प्रवासवर्णन
६०० किमी बीआरएम - माझी लाँग डिस्टन्स सायकलींग कहाणी ३
२४ जाने २०१४ ला आयोजकांनी ३०० आणि ६०० च्या ब्रेव्हेचे आयोजन केले होते. मी ६०० साठी भाग घेण्याची तयारी केली होती. त्याप्रमाणे नाव नोंदवले आणि डी डेची उत्सुकतेने पाहत होतो. एकदम ६०० असल्यामुळे हा पूर्ण आठवडा टेपरींग मुळे मी कुठेही राईड करायची नाही असे ठरविले होते. त्या आधीच्या शनिवारी १०० + आणि रविवारी ६५ अशी पूर्वतयारी केली व आठवडाभर पूरक डायट चालू केला.
३०० किमी बीआरएम - माझी लाँग डिस्टन्स सायकलींग कहाणी २
भारतातील सर्वात कठिण अशी २०० ची बीआरएम पूर्ण केल्यावर १४ दिवसांनीच ३०० बीआरएम पण होती.
ह्या वेळचा मार्ग होता. विद्यापीठ - सातारा - उंब्रज - सातारा - बाणेर
भारतातील टफेस्ट 200 BRM ! - माझी लाँग डिस्टन्स सायकलींग कहाणी
मी गेले अनेक वर्षे सायकलींग करतो आहे, पण कधी ब्रेव्हे मध्ये भाग घेतला नव्हता. लाँग डिस्टन्स सायकलींगच्या स्पर्धा AUDAX ही संस्था जगभरात आयोजित करते. ब्रेव्हे ह्या २०० किमी ते १००० किमीच्या असतात. ह्या बद्दल तुम्हाला भारतातील वेब साईट - http://www.audaxindia.org वरून बरीच माहिती मिळू शकेन.
स्पर्धेत भाग घ्यायचे थोडक्यात नियम असे आहेत.
१. BRM ही सेल्फ सपोर्ट राईड असते. ( सोबत सपोर्ट कार घेऊ शकत नाहीत.)
चेरी ब्लॉसम - एक अविस्मरणीय पहाट
२०१३ च्या शेवटी शेवटी आणि ह्या वर्षाच्या सुरवातील मी वाशिंगटन डीसी आणि वर्जनियामधे नोकरीनिमित्त काही महिने राहिलो. मी तिथे गेलो तेंव्हा हिवाळ्याची नुकतीच सुरवात झालेली होती. पानगळीच्या दरम्यान गळून गेलेली पाने जमिनाला चिकटत चाललेली होती. कुजत चाललेली होती. काही पाने कधीकाळी वहीत जपूण ठेवलेल्या पिंपळाच्या पानाची आठवण करुन देणारी होती. सगळीकडे बर्फच बर्फ पसरलेला आणि कुठे सिंगापुरातली दमट हवा आणि उंचच उंच इमारती आणि कुठे हे ठेंगणे जग! मी तुलना करता करताच मला भव्य रस्ते असलेले डीसी शहर भेटले आणि मी वाशिंगटन डीसीच्या प्रेमातच पडलो.
पूर्व युरोप भाग २ - बुडापेस्ट
भाग पहिला www.maayboli.com/node/50524
आम्ही डीनर क्रूझवर फक्त क्रूझचाच पर्याय घेतला होता. बोटीवरून बुडापेस्टचा रात्रीचा नजारा मस्तच होता.
चेन ब्रिज आणि बुडामधला राजप्रासाद
पूर्व युरोप भाग १ - व्हिएन्ना आणि बुडापेस्ट
मागच्या वर्षी ऑक्टोबरमधे युरोपच्या या टर्म मधली पहिली ट्रीप करायचे ठरवले. स्वाती आणि मुलींचे बेल्जियमचे रेसिडंट कार्ड अजून आले नव्हते त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत जायचे की नाही आणि गेलो तर कधी आणि कुठे जायचं ते ठरत नव्हते. शेवटी कुठेच जायचं नाही आणि डिसेंबरच्या सुट्टीत जाउ असं ठरवलं. तोच मुलीच्या शाळेला एक आठवडा सुट्टी लागायच्या बरोबर ३ दिवस आधी अनपेक्षितपणे तिघींचेही कार्ड आले आणि मग परत एकदा प्लॅनिंगला लागलो. खरंतर पोर्तुगालचा प्लॅन करत होतो पण व्हिएन्ना, ऑस्ट्रियाचे फ्लाइटचे चांगले डील दिसले आणि तिकीटं बूक करून टाकली.
बाल्कन युरोप - क्रोएशिया - भाग २ - स्प्लिट, ह्वार (Hvar)
बाल्कन युरोप - क्रोएशिया - भाग १ - झदार, प्लिटवित्से नॅशनल पार्क
युरोपातली टिपीकल/ऐतिहासिक शहरं बरीच बघून झाली म्हणून यावेळी स्प्रिंगमध्ये थोड्या वेगळ्या ठिकाणी जायचं ठरवलेलं. एका मित्राच्या फेसबूकवर त्याच्या क्रोएशियाच्या ट्रीपचे फोटो बघितले होते म्हणून क्रोएशियाबद्दल (विशेषतः डालमेशिया भागाबद्दल) माहिती गोळा करू लागलो. काही फोटो बघताच आणि थोडी माहिती घेउन लगेच तिकडं जायचं फ्लाइट टिकीट बूक करून टाकलं. क्रोएशियाबद्दल माहिती घेतानाच अचानक माँटेनेग्रो या देशातील काही ठिकाणंपण कळाली. खरंतर तोपर्यंत माँटेनेग्रो नावाचा देशपण अस्तित्वात आहे हेच माहिती नव्हतं. पण कोटोर, माँटेनेग्रोचे फोटो/वर्णन वाचलं आणि तिकडंपण जायचं ठरवलं.
कलरफुल कोलोरॅडो
"कोलोरॅडो म्हणजे स्वर्ग.. कोलोरॅडो म्हणजे बर्फाळ सौंदर्याची परमावधी.. कोलोरॅडो म्हणजे स्किईंग.. कोलोरॅडो म्हणजे हिमवादळं.. आणि कोलोरॅडो म्हणजे निव्वळ शांतता !"