आणखी काही 'आंतरजालीय' भोंडले
आंतरजालीय भोंडले आंतरजालावर 'मुक्त' संचार करत आहेत असे आजच समजले म्हणून वॉटरमार्क टाकून पुन्हा प्रकाशित करतेय.
आंतरजालीय भोंडले आंतरजालावर 'मुक्त' संचार करत आहेत असे आजच समजले म्हणून वॉटरमार्क टाकून पुन्हा प्रकाशित करतेय.
हे असंच टाइमपास म्हणून लिहिलं होतं कधी तरी. आज वत्सलानं आठवण करून दिली म्हणून रंगीबेरंगीवर टाकतेय.
या भागात न्यू यॉर्क सिटी आणि आसपास असलेल्या ऐतिहासिक इमारतींच्या प्रतिकृतींची प्रकाशचित्र आहेत.
ओलाना आणि मॉन्टगमरी पॅलेस
सेन्ट पॅट्रिक्स कथेड्रल
बबू त्या दिवशी खूप आनंदात होती. तिचे आजोबा तिला छ्बूच्या घरी घेऊन जाणार होते. छबू आणि बबूची एकदम घट्ट मैत्री होती. त्या दोघी एकाच वर्गात होत्या. पण बबू आणि छबू पहिलीतून दुसरीत जाणार होत्या त्या वर्षी छबूची आई छबूला घेऊन तिच्या मामाच्या घरी राहायला गेली. छबू मग नव्या शाळेत जायला लागली. छबू गेली म्हणून बबूला खूप वाईट वाटलं. एकदा जिन्याखाली बसून एकटीने रडताना तिला आजोबांनी बघितलं. त्या दिवशी पासून ते जेव्हा नदीपलीकडल्या छबूच्या मामाच्या गावी जात तेव्हा बबूला सोबत घेऊन जात. तिच्या शाळेला सुट्टी असेल तरच. पण ते नेहमीच बबूला शाळा असेल अशा दिवशी जात आणि तिला त्यांच्या बरोबर जायला मिळत नसे.
तरुण उद्योजक रितेश अंबष्ठ यांच्याशी साधलेला संवाद. मायबोलीवरील उद्योजकांना (आणि इतर वाचकांना अर्थातच) रितेश अंबष्ठ यांची ओळख करुन देण्यासाठी इथे दुवा देतेय. मुलाखत इंग्रजीत असल्याने इथे जशीच्या तशी देत नाही.
रोजच्या सारखी बरोबर सहा वाजता तिला जाग आली. डोळे उघडल्याबरोबर आपसूकच मान वळली. अंगावरचे पांघरुण फेकून तो वेडावाकडा पालथा झोपला होता. त्याची ही नेहमीची सवय. कधी कधी झोपेतच तिच्या गळ्यात हात पडत. हात सोडवायला गेले तर त्याची झोप चाळवे. ती मग टक्क छताकडे बघत विचारांच्या माळा गुंफत पडून राही, तो बाजूला होईतो.
माझी एक मैत्रीण आहे. एकदा ती सुट्टी घेऊन एका ठिकाणी गेली. जिथे गेली ते गाव पॉप्युलर पटेल पॉइंट्स पैकी खासच नव्हतं. सहसा ती किंवा मी सुट्टी घेऊन कुठे गेलो की सुट्टीचे दिवस, आधीची, नंतरची आवराआवरी झाल्यावरच निवांत बोलणं होतं. ह्या वेळी मात्र तिचा तिथे पोचल्यावर दुसर्या-तिसर्या दिवशीच फोन आला. अगदी भरभरुन बोलत होती. एकूण ते ठिकाण मैत्रिणीला भयंकर आवडले होते. गूगल केल्यावर तिथे ऑगस्टात एक (रेडवाले) इंडियन मार्केट पण असते असे समजले. ठरलं! यंदा तिथेच उन्हाळ्याची सांगता करायची. उन्हाळा काही तिथे जाण्यासाठी 'आयडियल' ऋतू नाही. पण इंडियन मार्केट गाठायचं तर उन्हाळ्यातच जायला हवं.