लंडन मराठी सम्मेलन, २०१७: स्मरणिका

Submitted by Arnika on 16 January, 2017 - 12:21

नमस्कार मंडळी! २०१७ सालच्या लंडन मराठी सम्मेलनाच्या तयारीला जोमाने सुरुवात झालेली आहे. लंडनच्यामहराष्ट्र मंडळाची ८५ वर्ष साजरी करताना सहली, सांस्कृतिक आणि औद्योगिक कार्यक्रम, स्नेहसम्मेलनं अशाउपक्रमांबरोबरच मंडळाच्या आणि मंडळींच्या या प्रवासाचा एक लेखी उत्सव एका स्मरणिकेच्या रुपात व्हावा असाही विचार आहे.

ही नुसत्याच आठवणींची स्मरणिका नाही...
काही आठवणी, काही भविष्याचे वेध, काही अनुभव असावेत गाठीशी,
किंवा ठेच लागलेले पुढचे कसे उभे आहेत मागच्यांच्या पाठीशी...

उद्योजकांच्या यशाच्या कथा किंवा काही प्रयत्नांची गाथा,
मराठमोळ्या आधाराने या देशात रोवलेलं पाऊल,
गोतावळा वाढत गेल्यावर लागलेली स्थानिक मंडळांची चाहूल...

‘दोन टाळकीही मराठी दिसेनात’ पासून सुरु झालेला प्रवास ‘भरपूर आहेत हो मराठी माणसं, लंडनमधे बिनधास्त मराठी बोलायचीही सोय उरली नाही’ इथपर्यंत येऊन ठेपणं... मधली ८५ वर्ष! आधीच्या काळात मंडळ हा मराठीशी जोडणारा एकमेव दुवा होता. आता परदेशात येऊनही भारताशी नाळ तुटत नाही. तरीही एक नव्हे, लंडनच्या आसपासची अनेक मंडळं तुडुंब असतात. काय असेल या गोतावळ्याची जादू? परदेशात आपला जम बसण्यामागे, सामाजिक, सांस्कृतिक समाधान मिळण्यामागे आपली एक community असण्याचा कसा हातभार लागत असेल? इथून पुढचं मराठी पाऊल पडताना त्यात मंडळाची भूमिका काय असेल? या आणि अशा गोष्टी आम्हाला तुमच्याकडून ऐकायच्या आहेत! तर, सम्मेलनाच्या लेखी दिंडीत सामिल व्हायचं तुम्हाला सगळ्यांना मनापासून आमंत्रण!

१४ फेब्रुवारी २०१७ पर्यंत तुमचे लेख, कविता, चुटके, जुनी पत्र, चित्र, नवे विचार हे सगळं आमच्यापर्यंत या पत्त्यावर पोहोचतं करा. लंडन मराठी सम्मेलनाच्या फेट्यात स्मरणिका तुऱ्यासारखी शोभून दिसावी म्हणून हातभार लावण्याचं हे घरचं, आग्रहाचं बोलावणं! लिहिताय ना? आपले साहित्य या पत्त्यावर पाठवा: sampadak@lms2017.org.uk
अर्निका परांजपे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी,

https://www.lms2017.org.uk/

युके मधील पहिलं वहिलं जागतिक मराठी संमेलन २, ३, ४ जून ला लंडन येथे आयोजित केले गेले आहे. भरपूर कार्यक्रम, भारतीय मान्यवरांची व कलाकारांची उपस्थिती, बिझिनेस नेट्वर्कींग, थेम्स क्रूझ, तडका मराठी जेवण, स्थानिक कलाकार असे ३ दिवस संपूर्ण मराठी धमाल आहे.
लवकरात लवकर तुमची तिकीटे बूक करा. वेब्साईट्वर किंवा मला संपर्क करा. १० पेक्षा अधिक तिकीटांवर सौलत आहे.
कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास मला वि.पू. मधून संपर्क करू शकता. किंवा ईथे ईमेल पाठवा
ypjoshi@hotmail.com

योग
LMS-2017 Programme Committee