कुटुंब
जुनी कुटुंबपद्धती विरुद्ध आधुनिक कुटुंबपद्धती?
आज मायबोलीवर आलो आणि दोन धागे नजरेस पडले.
दोन्हींचा सारांश असा होता की,
रात्रीच्या जेवणासाठी बऱ्याचदा अमुक तमुक पदार्थच केले जातात कारण त्याने वेळेची बचत होते.
पण ही वेळेची बचत का करावी लागते?
लग्न / नाती याकडे स्त्री जास्त गांभिर्याने पाहते की पुरूष ?
(माबो गणेशोत्सव चालू असताना या प्रश्नाची वेळ चुकलेली आहे याची कल्पना आहे. पण नंतर लक्षात राहणार नाही आणि लिखाणाचा उत्साह बारगळण्याची शक्यता म्हणून विचारून टाकतो).
कुटुंब!
शांतारामने समोरच्या आरश्यात आपल्याच प्रतिबिंबावर नजर टाकली. अंगावरचा सफारी, त्याच्या पोक्त वयाला शोभून दिसत होता. त्याने समाधानाने मान डोलावली.
या सफारीच काम तंबाकू सारखं असत, तंबाकू जशी लग्नाच्या मांडवापासून ते मसणवट्या पर्यंत कुठेच वर्ज नसते, तसेच सफारीच असत. सफारी घाला डोक्याला, फेटा बांधून वरातीत नाचा, नाहीतर टापशी बांधून मयतीत सामील व्हा! सगळीकडे शोभून दिसते. म्हणून शांताराम कामगिरीवर निघताना आवर्जून सफारी घालतो.
काय मिळवलं !!!
अरुंधतीचा रागाचा पारा आज फारच चढला होता. कोरोना, कोरोना म्हणत घरातला प्रत्येकजण नुसता बसून होता. मार्च पासून जून पर्यंत मुलांनी सुट्टी म्हणून आणि नवऱ्याने लॉकडाऊन म्हणून एका हातात मोबाइल धरून दिवस नुसता लोळून काढला होता. ऑनलाईन शाळा आणि वर्क फ्रॉम होम सुरु होऊनही त्यांच्या दिनक्रमात फारसा काही फरक नव्हता. मागच्या वर्षी पर्यंत १० वाजता एकदा मुलं शाळेत आणि नवरा ऑफिसला गेले की दिवसभर ती एकटीच्या राज्यात निवांत असायची. आता मात्र तसं नव्हतं. ऑनलाईन शाळा म्हणजे नुसतं थातुर मातुर होत. थोडा वेळ शाळा झाली की परत दिवसभर मुलांची नुसती कटकट सुरु व्हायची.
विभक्त कुटुंब पद्धती
`विभक्त कुटुंब पद्धती– परिस्थिती, कारणं आणि उपाय` हे श्री. किरण आचार्य यांचं पुस्तक. याबद्दल थोडंसं!
ताई
अशाच एका आठवणीत भेटलीस आम्हाला तू
प्रत्येक अडचणींना पार करताना दिसलीस आम्हाला तू
कधी मोठी बहीण, कधी मैत्रीण, तर कधी आई होऊन पाठीशी उभी तुझीच सावली
तुझ्या रूपाने जणू काही मिळाली आम्हाला एक नवीन माउली
तुझे ते गुबरे गाल,कधी हसताना कधी फुगताना दिसतातआम्हाला
पण त्यात लपलेली अनामिक चिंता लपवताना भासलीस तू
तुझ्या डोळ्यातला तो तीळ जणू तुला सगळ्यापेक्षा वेगळेकरून गेला
आणि त्याच डोळ्यात लपलेली काळजी तुझ्या अजूनजवळ घेऊन गेला
मुलांसाठी राबताना नेहमीच आम्हाला दिसलीस तू
पण त्यातही तुझ्यातल्या "मी" ला शोधताना भासलीस तू
नव्या घरी नवं राज्य (ग्रीस ८)
थंडीच्या पहिल्या लाटेबरोबर सिक्याचा हमरस्ता मिटला. गजबजलेलं गाव एका रात्रीत ओसाड झालं किंवा माझी निघायची वेळ जवळ आल्याने मला तसं वाटायला तरी लागलं. भरल्या बॅगेसमोर सिक्याच्या घरचे सगळे घोटाळायला लागले. यासोनासने स्वतः माझ्या बॅगेत बसून बाहेरून चेन लावायचा प्रयत्न करताना हात चेमटून घेतला. तशीही रडारड व्हायचीच होती; यासोनासला एक निमित्त तरी मिळालं.
कुटुंब
कुटुंब
संकटी जे धावत येती
त्यास कुटुंब म्हणती
संकटी जे दूर पळती
त्यांची कशात गणती ?
काटा रुतता एका
वेदना दुसऱ्या होती
एकाचे अश्रू पुसण्या
कुटुंबाचे हात येती
राहून एका सदनी
बोल वेगळे वदनी
ऐशा समूहा जगती
कुटुंब का म्हणती ?
उगाच नाती-गोती
वेंधळीच ही भरती
पक्षीही जगण्यासाठी
वृक्षी बांधती घरटी
जखमा दिल्या ज्यांनी
ते तर परकेच होते
वार झेलण्या परंतु
आपले कुणीच नव्हते
स्नूपीने दिलेली मला शेवटची भेट...
नमस्कार मायबोलीकर,
मागच्या दिवाळीत दै. दिव्य मराठीच्या मधुरिमा दिवाळी अंकात माझी 'शापित जग' हि लघुकथा प्रकाशित झाली होती. नंतर मग मी ती admins ची परवानगी घेऊन मायबोलीवरही सादर केली.
त्याची लिंक हि आहे: https://www.maayboli.com/node/64611