(लेकाने हा फोटो पाठवला. Peter Iredale ही बोट 1906 पासून ऑरगॉन किनाऱ्यावर रुतून बसली आहे. अजून तिचे अवशेष तिथे आहेत. तिचा हा फोटो. तो बघून मनात आलं ते हे.
जरा विचित्र रचना होत गेली. कडव्यांची मधली ओळ बेस, वरच्या खालच्या 2-2 त्यावर आधारित. सो दोन प्रकारची यमकं)
टरारा फाटल
फडकतं शिड
कायाच्या चिंधड्या
मोडली डोलकाठी
भंगली होडकी
सफरीचा रोमांच
उडवला कधीच
रौद्र वादळाने
समुद्राची आसक्ती
उतरवू पाहिली
मायबोलीकर म्हाळसाने प्रियदर्शिनी पार्क बद्दल सुचवले. तिथल्या सुंदर अनुभवाचा मायबोलीवर धागा काढला. तिथे प्रतिसादात मायबोलीकर शरदजी (Srd) यांनी जवळच्याच त्याच समुद्र किनार्याला लागून असलेल्या अजून एका गार्डनचे नाव सुचवले. गूगल केले. छान वाटले. म्हटले चला भेट देऊन येऊया.
ते गार्डनही मुलांसाठी छान वाटल्याने म्हटले चला याची माहितीही पुन्हा फिरून मायबोलीकरांशी शेअर करूया. त्यातून अजून काही सापडेल
.
व्हॉटसपवर स्टेटस टाकले
आणि सोबत खालील फोटो टाकला
१) Guess The Place??
Somewhere in Mumbai
मझ्या फ्रेंडलिस्टमधील निम्मी जनता परेशान.
किधर है भाई, किधर है ...
मग तासाभराने दुसरा फोटो टाकला.
२) Same Place... Any guesses ??
अर्ध्याअधिक जनतेचा एकच अंदाज
RHTDM ???
गहराइयां चित्रपट बघितल्यावर जुन्या पहिल्या जॉज चित्रपटातील एक सीन आठवतो. डबडया बोटीतून शार्क ची शिकार करायला टीम निघाली आहे. सागरात कुठेतरी एका पाठला गानंतर टीम सुस्तावली आहे. शेरीफ मागील बाजूस बसून अॅबसेंट ली एक एक मांसाचा तुकडा आमी ष म्हणून शार्क ला टाकत आहे. एक प्रकारचा साचले पणा येतो आपणही शांततेत गुंगत जातो व अचानक ज्या शार्कची शिकार करायची आहे तो अगदी अगदी जवळ येउन मांसखंड गट्टम करतो व पाण्यात गायब होतो. शेरिफ व आपणही दचकून मागे होतो. हे जीवघेणं संकट जवळच फिरत होतं आणि आपण किती निवां त होतो.
घाट उतरून मुंबई गोवा रस्त्याला लागलं कि कोकण आपले रूप दाखवू लागतं. गर्द हिरवाइतून वळणे घेत जाणारा रस्ता , मधूनच डावीकडे आणि उजवीकडे दिसणार्या डोंगर आणि दर्या.. आणि रंग फक्त दोनच. धरित्रीचा हिरवा आणि आकाषाचा निळा.. आणि हो.. मातीचा तांबडा. निसर्ग मनुष्यावर इतका खूष आहे इथला कि , तुम्ही कॅमेरा कसाही कुठेही धरून क्लिक करा , येणारा फोटो कुठल्याही स्पर्धेत सहज इतर फोटोंना मागे टाकेल.
मी प्रथम कोकणात , गुहागरला गेलो मित्रांसमवेत , मित्राच्याच घरी... १९८५ मधे.
अगदी आपण कोकणतलं घर म्हणून जे सर्व ऐकलेलं असतं , ते सारं आहे त्या घरात. खालच्या पाटातलं हे १०० वर्षे वयाचं कौलरू घर . पडवी , सोपा , झोपाळा , माजघर , देवघर इतर खोल्या...मागे परसात विहीर , नारळ , सुपारी ची शेकडो झाडं... आणि त्या मागे थेट पुळण आणि अथांग पसरलेला , डोळ्याला फक्त आणि फक्त निववणारा सागर... सतत गाज देऊन आधाराची भक्कम जाणीव करून देणारं त्याचं अस्तित्व !
एका लहान मुलीने मला तिच्या मैत्रिणींबरोबर समुद्रावर बोलावलं. अगदी पोचल्या दिवशीचीच गोष्ट. मी सगळा जामानिमा बरोबर घेतला. स्विमिंग सूट घातला, पाण्यापाशी जाईपर्यंत वरून घालण्यासाठी जवळपास शरारा वाटेल असा स्कर्ट चढवला, पंचे वगैरे गोळा केले... मग त्या मुलीचे आई-वडील शोधून तिला समुद्रावर नेत्ये असं सांगायचं आणि फटावळ पोहायला न्यायची असं ठरवलं होतं. आवरून मी खाली उतरले तेव्हा तिच्या आईनेच मला तिचा निरोप कळवला : “तू येईपर्यंत आम्ही पोहत जिथवर पोचलो असू तिथे येऊन भेट!” त्या मासळ्या कधीच पाण्यात उतरल्या होत्या.
अथांग हा तुझा देह न पुरे या लोचनी
नजर होते सैरभर पहातो श्वास रोखुनी
तळाची परिसीमा भिडते हृदयाच्या अंतरी
भासते नववधू प्रिये समान तू या भूवरी
मंथनाच्या डोहात जग हे सामावलेले
निळाशार स्पर्शात शरीर आसुसलेले
उत्कटतेच्या परमबिंदूत मन शहारलेले
जसे दिवस नि रात्र भेटीस आतुरलेले
कोकणात मुरूड-जंजिरा ट्रिपला जायचा प्लॅन केलाय. बरोबर लहान मुलं असल्याने जंजिर्यावर जायचा विचार नाहीये.
पण मुरूडला नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेने काळजीत पाडले आहे. तो समुद्रकिनारा सुरक्षित आहे का?
साधारणपणे बीचवर जातांना काय काळजी घ्यायला हवी? भरती/ओहोटी चे टाईमटेबल आधी कळते का? ऑनलाईन शोधले पण मुंबईचे मिळाले फक्त.
प्लिज टिप्स द्या. पहिल्यांदाच लहान मुलांना घेऊन जात आहे.
********************************************************************************************
खूप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद लोक्स
अवेळी पाऊस, एकटेपणा आणि कंटाळा मिळून एकच गोष्ट होऊ शकते.. एन्जॉय ☺