बोट

गहराइयां: चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 14 February, 2022 - 20:36

गहराइयां चित्रपट बघितल्यावर जुन्या पहिल्या जॉज चित्रपटातील एक सीन आठवतो. डबडया बोटीतून शार्क ची शिकार करायला टीम निघाली आहे. सागरात कुठेतरी एका पाठला गानंतर टीम सुस्तावली आहे. शेरीफ मागील बाजूस बसून अ‍ॅबसेंट ली एक एक मांसाचा तुकडा आमी ष म्हणून शार्क ला टाकत आहे. एक प्रकारचा साचले पणा येतो आपणही शांततेत गुंगत जातो व अचानक ज्या शार्कची शिकार करायची आहे तो अगदी अगदी जवळ येउन मांसखंड गट्टम करतो व पाण्यात गायब होतो. शेरिफ व आपणही दचकून मागे होतो. हे जीवघेणं संकट जवळच फिरत होतं आणि आपण किती निवां त होतो.

विषय: 

बोट - लोभाविरुद्ध लढण्यास सद्हेतू नसे पुरेसा

Submitted by स्वीट टॉकर on 17 November, 2016 - 03:47

ही घटना बोटीवर घडलेली आहे. मात्र ती कुठेही घडू शकली असती आणि त्याचे परिणाम तितकेच तीव्र होऊ शकले असते.

मी बोटीवर थर्ड इंजिनियर होतो. एका मालवाहू बोटीवरच्या लोकांची संख्या हल्ली पंचवीसच्या आसपास असते. तेव्हां ती पंचेचाळीस असायची. इंजिनरूममध्ये काम करणार्या खलाशांचा एक म्होरक्या असायचा. त्याला ‘इंजिन सारंग’ म्हणत. आमचा इंजिन सारंग कोकणातला होता. वय साधारण पंचावन्न वर्षं.

तेव्हां इ मेल वगैरे नव्हते. पत्रानीच बातम्या कळायच्या. एका पत्रात त्याला त्याच्या आईचं देहावसान झाल्याची बातमी कळली.

शब्दखुणा: 

बोट - शिक्षण

Submitted by स्वीट टॉकर on 16 June, 2016 - 05:49

'अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला।' वगैरे बालगीतात ठीक आहे. पण ‘अशा बंगल्यात रहाणार्‍यांना चॉकलेटच्या वासानी मळमळायला लागेल का?’ असे रसभंग करणारे प्रश्न विचारायची जरूरच नाही कारण असा बंगला असणंच शक्य नाही.

शब्दखुणा: 

बोट - व्यसनं

Submitted by स्वीट टॉकर on 2 June, 2016 - 04:18

फार पूर्वी, जेव्हां बोटी फक्त शिडाच्या होत्या तेव्हांचा काळ. इंग्लंडच्या बोटी (Her Majesty’s Ships) जगभर फिरायच्या खर्या, पण त्यांच्यावर काम करायला खलाशी सहजासहजी मिळत नव्हते. खलाशांचं आयुष्य फारच खडतर असे. गोडं पाणी अतिशय मर्यादित. शीतकरण नसल्यामुळे आहारात थोडेच पदार्थ. रोज रोज तेच तेच. वार्यावर अवलंबून असल्यामुळे पुढच्या बंदराला पोहोचायला किती काळ लागेल काही सांगता येत नसे. काम अंगमेहनतीचं आणि जोखमीचं. वादळांचा धोका कायमच डोक्यावर. बोटी बुडण्याचं आणि खडकांवर आपटून फुटण्याचं प्रमाण बर्यापैकी. वर कित्येक सफरींमध्ये तर सत्तर टक्के खलाशी स्कर्वी (scurvy) ने मेल्याची नोंद आहे.

शब्दखुणा: 

बोट - अग्निशमन

Submitted by स्वीट टॉकर on 24 March, 2016 - 01:18

असं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल! तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये!” तर कसला स्फोट होईल!! जाऊ दे! कल्पना करण्यातंच पॉइंट नाही.

