नवी गाडी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

गेल्या महिन्यात आम्ही नवी गाडी घेतली. ह्या आधी आम्ही वापरत असलेली गाडी, सध्याची अर्थव्यवस्था, दोघेही investment banking मधे असल्याने आमच्या धोक्यात आलेल्या नोकर्‍या, पदरी एक मूल (अरेरे किती ते रंजले, गांजले) आणि गाडीचा काळा रंग अशा पार्श्वभुमीवर घरातील, बाहेरील मंडळींच्या आलेल्या प्रतिक्रीया.

आम्ही नुकतेच गाडी घेउन घरी आलो होतो. शनिवारी डील करण्यात बराच वेळ गेला म्हणून गाडी घरी आणायला सोमवार उजाडला. येईतो रात्रीचे आठ वाजून गेले होते. मी घाई-घाई इशानच्या जेवणाचे बघतच होते तर फोन वाजला. भारतातुन मोठ्या बहिणीचा होता.
मी, "हाय, मी आज फोन करणारच होते. काय म्हणतेस ?"
ती, "का ग ? आज काय विशेष ?"
मी, "नवी गाडी घेतली ते सांगायला."
ती, "अरे व्वा, मस्तच बातमी, कुठली घेतली ?"
मी, "होंडा ऍकॉर्ड"
ती, "मस्तच...आई-बाबांना सांग बाई आधी फोन करुन. अमेरिकेत सध्या काय गोंधळ आहे. त्यांना फार काळजी पडलीये तुमची (:अओ:). बरं रंग कुठला ?"
मी, "काळा.."
ती, "अर्र काळाच का ?"
हे ऐकल्यावर मी फोन ठेऊनच दिला. कारण आमच्या आख्या खानदानात पहिली काळी गाडी ह्यांची. माझ्या भाच्याचा मुंजीत ह्या गाडीला कल्पकतेने थर्माकोलची सोंड वगैरे लावुन वरातीसाठी हत्ती बनवला होता. हत्ती करायची कल्पनाच मुळी गाडीच्या काळ्या रंगावरुन आली. म्हणतात ना, आपला तो बाब्या !!!

त्या दिवशी रात्री काही मला घरी फोन करणे झाले नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी-
मी, "हॅलो बाबा"
बाबा, "बोला..." बाबांना कधीही मी कोण बोलते सांगावे लागत नाही. ते बरोबर ओळखतात. ह्याविरुद्ध मी, एकदा खुद्द आईला "बाई तुम्ही कोण बोलताय ते आधी सांगणार का ?" असे म्हणाले होते.
मी, "काल गाडी घेतली. तेच सांगायला फोन केला"
बाबा, "गाडी घेतली ? नवी ?"
मी- बारीक आवाजात, "हो, नवीच आहे"
बाबा, "वा छान छान. आम्ही इथे काळजी करतो. ओबामा निवडुन येइल तर बरे म्हणतो आणि तुम्ही तर गाडी घेतली !!!"
मी, "आता हिवाळा आला ना. दोन गाड्या हव्याच. पहिली विकुनही वर्ष-सहा महिने होत आले की आता."
बाबा, "ते ही खरच, बरं झालां घेतली. रंग कुठला ?"
मी (चाचरत), "काळा...."
बाबा, "तुझी आई बाहेर गेलीये. सकाळी फोन कर."
"काळा रंग ह्या मॉडेलला खूप छान दिसतो.." हे माझे शब्द ओठातुनच पोटात जातात. काळा रंग म्हणजे बाबांची साफ नापसंती असते. ते नेहेमी म्हणतात, "आपली गाडी रंग पांढरा असल्यामुळे कशी सगळ्यांच्या गाड्यांपेक्षा भारी दिसते."

