल का? एक महिना राहन्यासाठी पेन्शन्/लॉज/मोटेल ची माहिती कुठे मिळेल? माअहितगारांनी कृपया संपर्क करावा. धन्यवाद.
आता जब तक है जान बघतोय.. लंडनचे चकचकीत पॉश रस्ते आणि त्यावर गिटार वाजवत गाणे म्हणत पैसे गोळा करणारा शाहरुख.. येणारी जाणारी पब्लिक निव्वळ त्याला पैसेच देत नव्हती तर टाळ्या वगैरे ही देत होती.. मागेही शाहरुखच्या एका चित्रपटात असाच सीन होता, फरक इतकाच की त्यावेळी तो गाणार्या भिकार्याला टाळी देऊन पुढे गेला.. या उलट आपल्या कडे ट्रेनमधील गाणारे भिकारी निव्वळ इरिटेट करतात, अन पैसे मागायला पायाला येऊन हात लावतात तेव्हा कसली किळस वाटते म्हणून सांगू..