दरवाजा भाग ७
“नाही, असिफ. आज जोपर्यंत माझ्या मनात काय आहे ते तुला सांगत नाही, तोपर्यंत मी इथून जाणार नाही... गेल्या पंधर्रा वर्षातील प्रत्येक क्षणाचा हिशोब तुला दिल्याखेरीज मी आज जाणार नाही....”
“मला काहीही ऐकायचं नाहिये. रेश्मा, मी आता शेवटचं सांगतो... प्लीज इथून जा” असिफ तिच्याकडे पाठ वळवून खुर्चीमध्ये बसला
“असिफ, एकदा फक्त मला बोलू देत.. फक्त एकदा. ऐकून घे”
असिफनं पुढ्यातलं स्केचबूक उघड्लं. काहीही गरज नसताना पांढर्य़ा कागदावर निळ्या पेन्सिलीनं रेघोट्या काढत बसला. रेश्मा दोन मिनिटं शांतपणे बसून राहिली.