ऑफिसमधील माझी मैत्रिण शीतलला आम्ही गाडी घेणार हे आधीच ठाऊक होतं. गाडी घरी आणल्याची सांगावं म्हणुन मी तिला मेसेज पाठवला. आता हा संवाद जसाच्या तसा दिला नाही तर त्यातली गंम्मत उरणार नाही म्हणुन इंग्रजीत.
"Hi"
"Hey...whatz up ?"
"have a news to share with u.."
"so soon ? Ishan is just a year old...;)"
"ha...sooner than u can expect...the baby is home already..."
"really...which one ?"
"Honda Accord..2009.."
"noooooooooo..."
"yessssssss.."
"I was so proud of you guys..."
"you have many other reasons to be proud of us :)"
आधीच आम्ही इतकी मस्त स्पोर्ट्स कार विकून मोठ्याच पापाचे धनी झालो होतो. त्याबदल्यात होंडा ऍकॉर्ड म्हंटल्यावर तर जगबुडी नक्की !!! आणि मग जसे काही आम्ही केलेल्या पापाचा धक्का सहन न झाल्याने ती तरातरा माझ्या डेस्कपाशीच येउन उभी राहिली आणि "How can you do this..." वगैरे वगैरे बोलायला लागली.

मग जेवणाच्या सुट्टीत बाराकर वैद्यांच्या बायकोला फोन केला. आम्ही गाडी घ्यायचे ठरवले तेव्हापासून सर्व शोधाशोधी वगैरे ह्या नवरा बायकोला माहिती होती.
मी, "कामात आहेस का ?"
ती, "बोल.."
मी, "गाडी घेतली बरं एकदाची..."
ती, "कुठली घेतली शेवटी ?"
मी, "होंडा ऍकॉर्ड २००९..."
ती, "तू तुझ्या खतरुडपणाने नवर्‍याचं स्टँडर्ड* घालवलं आहेस.."
मी, "ठेऊ का फोन ?"
ती, "बाय"

* हे स्टँडर्डचं समीकरण अगदी सोप्पं आहे.
माझ्या नवर्‍याने उकरुन काढलेले खर्च + वैद्य कुटुंबीयांचा पाठिंबा = स्टँडर्ड. वैद्य पाठिंबा देतील नाहीतर काय.

एव्हाना मी रचना, आरतीला इपत्र पाठवले होते. रचनाने गेल्याच महिन्यात काळ्याच रंगाची वॅगन-आर घेतली. मी चुकुन सँट्रोला मोठी बहिण झाली असे लिहिले. त्यावर त्यांचे उत्तर-
आरती- हो ? कस्स्काय ? पण जबर्‍या !!!

रचना- सहीSSSSS लेकीन येह सँट्रो कौन है भाय ? काळा रंग बाबांना सांगितलास का ?

हे लिहिताना रचना खुदुखुदु हसत असणार आणि तिच्या नव्या गाडीवर बाबांनी टाकलेला तु. क. आता मला झेलावा लागणार ह्या विचाराने तिला आसूरी आनंद होत असणार हे मला शंभर टक्के माहिती होते.

आई आदल्या दिवशी भेटली नाही म्हणुन मी परत फोन केला.
मी, "आई..."
ती, "ह्म्म मला कळालं नवी गाडी घेतली...रचनाने सांगितलं मला..."
मी, "रचनाने ? अगं मी काल बाबांना फोन केला होता...त्यांनी नाही का सांगितलं ?"
ती, "अगं बाई काही बोलले नाहीत मला. बाबांचं हे असंच आहे. बागेत घोसाळ्याला घोसाळी लागली की सगळ्या गावाला बातमी आणि महत्वाचं ते सांगायच नाही. आता घोसाळ्याला घोसाळी नाहीतर काय आंबे लागणारेत ?" इथे मी काहीच बोलत नाही. मागे एकदा मी आईची बाजुन घेउन कायसं म्हणाले तर बाबा दुसर्‍या लाइनवर ऐकत होते.
मग आईच पूढे म्हणाली, "छाssssन झालं...आम्हाला आपली काळजी वाटते रोज बातम्या ऐकुन...तुम्ही नवी गाडी घेतली म्हणजे मग आम्हाला चिंता नको. रंग कुठलाय ?"
मी, "काळा"
आई, "तरीच बाबा काही बोलले नाहीत बरका. काळा का घेतला ? बाळाला आवडेल असा घ्यायचा ना."
आता आजीबाईंचा नातू आहे सव्वा वर्षाचा. त्याला आवडणारे रंग म्हणजे भडक लाल, पिवळा, निळा. अशा रंगाची गाडी घ्यायची का ? पण त्याच्या आजीला कोण समजावणार. मांजराच्या गळ्यात घंटा !!!

