इटली
माहिती हवी आहे.
आम्ही आत्ता ९ दिवस लंडन , paris , इटली , स्विझर्लंड इथे जात आहोत . आत्ता फक्त इथून लंडन आणि येताना zurich वरून परत असे flight चे बुकिंग झाले आहे .
आतील सर्व ट्रीप plan करायची आहे. इथे ज्यांनी अशी ट्रीप केली आहे किंवा जे मायबोलीकर ह्या भागात राहतात त्यांनी 'काय बघावे ? काय बघू नये , कुठे राहणे सोयीस्कर होईल आणि इतर काही टिप्स जरूर द्या. तुमच्या अनुभवाचा , माहितीचा व सल्ल्यांचा नक्कीच उपयोग होईल. '
आमची समुद्रसफर
मंडळी, आता हा लेख पूर्ण झाला आहे. अर्धवट लिखाणाला सुध्दा तुम्ही प्रतिसाद दिलात. त्यामुळे हुरुप आला. खूप खूप धन्यवाद. आत्ता फोटो टाकतानाही नंदनने तातडीने मदत केली त्याबद्दल त्याचे आभार.
आपल्या प्रतिसादांची वाट पाहात आहे.
----------------------------------------------------------------------------------------
जिथे खूप करता येते रोम / ते दोन दिवसांकरता होम (भाग २)
Piazza del Campidoglio कडे जाणारा Cordonata (घोडे व गाढवं पण चढू शकतील अशा उताराप्रमाणे बनविलेल्या पायऱ्या). पंचम चार्ल्सच्या भेटीच्या सन्मानार्थ हा पियाज्झा बनविला गेला. मायकेलअॅंजेलोने याच्या रचनेत अनेक भौमितीक प्रमाणांचा वापर केला आहे. कॅस्टर आणि पोलक्स कॉरडोनाटाच्या दोहोबाजूला दिसताहेत.
पियाज्झाच्या एका अंगाला आहेत Aracoeli संगमरवरी पायऱ्या. १३४८ मधे प्लेग संपल्याच्या निमित्ताने या बनविल्या गेल्या.
जिथे खूप करता येते रोम / ते दोन दिवसांकरता होम (भाग १)
सप्टेंबरमध्ये रम्य सोरेंटोत आठवडाभराची 'मीटींग' करुन (आणि अर्थातच भरपूर कॉफी पिऊन, लिमोनचेल्लो आस्वादून, रिकोटा-पेर केक सारखा खास स्थानिक पदार्थ रिचवून) परतीच्या वाकड्या मार्गावर असलेल्या रोममध्ये शनिवारी मध्यरात्री पोहोचलो. टर्मिनीसारखे प्रगल्भ, कल्पक पण तितकेच उपयोगी नाव असलेल्या स्थानकावर नेपल्सहून निघालेली माझी आगगाडी (अर्थात इलेक्ट्रिक) पोहोचणार याची कल्पना असल्याने, जवळचेच एक साधे हॉटेल निवडले होते. तसेही बहुतांश वेळ बाहेरच घालवायचा असतो. नेहमीच्या साहसी (अशा बाबतीत तरी) स्वभावाप्रमाणे स्मरलेल्या नकाशाप्रमाणे स्वारी १५ दिवसांची बॅग ओढत निघाली. शहर लख्ख जागे होते.
सतरा कारभारी , एक नाही दरबारी !
सप्टेंबर महिन्यात डाउ जोन्स इंडेक्स ने पाताळ धुन्डीत नविन मजली गाठल्या तर औक्टोबर महिन्यात परत वर उसळी मारुन नवीन उच्चांक गाठले. नोवेंबर महिन्याची सुरवात मात्र डाउ जोन्स इंडेक्स च नाही तर जग भरातील इंडेक्स साठी काही चांगली झाली नाही. युरोप मधे ग्रीस संबंधीत निर्णय घेणार्या सतरा लोकांच्या कमिटी ने आणि अमेरिकमधे कर्ज कपाती संबंधीत निर्णय घेणार्या बारा लोकांच्या कमिटी उठवलेल्या अनिश्चितते च्या धुक्या कडे पाहता वर्षाचे उरलेले दिवसही ही मार्केट्स अशीच वर खाली बागडणे सुरू ठेवतील असे दिसते !
When in Rome... (इटली प्रवास: भाग २/२)
When in Rome... (इटली प्रवास: भाग १/२)
मागच्या वर्षी (इ.स.२००९) ऑगस्टमध्ये आम्ही इटली प्रवास केला. युरोपात आल्यावर इटली प्रवास कधी होतो याची वाटच बघत होतो. आठवडाभर सुट्टी काढून दहा दिवसात मिळून आम्ही रोम, फ्लोरेन्स आणि व्हेनिसमध्ये राहिलो आणि रोमहुन नेपल्स व पॉम्पेइ, फ्लोरेनसहुन पिसाला धावती भेट दिली.