प्रियदर्शिनी पार्क - मुंबईच्या समुद्रकिनारी लपलेली एक सुंदर जागा - (फोटोंसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2023 - 13:37

.
व्हॉटसपवर स्टेटस टाकले
आणि सोबत खालील फोटो टाकला

१) Guess The Place??
Somewhere in Mumbai

01_2.jpg

मझ्या फ्रेंडलिस्टमधील निम्मी जनता परेशान.
किधर है भाई, किधर है ...

मग तासाभराने दुसरा फोटो टाकला.

२) Same Place... Any guesses ??

02_2.jpg

अर्ध्याअधिक जनतेचा एकच अंदाज

RHTDM ???

(अधिक माहितीसाठी माधवन आणि दिया मिर्झाचा रेहना है तेरे दिल मे बघा. ज्यात माधवनने अश्याच एका जागेचा "मुंबई की मेरी सब से फेव्हरेट जगह" असा उल्लेख केलेला)

मग मी कोणाची फार परीक्षा न घेता त्यांना खरे काय ते उत्तर दिले.

खरे तर मी स्वतः जन्मापासून मुंबईकर असूनही आणि या जागेच्या प्रवेशद्वारापुढून कित्येक वेळा गेलो असूनही आत ईतकी सुंदर जागा आहे याची मला कल्पना नव्हती. तर मग ईतरांनी न ओळखल्यास नवल नव्हते. लाज तर मलाच वाटावी अशी ही गोष्ट होती.

तर झाले असे,

मुंबईचे घर पुन्हा ताब्यात आले, आईवडिलांनी तिथे राहायला सुरुवात केली. तसे आम्हा नवी मुंबईकरांच्या मुंबई वार्‍या सुरू झाल्या.

आला विकेंड, ऊचलली बॅग, पळालो मुंबईला.

आता दर विकेंड मुलांसोबत मुंबईला जातोय तर त्यांना शनिवार-रविवार सकाळ-संध्याकाळ फिरवणे आलेच. राणीबागेपासून जी सुरुवात झाली ते गेटवे ऑफ ईंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, हँगिग गार्डन सोबत कमला नेहरू पार्क, एके दिवशी वरळी सीफेस, तर कधी दादर परीसर, झाल्यास जवळचाच भाऊचा धक्का आणि नाक्यावरचाच माझगावचा डोंगर हे सारे एकापेक्षा जास्त वेळा फिरून झाले. सुदैवाने आमचे घर या सर्व जागांच्या केंद्रबिंदूवर असल्याने जाण्यायेण्याच्या दृष्टीने सारे सोयीचे पडायचे. पण मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मुंबईतली वाढती गर्मी पाहता त्यांना मुंबईत आणखी कुठे कुठे फिरवायचे ही समस्या आणखी बिकट होऊ लागली.

अश्याच एका शुक्रवारी, मध्यरात्र उलटून गेली असताना, उद्या कुठे जायचे या विवंचनेत झोप येत नसताना, आपली मायबोलीकर म्हाळसा, देवीसारखी मदतीला धाऊन आली. (तिच्याकडे तेव्हा दुपार असते.)

तर व्हॉटसपवर तिचा मेसेज आला. आणि तिने ही जागा सुचवली. म्हणाली, छान दिसतेय. मी ही कधी गेले नाही. तू ने तुझ्या पोरांना आणि मला त्यांचा फिडबॅक दे. त्यांना आवडली तर मी सुद्धा भारतभेटीत माझ्या पोरांसोबत जाईन असे म्हणून अंतर्धान पावली.

प्रत्यक्षात ती जागा मला आणि माझ्या पोरांना ईतकी आवडली की महिन्याभरात आम्ही तिथे तीनदा जाऊन आलो. पोरांनाच नाही तर बायकोलाही सोबत घेऊन गेलो. कारण जागा केवळ पोरांनाच आवडेल अशी नव्हती तर तिला एक रोमांटीक टच सुद्धा होता Happy

चला तर मग त्या जागेची, म्हणजेच प्रियदर्शिनी पार्कची, एका दिवसाची सैर करूया Happy

३) दुपारी कडक ऊन असते, काही हरकत नाही. पार्क सकाळी ६ वाजता ऊघडते. मॉर्निंग वॉकलाच बाहेर पडूया. जरा ऊशीर झाला तरी ऊन कोवळंच मिळेल Happy

03_2.jpg
.