नवरा आणि त्याचा मित्र. ह्या दोघांनी संगनमताने पहिल्या महागडया गाड्या घेतल्या होत्या. प्रत्येकवेळी भेटल्यावर आपापल्या गाडीच्या कौतुकात तासनतास घालवले होते. त्याने ही थोडे दिवसांपुर्वीच पहिली गाडी विकुन "क्यामरी" घेतलीये.
हा, "हाय.."
तो, "क्यु बे साले बाप बन गया तो फोन करना बंद कर दिया.."
हा, "तु है ना लाइन मे..सब समझ जायेगा..."
तो, "हा यार...मेरी बिवी तो अभी से मम्मी मोड मे आ गयी है | मै फस गया यार तीन तीन मम्मीयों के बीचमें |" तीन मम्म्या म्हणजे ह्याची आई, सासू आणि बायको.
हा (अत्यंत केवीलवाण्या आवाजत), "अच्छा सुन, कल नयी गाडी ले आये यार.."
तो, "अबे तो रो क्यु रहा है ? कौन सी ?"
हा, "होंडा ऍकॉर्ड.."
तो, "साला देसी...आ गया ना औकात पे..."
आणि मग इशान दचकुन उठला इतकं हा मोठ्याने हा हा हा करुन हसला !!!

प्रकार: 

आता हिचा नातू आहे सव्वा वर्षाचा. त्याला आवडणारे रंग म्हणजे भडक लाल, पिवळा, निळा. >>>>
Lol

सिंडे....सही लिहिलंयस!
ती, "ह्म्म मला कळालं नवी गाडी घेतली...रचनाने सांगितलं मला..."
मी, "रचनाने ? अगं मी काल बाबांना फोन केला होता...त्यांनी नाही का सांगितलं ?"
ती, "अगं बाई काही बोलले नाहीत मला. बाबांचं हे असंच आहे. बागेत घोसाळ्याला घोसाळी लागली की सगळ्या गावाला बातमी आणि महत्वाचं ते सांगायच नाही. आता घोसाळ्याला घोसाळी नाहीतर काय आंबे लागणारेत ?" >>>>:फिदी:

मस्त लिहिलंयस....

तो, "साला देसी...आ गया ना औकात पे..." >> हे एकदम आवडलं (आणि पटलं laughing.gif)

आणि स्पोर्टस कार विकून अ‍ॅकॉर्ड का घेतली? wink.gif
पण काळी घेतली ते चांगलं केलं.. काळ्या गाड्या जबरी दिसतात...

>>>>> मै फस गया यार तीन तीन मम्मीयों के बीचमें |" तीन मम्म्या म्हणजे ह्याची आई, सासू आणि बायको.
मला हे पटल! Proud
छान लिहिलय ग! Happy
(फक्त गाड्यान्च्या मॉडेल्स्मधील फरक माहितीच नसल्याने त्यातला पन्च आधी जाणवला नाही)

हाय गाडी मुबारक. बेबी सीट घेतली? मला काळीच गाडी आवड्ते. आम्ही बेबी सिटिन्ग करतो तुम्ही लॉन्ग ड्राइव ला जा ना. इन्जीन मस्त आहे का? म्हंजी पावर बाज?

उगी उगी सिंडरेला . आम्ही तुझ्या आनंदात सहभागी आहोत . Proud
हे तू रंगीबेरंगी पेक्षा " कोणाशी तरी बोलायचेय " मध्ये का नाही हलवलेस ????? Wink Proud

>>हे तू रंगीबेरंगी पेक्षा " कोणाशी तरी बोलायचेय " मध्ये का नाही हलवलेस ????>>>>
हे म्हणजे कुणाला कशाचं आणि संपदाला रंगिबेरंगीचं ... असं झालं Lol

नाही ना देता येत . Proud मायबोलीचा अभ्यास नीट नाहीये बरंका तुमच्या दोघींचा . Wink ( आता मात्र दिवा घ्या खरंच . )
असो, सिंडरेला ( तिच्या सकाळी )येऊन आपल्याला हाकलण्याच्या आधीच मी पळते .

अभिनंदन......... जबरी!

आमची पण एक न घेतलेली गाडी!

