मज्जाखेळ [३-५]: पाण्यातली बोट.

Submitted by सावली on 15 December, 2010 - 21:48

लहान मुलांना बोट बघायला आवडते. आणि ती कशी तरंगते याचं आश्चर्य सुद्धा वाटतं. त्यासाठी हा खेळ.
यात इतक्या लहान मुलांना लगेच वस्तुमान वगरे काही सांगायची गरज नाही. नुसत हलकं जड ही संकल्पना समजावता येईल.

साहित्य:
एक प्लास्टिकचा ,आणि एक रबराचा बॉल/ खेळणे, एखादे जड खेळणे जे पाण्यात बुडेल, एक पेला.

कृती:
हा खेळ आंघोळ करताना बाथटब मध्ये खेळता येईल किंवा बादलीत खेळता येईल.
आधी मुलाला, कुठली वस्तू जड आहे कुठली हलकी हे नुसतं सांगायचं. मग एक एक वस्तू पाण्यात बुडवून दाखवायची. आणि कुठली जास्त बुडते कुठली तरंगते , या बद्दल बोलायचं.पेला रिकामा कसा तरंगतो आणि भरलेला कसा बुडतो ते दाखवायचं.
शेवटी मग बोट हलकी असते म्हणून तरंगत असेल हा निष्कर्ष काढू द्यायचा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावली खेळ छान आहे. पण मला वाटते बोटीचे उदाहरण नको. बोटीच्या तरंगण्याचे तंत्र वेगळे आहे ना ?
लहानपणी बोट लोखंडाची असून तरंगते कशी, असे विचारून मी सगळ्यांचे डोके खाल्ले होते. (त्यावेळी कोकणात जायला बोटी असत. )