The Love of Crocus and Smilax ह्या ग्रीक दंतकथेचे मराठीत शब्दांकन:
कोणे एके काळी ग्रीस मध्ये 'क्रोकस' नावाचा देखणा तरुण आणि 'स्मिलॅक्स' नावाची एक अप्सरा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्या दोघांचे प्रेम पवित्र असले तरी भूलोकातील मर्त्य मानव आणि देवलोकातील अप्सरेतले हे प्रेमसंबंध देवी-देवतांना मान्य नसल्याने त्यांचा ह्या प्रेमाला विरोध होता. देवी-देवतांचा आपल्या प्रेमाला असलेला विरोध पत्करूनही क्रोकस आणि स्मिलॅक्स ह्यांच्या गुप्तपणे भेटी-गाठी सुरूच होत्या.
You have to understand,
That no one puts their children in a boat
Unless the water is safer than the land...
- वारसन शायर, ब्रिटिश कवयित्री
१.
चॉकलेट केकच्या धांदरटपणे कापलेल्या तुकड्यासारखं दिसतं हे शहर. वेगवेगळ्या शतकांचे एकावर एक चढवलेले नीटस, पण आता एकमेकात मिसळलेले थर. रेल्वे रुळांच्या आजुबाजूने मधेच भग्न बाजारपेठ दिसते. उंच सोसायट्यांच्या रानातून मान वर काढून बघणारं पार्थेनोनचं देऊळ दिसतं. कचकड्याच्या दागिन्यांची हातगाडी आद्रियानोस राजाने बांधलेल्या लायब्ररीसमोर दिसते. ओस पडलेल्या भिंतींवरच्या ग्रफ़ीटीपलीकडेच एखादं जुनं, कष्टाने जपलेलं चर्च दिसतं. एक पुरातन पेठ, तिच्यामागे रोमन पेठ, दोघींच्या मधे आजची पेठ आणि त्या वाटेत जिथे जिथे कोपरा मिळेल तिथे उपाहारगृह.
थंडीच्या पहिल्या लाटेबरोबर सिक्याचा हमरस्ता मिटला. गजबजलेलं गाव एका रात्रीत ओसाड झालं किंवा माझी निघायची वेळ जवळ आल्याने मला तसं वाटायला तरी लागलं. भरल्या बॅगेसमोर सिक्याच्या घरचे सगळे घोटाळायला लागले. यासोनासने स्वतः माझ्या बॅगेत बसून बाहेरून चेन लावायचा प्रयत्न करताना हात चेमटून घेतला. तशीही रडारड व्हायचीच होती; यासोनासला एक निमित्त तरी मिळालं.
गाढ झोप लागली होती. स्वप्न पडल्याचंही आठवत नाहीये मला... आणि अचानक मी पलंगावरून घसरायला लागले. सबंध खोली पुढेमागे हलत होती. दहा सेकंद झाली, पंधरा झाली तरी खोली डुगडुगायची थांबेना. चांदण्यात माझ्या डोळ्यादेखत समुद्राची अख्खी तबकडी सरकत होती आणि कितीतरी वेळ जीव मुठीत धरून बसले होते मी खिडकीपाशी. भूकंप. पण इतका मोठा? आणि एवढा वेळ? सुरुवातीला मला घटनाक्रम कळलाच नाही – भुकंपामुळे मी पडल्ये की मी पडल्यामुळे भूकंप झालाय? हादरे संपल्यावर मी फक्त किनारा पाहिला. काही पडझड झाली नव्हती इतकंच बघून डोळे मिटून घेतले.
“मंदीच्या काळात सबंध घराला जग दाखवायला बाहेर घेऊन जाणं परवडत नाही, पण जगभरातून माणसं आमच्याकडे येणार असतील तर आम्ही त्यांचा पाहुणचार आनंदाने करू”. दीमित्रा म्हणाली होती.
“एव्ही. एवढंच नाव सांगत्ये मी सगळ्यांना, कारण इंग्लंडमध्ये कोणालाच उच्चार नाही जमत माझ्या नावाचा.” कॉलेजच्या पहिल्या आठवड्यात एक मुलगी मला म्हणाली.
“तरी मला खरं नाव सांग; मी म्हणून बघते.” दृष्टद्युम्न म्हणता येतं एवढ्या एका क्वॉलिफिकेशनवर मी विडा उचलला.
मायबोलीकर, सध्या मी या गावात असेपर्यंत मला प्लीज माफ करा. खूप इच्छा असूनही फोटो अपलोड होत नाहीयेत. आठवड्याभरात तो प्रश्न सुटेल आणि मग मी फोटो टाकत जाईन.
---------------
“तुझी खास माणसं ग्रीसमध्ये असताना तू अनोळखी घरी राहून काम का करत्येस? हवं तिथे फिर, हवं तितकं लिही, पण आमच्याच घरी राहा.” अरिस्तेयाचे बाबा म्हणाले. अरिस्तेयाशी दहा वर्ष मैत्री असूनही मी भलत्याच गावात जाऊन राहायचं ठरवलं ते त्यांना रुचलं नाही. त्यांच्या घरी राहायला मी एका पायावर तयार झाले असते! का नाही आवडणार एकामागोमाग एक संग्रहालयं, शहरं, दऱ्या-डोंगर आणि भग्न वास्तू पालथ्या घालायला आणि दिवसाच्या शेवटी प्रेमाने आपली वाट बघणाऱ्या चार माणसांमध्ये परत यायला… पण सुरेख निसर्ग, इतिहास आणि जेवण जगात सगळ्याच देशांना मिळालंय.