आम्ही आत्ता ९ दिवस लंडन , paris , इटली , स्विझर्लंड इथे जात आहोत . आत्ता फक्त इथून लंडन आणि येताना zurich वरून परत असे flight चे बुकिंग झाले आहे .
आतील सर्व ट्रीप plan करायची आहे. इथे ज्यांनी अशी ट्रीप केली आहे किंवा जे मायबोलीकर ह्या भागात राहतात त्यांनी 'काय बघावे ? काय बघू नये , कुठे राहणे सोयीस्कर होईल आणि इतर काही टिप्स जरूर द्या. तुमच्या अनुभवाचा , माहितीचा व सल्ल्यांचा नक्कीच उपयोग होईल. '
पॅरिसला जाऊन फक्त लूव्र बघायचे आहे इतकेच काहीसे डोक्यात होते. त्याच बरोबर सेंट मॉनमिशेल बघायचे असेही होते. पण जसजसे माहिती काढत गेले तसे तिथे बघायला खूप काही आहे हे जाणवले. मायबोलीकर Sam आणि अस्चीग कडून खूप उपयोगी माहिती मिळाली आणि १२ दिवसांच्या फिरतीचा आराखडा तयार झाला. सगळे बुकिंग स्वतःच शोधून करायचे असे ठरवले त्याचा फायदाही झाला पण त्यासाठी फार वेळ मात्र द्यावा लागला. १२ दिवसातले पहिल्या दोन रात्री पॅरिसमध्ये पुढचे काही दिवस रोम आणि फ्लोरेंसमध्ये आणि पुन्हा शेवटच्या चार रात्री पॅरिस मध्ये होत्या.