बबनची "दुसरी" गोष्ट
"दुसरी गोष्ट अशी तुमाला सांगतो बाबा अहो खुर्पणीला बाया मिळंना...धा धा दरानं बी दोघी-तिघीच आल्या..."
"दुसरी गोष्ट अशी तुमाला सांगतो बाबा अहो खुर्पणीला बाया मिळंना...धा धा दरानं बी दोघी-तिघीच आल्या..."
सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून आईची स्वयंपाकघरात खुडबूड सुरू आहे. एवढ्यात बाबांना जाग येते, ते उठून बसतात. आईची चाहूल लागल्याबरोबर-
"ऐकलं का ?"
"ऐकते आहे. बोला !!"
"बदाम आहेत का घरात ?"
"आहेत. का ?"
"शिरा कर मग"
"बदामाचा शिरा ? आज काय विशेष ?"
"खावासा वाटला म्हणून कर म्हणालो. शिरा काय तुझ्या मांजरी बाळांत झाल्यावरच करावा असे थोडीच आहे"
"हो !! जसं काय तुमच्यासाठी काही करतच नाही"
"म्हणून तर सांगतोय, शिरा कर"
मग आई बदाम भिजत घालते. बदामाचा शिरा फारच जड पडतो म्हणून आई सगळा बदामाचाच शिरा नाही करत. एक वाटी रवा आणि एक वाटी वाटलेले बदाम असं करते.
काही वाचनीय विपू. विपू करणार्यांची नावं किंवा विपुचा संदर्भ माहिती नसताना सुद्धा हसु येइल अशा काही आहेत.
"बोलो महामांगा माता की जय!"
"सिंडे, वैद्यबुवांची बायको नाहीये का माबोवर ?"
"अरेरे सिंडी. "ती" बातमी आत्ता तुझ्या कानावर येवुन आदळली. विपु मधली बातमी कळायला इतका वेळ? कंपु मधुन हद्दपार कराव कि काय तुला?"
"लिहिलाय की प्रतिसाद.. आणि तू इतकी प्रथितयश, सिद्धहस्त लेखिका असताना विपूत रिक्षा का फिरवतियेस? शोनाहो."
वासंतिक बाफ जसा पेटून उठला तसे शिट्टीकरही उत्साहात आले. जस-जसा गटगचा दिवस जवळ येत होता तसा हा उत्साह वाढत होता. इतका की त्या उत्साहाच्या भरात एका शिट्टीकरणीने गटगला येणे रद्द केले, पुर्या उडुन गेल्या आणि नंतर सामान गाडीत टाकताना आदल्या दिवशी आणलेल्या आमच्या ग्रॉसरीतल्या कांदे-बटाट्याच्या पिशव्या सुद्धा गाडीत भरल्या गेल्या.
फार पुर्वी, माझ्या जन्माच्या आधी माझे बाबा शिवचरित्र अख्यान सांगत. एक एक प्रसंग त्यांनी वर्णन करावा नी उपस्थित प्रेक्षकांनी तल्लीन होऊन जावे. जिजाऊ सती जाण्यास निघतात तो प्रसंग ऐकताना लोकांना अश्रु आवरत नसत. पूढे राजकीय क्षेत्रात वावर वाढला, पक्षातील जबाबदार्या वाढल्या तसा हा उपक्रम मागे पडला. आम्ही भावंडांनी प्रत्यक्ष कधी त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकलेच नव्हते. आता त्यांनी पुन्हा सांगायला सुरुवात करावी असे गेली बरीच वर्षं आम्ही सगळे त्यांना सांगतोय. पण तो योग काही जुळून येत नव्हता. गेल्या वर्षी काही निमित्ताने बाबांच्या मागे लागून एक भाग रेकॉर्ड करुन घेतला (कसा ती एक वेगळीच कथा होइल).
मी एक अत्यंत खमकी बाई आहे. सहसा धीर (धूर नव्हे) सोडत नाही. आमचे बाबा नेहमी आमच्याविषयी 'मुली खंबीर आहेत' असे म्हणतात आणि आई आम्हाला 'पाषाणहृदयी' म्हणते. पण तरी काही घटना, प्रसंग, कोणाची नुसती आठवण, फोनवर ऐकलेला आवाज ह्या गोष्टी अशा असतात की कितीही दात-ओठ खाल्ले तरी डोळे जुमानत म्हणून नाहीत. माझा एक मित्र नेहमी म्हणायचा Everybody has a weak moment. असे अशक्त क्षण अनेक येतात आयुष्यात. कधी तेव्हढ्या पुरतं वाईट वाटणं असतं तर काही प्रसंग काही म्हणता पाठ सोडत नाहीत. कित्येकदा विस्मयात पडावं असं आपण वागतो. आपल्या स्वत:च्याच व्यक्तिमत्त्वाविषयी, जडणघडणी विषयी शंका यावी असं.
मायबोली परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा !!!
भाग १ : दसरा
गेल्या महिन्यात आम्ही नवी गाडी घेतली. ह्या आधी आम्ही वापरत असलेली गाडी, सध्याची अर्थव्यवस्था, दोघेही investment banking मधे असल्याने आमच्या धोक्यात आलेल्या नोकर्या, पदरी एक मूल (अरेरे किती ते रंजले, गांजले) आणि गाडीचा काळा रंग अशा पार्श्वभुमीवर घरातील, बाहेरील मंडळींच्या आलेल्या प्रतिक्रीया.
आम्ही नुकतेच गाडी घेउन घरी आलो होतो. शनिवारी डील करण्यात बराच वेळ गेला म्हणून गाडी घरी आणायला सोमवार उजाडला. येईतो रात्रीचे आठ वाजून गेले होते. मी घाई-घाई इशानच्या जेवणाचे बघतच होते तर फोन वाजला. भारतातुन मोठ्या बहिणीचा होता.
मी, "हाय, मी आज फोन करणारच होते. काय म्हणतेस ?"