ती आज कित्येक वर्षांनंतर संध्याकाळी घरी होती. तिला संध्याकाळी दारात बघून नानी सुद्धा चक्रावून गेल्या. कित्येक वर्ष त्यांना ती नसण्याची सवयच झाली होती. ती, नंदिनी राजाध्यक्ष, एक यशस्वी उद्योजिका. स्वकर्तृत्वावर, स्वबळावर आज तिने अत्यंत ताकदीने स्वतःचा उद्योग फूड इंडस्ट्री मध्ये उभा केला होता. देश-विदेशात तिच्या कंपनीची उद्पादने, बाजारपेठेत दिमाखात मिरवत होती. नंदिनीला प्रश्न विचारलेले आवडणार नाहीत हे नानी ओळखून होत्या. त्यांनी चहा करायला घेतला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नंदिनी आवरून आली. त्यांनी तिच्यापुढे चहा ठेवला. फारसा काहीही संवाद न होता चहा संपला.
लिहायला आज वेळ मिळाला मला. घटनाच अशी आहे....
भाऊंना जाऊन महिना झाला. आज जाणार उद्या जाणार करत करत भाऊ गेले शेवटचा श्वास घेऊन. जाताना फ़ार त्रास झाला त्यांना, माझ्यामधेच जीव अडकला असणार त्यांचा...भाऊचे दिवस म्हटले तर घातले आणि म्हटले तर नाही. काकाने सगळं करायचं म्हणून केलं पण काकूची धुसफ़ुस चालूच होती. चौदाव्याला जेवायला मोजून पाच ब्राह्मण बोलावले होते.
भाऊ गेल्यापासून या घरामधे आता मी कायमची अनाथ झाले होते. घरकामाची आयती मोलकरीण. काकू मला आता शाळेत जायची काही गरज नाही हे आडून आडून सांगतच होती. त्यात परत काकाने...
आश्रमापाठीमागच्या बागेमधे मी अभ्यास करत बसले होते. कुण्या पाटणकर नावाच्या माणसाची ही आंब्याची बाग होती. ऑक्टोबर महिना चालू होता. नुकताच पावसाळा संपल्याच्या हिरव्याशार खुणा अजून सगळीकडे पसरल्या होत्या. रविवारचा दिवस होता. माझी बीजगणिताशी थोडी खटपट चालू होती. साईन कॉस वगैरे जरा जास्तच त्वेषात लढत होते. वर्गात अजून शिकवलं नव्हतं. पण सर शिकवेपर्यन्त थांबण्यापेक्षा आपलं आपण समजून घेता आलं तर बरं कारण गणित हा माझा नंबर एकचा शत्रू होता. भाषा इतिहास भूगोल कधी समजायला अडचण यायची नाही, पण गणित विद्न्यान हे मात्र गेल्या जन्माचे वैरी होते माझ्या.
कर्कश वाजणार्या फोनमुळे साराला जाग आली. बेडवर उठून तिने उशी खालचा मोबाईल शोधला, पण मोबाईल तिथे नव्हता, कसेबसे डोळे चोळत ती बेडवरून उठली, आणि वाजणारा मोबाईल नक्की कुठे वाजतोय ते बघायला लागली. मोबाईल नेहमीप्रमाणे किचनमधे मायक्रोवेव्हवर होता. झोपेतच तिने फोन घेतला “हॅलो” ती म्हणाली.
पलिकडे नक्की कोण होतं हे माहित नाही, पण धनु, बॉलीवूड, न्युजपेपर असले शब्द ऐकून हा रॉंग नंबर नाही, इतकं तिच्या लक्षात आलं. पलिकडचा माणूस जाम वैतागलेला होता, तमिळमधून काय बडबडत होता, ते मात्र तिला अजिबात समजलं नाही.
समुद्र विशाल असतो, अमर्याद असतो, अथांग असतो.
पण प्रत्येक समुद्राला एक किनारा असतो...
आणि तो किनारा त्या समुद्राला थोपवून धरतो. हा किनारा त्या समुद्राची सीमा असतो.
किनार्याकडे स्वत:ची काहीच शक्ती नसते. बघायला गेलं तर जमिनीचा एक तुकडा...
पण समुद्राला थांबवायची कला मात्र त्या किनार्यामधे असते.
किनारा.... त्या समुद्रासाठी विश्रांतीचं शेवटचं ठिकाण.
किनारा.... त्या समुद्राची अखेर.
किनारा.... त्या समुद्राची सुरूवात....
घणाघाती येणार्या लाटांशी सतत युद्ध खेळत किनारा तिथेच असतो, अविचल, अविरत.
ही कथा माहेर मासिकाच्या फेब्रूवारी २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. मायबोलीवर पुनर्प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल माहेर मासिकाचे आभार.
=================================================
रात्रीचे नऊ वाजले असावेत. खरंतर मला भूक लागली होती पण माझ्या टीममेट्सचे ड्रिंक राऊंड्स अजून काही संपले नव्हते. हॉटेलमधल्या त्या मंद प्रकाशात मला का कुणास ठाऊक अजूनच उदास वाटत होत.. तसं उदास व्हायचं काहीच कारण नव्हतं. पण तरीही..
"रिया, चल ना." मी पुन्हा एकदा रियाला आवाज दिला. कुणाशी तरी फोनवर बोलण्यात ती गुंग झाली होती. हातानेच खूण करून तिने मला "दोन मिनिटे" असे सांगितले.