परवाच मी इथे एक गाडी बघितली. अन अ‍ॅड्व्हान्स पण दिला ........फोर्ड फियेस्टा....(मला मोठ्या लांबीच्या गाड्या चालवायला अजुन फारसे जमत नाही! पार्किंग तर अजिबात नाही! माझ्याकडे अल्टो होती भारतात.)

तर आज पुर्ण पैसे देउन गाडी ताब्यात घ्यायची होती. फुल्ल मजेत होतो, चंपी ने गुलाब जामुन तयार करायला घेतले होते अन, ती गाडी येणार म्हणुन पुजा साहित्य घेउन घरी तयार ही झाली होती....

मी ऑर्कुट वर २ दिवसापुर्वी च जाहीर ही करुण टाकले होते.........!

आज तिकडे गेलो, अन त्या डीलर ने चक्क गाडी द्यायला नकार दिला...... तो म्हणे सोल्ड आउट!

हिकडे आम्ही बोल्ड आउट...........!

आता नेक्ष्ट टाइम..... ठरवली कि लगेच ताब्यात घ्यायची! Happy

@संपदा, दिवा घेतला असता पण काय आहे ना "हे" काम करतायत हाफिसच, बाळ रडतय आणि हो गाडी नाहिये ना बाहेर जाऊन दिवा आणायला Wink तू आणुन देशील का प्लीज बाहेर जाशील तेव्हा, तुझ्या सवडीने आण पण जरा अर्जंट Wink Proud

आता घोसाळ्याला घोसाळी नाहीतर काय आंबे लागणारेत >>
खुप हसले... आमचं घोसाळ्या झाड समोर दिसलं आंबे लागलेलं Happy

बाकी मस्तच लिहलयंस..........

गाडी चा फोटो टाक$$$$$$$$$........

n by d way .......

Black is not a color. "Color is a matter of taste and of sensitivity.
- Edouard Manet

मस्तच !!!!!!!!

कवे Lol

ए बायांनो, सिंडीचं टीआरपी का कमी करताय? Wink

सिंडे, खुसखुशीत लेखन Happy काळ्या रंगाचा एलीगन्स लोकांना का कळत नाही? Uhoh
हॅपी ड्रायव्हिंग Happy

अरेरे चम्प्या, तुझ्या दु:खात सहभागी हे
(तरी जुनी लोक सान्गुन गेलीत की शुभ कामाची फार जाहिरात करु नाई....) असो
बाकी तुझा झब्बूपण भारीच बरका!
पण मग ते गुलाबजामुनच काय झाल? केले की नाही? Happy
[की चम्पीने तुझ्या डोक्यावर थापले? Proud ]

नवीन गाडीत खिडकीशेजारी बसून गुलाबजाम खायचा विचार होता चंप्याचा..
बिचार्‍याने घराच्या खिडकीत बसून खालले असावेत. Wink

मस्त लिहिलय.

>> मागे एकदा मी आईची बाजुन घेउन कायसं म्हणाले तर बाबा दुसर्‍या लाइनवर ऐकत होते. D Lol Lol
>> बाळाला आवडेल असा घ्यायचा ना. Proud Proud Proud
>> मेरी बिवी तो अभी से मम्मी मोड मे आ गयी है... साला देसी...आ गया ना औकात पे..." Biggrin Biggrin Biggrin

Any customer can have a car painted any colour that he wants so long as it is black.
- Henry Ford

धन्यवाद मंडळी Happy एक सांगायचच राहिलं, ही गाडी घेऊन आणि लेख लिहुनही आता वर्ष झालं. अप्रकाशित ठेवला होता तो काल प्रकाशित केला Happy

संपदा, काळा आणि पांढरा अशा दोन रंगांचा उल्लेख आला असल्याने रंगीबेरंगी हे सदर योग्यच आहे Wink

मामी, V4 आहे इंजिन. फ्युएल एफिशिएंट म्हणून घेतलीये पण चालवण्यात ती मजा नाही Sad

बाकी ह्यातले सर्व संवाद वगैरे अजिबात काल्पनिक नाहीत Proud

मस्त लिहिलय ,
V4 आहे इंजिन. फ्युएल एफिशिएंट म्हणून घेतलीये पण चालवण्यात ती मजा नाही >>> एकदम खरं V6 ची मजा V4मध्ये नाही

Pages