शब्दखुणा: 

बोट - वादळवारा

Submitted by स्वीट टॉकर on 13 November, 2015 - 00:49

नोकरीसाठी गेल्यावर सायकोमेट्रिक परीक्षा घेतात त्यात असे प्रश्न असतात – लाल रंगाची वस्तू सांगा म्हटल्यावर तुमच्या मनात खालील चारपैकी कुठली वस्तु आधी येते?
लाल गुलाब, ट्रॅफिक सिग्नल, रक्त, आगीचा बंब.

यात बरोबर/चूक असं उत्तर नसतंच. पण तुमच्या उत्तरावरून तुमच्या विचारधारेची कल्पना येते (असं म्हणतात तरी).

शब्दखुणा: 

बोटीवरील जीवन

Submitted by स्वीट टॉकर on 4 November, 2015 - 03:40

जर तुम्हाला कोणी म्हणालं की उद्यापासून तुमच्या आयुष्यात पाण्याचा तुटवडा असणार नाही, लाइट जाणार नाही, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण असणार नाही, ट्रॅफिकची कोंडी असणार नाही, भ्रष्टाचार असणार नाही, मराठी - अमराठी किंवा जात - धर्माचा भेदभाव असणार नाही, त्याचं राजकारण असणार नाही, कोणीही रांग मोडणार नाही, थुंकणार नाही, दारू पिऊन कामावर येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही, जोरात संगीत लावून दुसर्‍याची झोपमोड करणार नाही, कचरा खिडकीतून बाहेर अथवा रस्त्यावर फेकणार नाही, “हे माझं काम नाही” असं कोणी म्हणणार नाही, तुमचं घर चुकून उघडं राहिलं तरी कोठल्याही वस्तूची चोरी होणार नाही, प्रत्येक जण दि

शब्दखुणा: 

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२)

Submitted by तुमचा अभिषेक on 10 June, 2013 - 04:29

८ जुन २०१३

पहिल्या पावसाची चाहूल लागल्यापासून बायकोचे कुठेतरी लांबवर फिरायला घेऊन चल चालूय.. तिचेही खरेच आहे.. पावसाळा हा काही खिडकीतून बघायचा उत्सव नाही.. कडाडणारी वीज अन गडगडणारे ढग.. घरबसल्याच धडकी भरवतात.. जणू काही शत्रू अंगावर चाल करून येतोय.. पण मैदानात उतरायचे ठरवल्यास तेच जोडीदार बनून राहतात.. तरीही लांबवर कुठे जायचे म्हणजे वेळ हवा, सुट्टी हवी.. पैशाचेही सोंग काही घेता येत नाही.. जमेल तेव्हा जाऊच, पण आजची संध्याकाळ भाऊच्या धक्क्यावर घालवूया म्हणालो.. हो ना करता झाली तयार..

विषय: 

मज्जाखेळ [३-५]: पाण्यातली बोट.

Submitted by सावली on 15 December, 2010 - 21:48

लहान मुलांना बोट बघायला आवडते. आणि ती कशी तरंगते याचं आश्चर्य सुद्धा वाटतं. त्यासाठी हा खेळ.
यात इतक्या लहान मुलांना लगेच वस्तुमान वगरे काही सांगायची गरज नाही. नुसत हलकं जड ही संकल्पना समजावता येईल.

साहित्य:
एक प्लास्टिकचा ,आणि एक रबराचा बॉल/ खेळणे, एखादे जड खेळणे जे पाण्यात बुडेल, एक पेला.

कृती:
हा खेळ आंघोळ करताना बाथटब मध्ये खेळता येईल किंवा बादलीत खेळता येईल.
आधी मुलाला, कुठली वस्तू जड आहे कुठली हलकी हे नुसतं सांगायचं. मग एक एक वस्तू पाण्यात बुडवून दाखवायची. आणि कुठली जास्त बुडते कुठली तरंगते , या बद्दल बोलायचं.पेला रिकामा कसा तरंगतो आणि भरलेला कसा बुडतो ते दाखवायचं.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बोट