गहराइयां: चित्रपट परीक्षण
गहराइयां चित्रपट बघितल्यावर जुन्या पहिल्या जॉज चित्रपटातील एक सीन आठवतो. डबडया बोटीतून शार्क ची शिकार करायला टीम निघाली आहे. सागरात कुठेतरी एका पाठला गानंतर टीम सुस्तावली आहे. शेरीफ मागील बाजूस बसून अॅबसेंट ली एक एक मांसाचा तुकडा आमी ष म्हणून शार्क ला टाकत आहे. एक प्रकारचा साचले पणा येतो आपणही शांततेत गुंगत जातो व अचानक ज्या शार्कची शिकार करायची आहे तो अगदी अगदी जवळ येउन मांसखंड गट्टम करतो व पाण्यात गायब होतो. शेरिफ व आपणही दचकून मागे होतो. हे जीवघेणं संकट जवळच फिरत होतं आणि आपण किती निवां त होतो.