४) हे गेटमधून आत शिरल्यावरचे पहिले द्रुश्य. पण फोटो मात्र आम्ही निघताना टिपला आहे. ईथेच गेटच्या आत स्नॅक्स कोल्ड्रींकचा स्टॉल आहे. तिथेच आईसक्रीम खाता खाता क्लिक केला.

04_2.jpg
.

५) तिथून लहान मुलांच्या गार्डनला जाणारा रस्ता. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करणारी मंडळी ईथून भेटायला सुरुवात होईल.

05_2.jpg
.

६) पोहोचलो. हेच ते गार्डन. समुद्राच्या बाजूने नारळाच्या झाडांनी आच्छादलेले.

06_2.jpg
.

७) आजकाल कुठल्याही गार्डनमध्ये हे ऑल ईन वन स्लाईडस असते आणि मुलांना खेळायला पुरते. ईथेही अपवाद नाही.

07_2.jpg
.

८) सोबत झोके आहेतच!

08_2.jpg
.

९) पण आम्हाला चार झोके झाल्यावर मातीतच खेळायला आवडते Happy

09_2.jpg
.

१०) हे एक मचान आहे. पण साधेसुधे नाही तर महान आहे. याच्या मधोमध एक झाड प्रगट झाले आहे.

10_2.jpg
.

११) पोरांना काही एडवेंचरस हवे असल्यास... त्याचीही सोय आहे.

11_2.jpg
.

१२) खेळून मन भरले की समुद्राच्या कडेकडेने वॉकला निघायला हरकत नाही.

12_2.jpg
.

१३) बारकाईने पाहिले तर आपल्या रंग बदलण्याच्या शक्तीचा गैरफायदा उचलत झाडांवर असे सरडे लपलेले दिसतात. पण चालता चालता रस्त्यावरच्या मुंग्या टिपणारी आमची पोरं, त्यांच्या नजरेपासून ईतके अजस्त्र प्राणी लपणे अवघडच.

13_2.jpg
.

१४) चला तर मग वॉकचा आनंदम लुटत अजून पुढे जाऊया

14_2.jpg

१५)
15_2.jpg
.

१६) छान स्वच्छ आणि शांत रस्ते वाटत आहेत ना. सोबत नजरेला सुखावणारा समुद्र. कानावर अलगद आदळणारा लाटांचा आवाज. आणि अंगावर येणारी थंडगार खार्‍या वार्‍याची झुळूक... मॉर्निंग वॉकचे सुख सुख म्हणतात ते हेच Happy

16_2.jpg
.

१७) हा क्षितिजाकडून येणारा उताराचा रस्ता आम्हाला ईतका आवडला आहे की लेकीने पुढच्यावेळी ईथे नाचाची ईन्स्टा रील बनवायचे ठरवले आहे.

17_1.jpg
.

१८) हे आतले स्पोर्टस कॉम्प्लेक्स. ईथे आत शिरायला पैसे भरून मेंबरशिप घ्यावी लागेल.

18_1.jpg
.

१९) या बाहेरच्या हिरवळीचा आनंद मात्र मोफत लुटू शकतो.

19_0.jpg
.

२०) अरे हो, हा खालील फोटो टिपल्यावर या रस्त्यावर आम्हाला एक ऊच्चभ्रू कुत्र्यांची जोडी दिसली. मला कुत्र्यांमधील फारसे म्हणजे काहीच कळत नाही. पण ते चक्क क्यूटसे कोल्हेच वाटत होते. त्यांचेही फोटो मालकाची परवानगी घेत काढायला हवे होते असे आता वाटतेय. पण असो, पुढच्यावेळी... त्यांना टाटा बाय बाय करत आम्ही आमची प्रभातफेरी संपवून तिथून निघालो.

20_1.jpg
.

चला तर मग, आता संध्याकाळची मजा बघूया. संध्याकाळचे फोटो बघूया.

पण जी मजा फोटोत समजणार नाही ती म्हणजे या गर्मीच्या सीजनमध्ये जिथे दिवसभर वार्‍याच्या नावावर गरम वाफ झेलावी लागते. तिथे या ठिकाणी मात्र संध्याकाळच्या वेळी बेफाम बेछूट थंड वारे सुटले होते. जणू आपण वेगळ्याच अवकाशात प्रवेश केला असे गार्डनमध्ये पहिले पाऊल ठेवताच वाटू लागले.

२१) ही तीच सकाळची मचान, आता संध्याकाळच्या संधीप्रकाशात न्हाऊन निघाली आहे.

21_0.jpg
.

२२) हे तिथून टिपलेले बागेचे विहंगम दृश्य.

22_0.jpg
.

२३) आणि हे ही तिथूनच, पण समुद्राच्या दिशेने, नारळीच्या बागांचे..

23_0.jpg
.

२४) त्याच नारळाच्या बागेत संध्याकाळचे मतलई वारे खात बसलेली एक फॅमिली..

24_0.jpg
.

२५) सोबत पफकॉर्न खाणारी खारूताई

25.jpg
.

२६) चला थोडे ऊन कमी झालेय तसे समुद्राकडे जाऊया

26.jpg
.

२७) समुद्राचे वारे आता थेट खाऊया Happy

27.jpg
.

२८) हा अस्सा पसरलेला समुद्र दिसतो समोर

28.jpg
.

२९) की जणू सुर्यही आपला सोबती वाटतो.

29.jpg
.

३०) वारा ईतका की बारक्या पोरांचेही केसं ऊडतात

30.jpg
.

३१) लोकं घरच्यासारखे मिळेल ती जागा पकडून पसरतात.

31.jpg
.

३२) कारण समोरचे द्रुश्यच ईतके भन्नाट आणि विलोभनीय असते.

32.jpg
.

३३) समुद्र! समुद्र! समुद्र!... हिच तर मजा आहे मुंबईची Happy

33.jpg
.

३४) एक दगड पकडून आपल्यालाही तो जवळून बघायचा मोह आवरत नाही.

34.jpg
.

३५) काहींना पुढे जाऊन त्याला स्पर्श करावेसे वाटते. पण तुम्ही थोडे अंतर राखण्यातच धन्यता मानता.

35.jpg
.

३६) पण मग तो स्वतः तुम्हाला स्पर्श करायला पुढे सरसावतो Happy

36.jpg
.

३७) पण जर तुम्ही आधीच त्याच्या ओढीने पुढे गेलात....

37.jpg
.

३८) तर मग जरा जपून...

38.jpg
.

३९) हे असे होण्याची दाट शक्यता असते.
लगेचच ती धोक्याची घंटा, परतीचा इशारा समजावा...

39.jpg
.

४०) जर तुमच्यासोबत तुमची प्रेयसी/प्रियकर नसेल, तर मावळत्या सुर्याला निरोप देऊन घरी परतायला हरकत नाही.... पुढची मजा प्रेमी युगुलांना करू द्यावी. बाकी तसा त्यांचा ऊच्छाद ईथे कुठे दिसला नाही हे विशेष.

40.jpg

------------------------------------------------

खालील नकाश्यात जवळपासच्या फिरायच्या जागा हायलाईट केल्या आहेत. आम्ही खादाडीसाठी माझगाव, भायखळा, गिरगाव चौपाटीचा रस्ता धरल्याने जवळच्या खाऊगल्ली ठिकाणांची कल्पना नाही.

४१) नकाशा क्रमांक १

41 pdp map 1.jpg

४२) नकाशा क्रमांक २

42 pdp map 2.jpg

------------------------------------------------

Priyadarshini Park

Address: Nepean Sea Rd, Malabar Hill, Mumbai, Maharashtra 400006

Timing: 6–11 am, 4–9 pm

धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sparkle, राज धन्यवाद Happy

नवलकरांनी बांधलेलं नाना-नानी पार्क आहे ना? >>> अच्छा, प्रमोद नवलकरांनी का? चेक करावे लागेल. मला आयड्या नाही.

जानेवारीपासून चार वेळा गेलो इथे.
सुंदर जागा. पण कोस्टल रोडने (पूलाने)बागेचा उत्तर कोपरा कापला गेला आहे. [समुद्राकडे जाण्याचा मुंबईत हाच एवढा चांगला भाग उरला आहे. महालक्ष्मी मंदिराचा मागचा समुद्र आमचा लहानपणापासूनचा आवडता होता. पण ताज'च्या हल्ल्यापासून तो बंद केला. तिथले भजी हॉटेलही गेले].

उन्हाळ्यासाठी चांगली जागा. टॉइलेट आहे. खाण्याचा स्टॉल आहे. (पण यासाठी मुंबई मनपाने नोटीस पाठवली आहे. बागेची मालक मनपा आणि संयोजन खाजगी स्थानिक गटाचे आहे.)

कसे जावे? इथे!! मुंबईत!! पार्कींग नाही. त्यामुळे बस/टॅक्सी हा पर्याय वापरावा.
ग्रांट रोड स्टेशनहून बेस्ट बस एसी १३५ (जे.मेहता मार्ग)फ्रिक्वेन्सी पंधरा मिनिटे
मुंबई सेंट्रल स्टेशनहून बेस्ट बस एसी ६३(जे.मेहता मार्ग) फ्रिक्वेन्सी पाच मिनिटे . भायखळा स्टेशन प. ते -मुंबई सेंट्रल स्टेशन - ताडदेव -हाजीअली-महालक्ष्मी मंदीर- ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल -पारसी जेनरल हॉस्पिटल -प्रियदर्शनी पार्क- जे.मेहता मार्ग.

इथून बागेजवळच्या सिग्नल वरून डावीकडे वर जाणारा रस्ता चालत दहा मिनिटे हँगिंग गार्डनपाशी जातो. टॅक्सीने दीड किमी.समोर कमला नेहरू पार्क. (तिथून गगनगिरी महाराज मार्गाने चालत खाली उतरले की गिरगाव चौपाटी. दहा मिनिटांत)

कमला नेहरू पार्क ते आर सी चर्च बस नं १०६ एसी.
वाळकेश्र्वर (बाणगंगासाठी )-चौपाटी-चर्चगेट स्टेशन -हुतात्मा चौक-म्युझीअम-(गेटवेओफइंडियासाठी)-कुलाबा डेपो (कपडे खरेदी)-आर सी चर्च .
कमला नेहरू पार्क ते सीएसएमटी बस नं १०८. वाळकेश्र्वर -चौपाटी-मरीन ड्राईव-विधानभवन-म्युझिअम-सीएसएमटी.
-------
या प्रियदर्शनी पार्क पासून जवळ (पारसी जेनरल हॉस्पिटल बस स्टॉप)अमरसन्स पार्क /मरीन महिंद्र पार्क आहे. हे सुद्धा खूप चांगले होते. पण कोस्टल रोडचे चार पूल समोर टाकल्याने समुद्र किनारा गेला.
-------------
बाइदवे. परवाच बॅप्टिस्टा गार्डन- माझगाव /डॉकयार्ड स्टेशन इथे गेलो होतो. बरेच विविध पाम्स पूर्वी होते ते आता गायब आहेत. बाकी उन्हाळ्याचा परिणाम झाडांवर दिसत आहे. तरीही छान बाग. मोठ्यांसाठीही झोपाळे लावले आहेत.

-----------
मुंबईतील ठिकाणांची ओळख देत आहेस ऋन्मेऽऽष. छान. फोटो छान. एक लोखंडी शिल्प आहे तो फोटो राहिला.

अरे वा.. धागा आला Happy
ह्यावेळेस भारतात आले की इथे एक चक्कर मारायचीच आहे.. गेल्या वेळेस मुलींना घेऊन गेटवेला गेलेले.. किच्चाट गर्दी होती.. तीथे न जाता आता प्रियदर्शनीलाच जाईन

Wow! सहीच जागा आहे! समुद्रा कडेकडेने जाणारा रस्ता पाहिल्यावर इथल्या फोर्ट bragg च्या botanical garden मधल्या trail chi आठवण झाली. पार्क सुद्धा छान आहे मुलांसाठी. छान ओळख करून दिली आहेस रे. खादाडी ठिकाणाची नावे पण प्लीज. म्हणजे पुढल्यावेळी येईन तेव्हाची सारी सोय होईल Happy

छान लेख. मुलांना मुंबईची माहिती करून देण्याचा उपक्रम मस्त आणि ते इथे लिहिण्याची संकल्पनाही उत्तम. अनेकांना उपयोग होईल.

Bird Watching Area, Bhandup West इथे सकाळी लवकर जाऊन पक्षीनिरीक्षण करता येईल. एखाद्या पक्षीनिरीक्षण गृपसोबतही जाता येईल. इथे बोट राईडही आहे. मी पावसाळ्यात गेले होते तेव्हा हा परिसर फारच सुंदर होता.

हिरानंदानीतील निर्वाणा पार्क, पवई गार्डन आणि लेकही करा.

बेलापूरचे ग्रीन व्हॅली पार्कही मस्त आहे.

अरे हो, हा खालील फोटो टिपल्यावर या रस्त्यावर आम्हाला एक ऊच्चभ्रू कुत्र्यांची जोडी दिसली. मला कुत्र्यांमधील फारसे म्हणजे काहीच कळत नाही. पण ते चक्क क्यूटसे कोल्हेच वाटत होते. त्यांचेही फोटो मालकाची परवानगी घेत काढायला हवे होते असे आता वाटतेय. >>

ओड्या आणि आशु?

ज्यांनी हे पार्क निर्माण केले त्याचा इतिहास प्रथम लिहून नंतर माहिती लिहली जाते.
महाराष्ट्र ची गौरव गाथा पहिली .
नंतर बाकीच्या गोष्टी

असेच एक छान गार्डन कुलाबा बस स्टेशनच्या समोरच्या गल्लीत आहे.एक नंबर बस संपते त्या गल्लीतून पुढे. बाहेरून भिंत आहे. त्यामुळे पटकन कळत नाही एन्ट्री करेपर्यंत. समुद्रकिनारी आहे. काहीतरी चार्ज आहे. बरेच वर्षांत गेले नाही.
Google वर एक सागर उपवन गार्डन दिसतेय. ते हेच असावे बहुतेक.

धन्यवाद सर्वांचे. हुरूप वाढला या प्रतिसादांनी Happy

बिजी आहे आज खूप. तरी जमेल तसे हळूहळू एकेकाला प्रतिसाद देतो.

Srd, तुमचे प्रतिसाद अपेक्षितच होते. तुम्ही आणि हीरा मुंबईबद्दल फार भरभरून आणि माहितीपुर्ण लिहीता.

महालक्ष्मीच्या समुद्राशी आणि तिथल्या भज्यांशी माझ्याही बालपणीच्या कैक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यांचा वेगळा लेख बनेल. मी सुद्धा तिथल्या खडकांना मिस करतो.

अरे हो, माझगाव बापटिस्टा गार्डनला जिथे तुम्ही गेलात तोच आपला मायबोली प्रसिद्ध माझगावचा डोंगर Happy छान झाले आहे आता तिथलेही गार्डन. त्यामुळे तो धागाही रडारवर आहे Happy

@ म्हाळसा, तुझेही पुन्हा एकदा विशेष धन्यवाद. बाकी बोलूच..

@ मनमोहन, खादाडीचे काही शोधले नाही ग्ग. बाहेर पडल्यावर लगेच काही दिसलेही नाही. तिथून थोडेतरी बाहेर पडावे लागेलच असे वाटते. मुंबई खादाडीचा धागा असेलच. हुडकूया तिथे..

@ मामी, छान जागा सुचवल्यात. काही माहीतीही असतात तरी ठरवून जाणे होत नाही. मुंबईच्या ठिकाणांचा बहुधा तुमचाच धागा आहे. तो ही चेक करायला हवे आता.

@ ssj, कुलाब्याच्या तुम्ही म्हणता त्या गार्डनला मी गेलोय बहुधा. फार अंधुक आठवणी आहेत. नुकतेच मॅपवर सर्च करतानाही डोक्यात आलेले पण राहिलेच. सुचवल्याबद्दल धन्यवाद. आमची मुले वाळूत खेळायचे फॅन आहेत. त्यामुळे गिरगाव चौपाटीचा नंबर वरचा असतो.

@ माझेमन
हो खरेच बेक्कार गर्दी असते गेटवेला .. मागच्या एका विकेंडला तिथे होतो तर मुलगा गर्दी बघून चिडून रडायला लागला. बोटीतून फिरणेही नको म्हणाला. मग तिथून मरीनड्राईव्हला गेलो. तिथल्या गर्दीचे काही वाटले नाही.
गेटवेला आता मधल्या वाराला जाऊ पुन्हा..

आणि हेच सेम दुसऱ्या दिवशी कमला नेहरू पार्कबाबत झाले. तिथली गर्दी बघून खाली चौपाटीला आलो.
आता एके दिवशी सकाळी अगदी लवकर नेतो. शांततेत मुलांना काही दाखवायचे असेल तर मला तो टाईम बेस्ट वाटतो.

छान आहे जागा. तुझ्या धाग्यामुळेच गेल्यावेळी राणीच्या बागेत कित्येक वर्षांनी गेलेलो. इकडे पण जाऊ पुढच्या खेपेला.

जिथे प्रवेश नियंत्रित आहे त्याच जागा मुंबई मध्ये फिरण्यासारख्या आहेत.
संजय गांधी national park sarvottam.
विशाल परिसर आहे .
राणी ची बाग दुसऱ्या नंबर बर.
मुंबई मधील सर्व चौपाट्या म्हणजे प्रचंड गर्दी.
दोन मिनिटात नको होते.

Pages