रेहान - कव्हर पेज
रेहान : कादंबरी.
लेखिका: नंदिनी देसाई.
छायाचित्रः जिप्सी (योगेश जगताप) आणि नदीम शेख.
कव्हर पेज डीझाईनः प्राजक्ता पटवे-पाटील.
मायबोलीवर मी लिहिलेली मोरपिसे ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आठवत असेल. तब्बल चार वर्षे लावली होती ती कादंबरी पूर्ण करायला. मात्र, इतक्या तुकड्या तुकड्यांतून लिहिताना कथानक भरकटलं होतं, परिणामी तेच कथानक व्यवस्थित मोट बांधून विस्तारित स्वरूपामध्ये लवकरच पुस्तकरूपाने प्रकाशित करत आहे.
मायबोलीकरांनी कायमच माझ्या लेखनाला उत्तम प्रोत्साहन दिलेले आहे, आता या नवीन प्रकल्पासाठीदेखील असेच प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा.