विभक्त कुटुंब पद्धती

Submitted by पराग र. लोणकर on 13 August, 2020 - 03:57

`विभक्त कुटुंब पद्धती– परिस्थिती, कारणं आणि उपाय` हे श्री. किरण आचार्य यांचं पुस्तक. याबद्दल थोडंसं!

आज आपल्या आजूबाजूला अनेक एकाकी, मुलांपासून वेगळे/दूर रहात असलेले आणि वृद्ध झालेले किंवा वृद्धत्वाकडे जात असलेले माता-पिता दिसतात. हे माता-पिता ज्या समस्यांचा सामना करत आहेत किंवा ज्या प्रकारच्या समस्या त्यांच्या येत्या काळात त्याच्यापुढे उभ्या ठाकणार आहेत त्यांनी ते चिंतीत आहेत. अर्थात, त्यांची जी मुले स्वतंत्र संसार थाटून बसली आहेत, त्यांचेही सगळे चांगले चालले आहे अशीही परिस्थिती नाही. त्यांच्यासमोर (असं स्वतंत्र/वेगळं राहिल्यामुळे) वेगळ्या स्वरूपाच्या समस्या आहेतच. या आई-वडील व मुलगा-सून वेगवेगळे राहण्यामुळे निर्माण झालेल्या समस्या कश्या कमी करता येतील? यावर असा काही उपाय काढता येईल का, की ज्यामुळे निदान आगामी पिढ्या (पालकांच्या आणि मुलांच्याही!) या समस्यांपासून दूर राहू शकतील?

यावर आज समाजात खोलात जाऊन विचार करण्याची गरज असल्याचेच कुणाला वाटत नाही अशी परिस्थिती दिसते. मुलांना नव्या नव्या संसारात स्वतंत्र राहण्याचे आकर्षण वाटतेय अन पालक मंडळीही यावर काही समाधानकारक पर्याय मुलांना देण्याबाबत विचार करताना दिसत नाहीयेत. या परिस्थितीवर विचार झाला पाहिजे, अश्या परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, या विचारातून किरण आचार्य यांनी हे लेखन केलेलं आहे.

किरणजींचं हे लेखन वाचल्यावर या आजच्या पालकांच्या एकट्या राहण्यामागे, तसंच इतरही (पालक नसलेली) अनेक माणसे समाजात राहूनही एकटी पडण्यामागे किती विविध कारणं असू शकतात याची जाणीव आपल्याला होते. या त्यांच्या लेखनामुळे या समस्येवर विचार करण्याचं पहिलं पाऊल उचललं गेलं आहे, जे पुढील पिढीसाठी काहीतरी उपयुक्त असं घेऊन येत आहे.

आज ज्या ज्या मंडळींवर एकाकी रहायची वेळ येत आहे, त्यामागे किती विविध कारणं असू शकतात त्याची जाणीव हे पुस्तक आपल्याला करून देतं. त्यामुळे आज वृद्धत्व काही किंवा बरीच वर्षे दूर असणाऱ्या व्यक्तींसाठी हे पुस्तक अतिशय आवश्यक असा खबरदारीचा इशारा देत आहे.

या पुस्तकात मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर लेखकाने उपायही सुचवले आहेत. पण किरणजी प्रत्यक्ष उपाय सांगण्यापूर्वीच ती ती परिस्थिती सांगत असताना जे विवेचन करतात, आपलं स्वत:चं मत प्रदर्शित करतात, त्यातूनच अशी समस्या आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, वेळेत कोणती पावलं उचलायला पाहिजे याचा विचार वाचकाच्या मनात अगदी आपोआप सुरु होतो. आणि माझ्या मते या लेखनाचं हेच सगळ्यात मोठं यश आहे.

एकदा आयुष्यात एकाकी पडल्यावर आपल्यापुढे येऊ शकणाऱ्या समस्या लक्षात आल्या, की मग पूर्वीच्या काळाप्रमाणे अगदी मोठ्या एकत्र कुटुंबात राहिलं नाही, तरी निदान आपल्या घरात आपल्या मुला-बाळांबरोबर आजी-आजोबाही असावेत, आणि असं एकत्र राहतानाही प्रत्येकाचे (अगदी आजी-आजोबांचेही) वैयक्तिक स्वातंत्र्य, privacy शाबूत राहून प्रत्येक जण आनंदाने कसं राहू शकेल, त्यासाठी प्रत्येकानंच काही आवश्यक बदल, adjustments कश्या करायला हव्यात यावर आपण गांभीर्याने विचार करायला सुरुवात करू. या सगळ्या गोष्टींसाठी अतिशय मनमोकळा संवाद संपूर्ण कुटुंबामध्ये असणं मात्र अतिशय आवश्यक असेल. या संवादाचं महत्व किरणजींनीही एका प्रकरणात नमूद केलं आहे.

`सोशल मीडिया` हे प्रकरण या पुस्तकातील सर्वश्रेष्ठ प्रकरण ठरावं असं मला वाटतं. हे प्रकरण आपल्याला (म्हणजे आज चाळीशीच्या पुढे गेलेल्या पिढीला) आपल्या रम्य बालपणात घेऊन जाईल, तेव्हाचे नातेसंबंध, त्यांची जपणूक, प्रेम, माया, ममता यांनी भरलेल्या त्या खरोखरच हव्या हव्याश्या वाटणाऱ्या दिवसांची आठवण आपल्याला करून देईल. पण लगेच लेखक या सुंदर गतजगातून आपल्याला वास्तवात आणतो. केवळ आपणच नव्हे तर आपले पालक, जे आज ज्येष्ठ नागरिक झालेले आहेत, त्यांच्यातही या गेल्या काही (२०-३०) वर्षात जगात झालेल्या वैज्ञानिक प्रगतीमुळे(?), लागलेल्या विविध शोधांमुळे कसे नको ते बदल झालेले आहेत, त्या बदलांचीही लेखक आपल्याला जाणीव करून देतो.

`मनोरंजनाच्या आणि कुटुंबाबरोबर एकत्र येण्याच्या व्याख्या आता अचानक खूप बदलल्या आहेत. मुक्त आणि भन्नाट आयुष्य जगलेली ही आमचीच पिढी आज आपल्या मुलाबाळांना तसे आयुष्य देताना दिसत नाही,` `गर्दीत देखील माणसाला एकटं करण्याची किमया या सोशल मीडियाने साध्य केली आहे,` यासारखे लेखकाने या लेखात मांडलेले विचार आपल्याला कमालीचे विचारप्रवृत्त करतात. हा लेख वाचकांनी एकापेक्षा अधिक वेळा वाचला तर मला आश्चर्य वाटणार नाही.

`तरुणाई` या लेखातील `शिकून सवरून तुम्ही जर एकलकोंडेपणा निवडलात, तरी पुढे तुमच्या पोटी जो जीव जन्माला येणार आहे, त्याला जर तुम्ही कुटुंबाचे सुख देऊ शकला नाहीत, तर त्या जीवावर तो अन्याय होणार नाही का?` हे लेखकाचे उद्गारही असेच विचार करायला लावणारे.

विभक्त कुटुंबाकडून परत एकत्र कुटुंबाकडे समाज व्यवस्था जाण्यातच आजच्या (आणि यापुढच्याही) प्रचंड स्पर्धेच्या जगात व त्यामुळे सतत ताण-तणावात जगणाऱ्या पिढीचं भलं आहे याबाबत माझ्या मनात काडीचाही संदेह नाही. तसं स्थित्यंतर होण्यासाठी जी पावलं उचलली गेली पाहिजेत, त्यातलं एक महत्वाचं पाऊल किरण आचार्य यांच्या या पुस्तकाच्या स्वरुपात पडत आहे एवढं निश्चित.

या पुस्तकाच्या वाचनाने भविष्यातील समस्यांचा अंदाज येऊन एखाद्या जरी कुटुंबातील सदस्यांनी विचारपूर्वक आणि परस्पर संवादाने आवश्यक ती पाऊले उचलली आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याला (मग तो कोणत्याही वयाचा असला तरी) बाकीच्या सदस्यांचा भक्कम आधार निर्माण केला तरी या पुस्तकाच्या लेखनाचा आणि प्रकाशनाचा हेतू सफल झाला असे मी मानेन.

***

Group content visibility: 
Use group defaults

आपल्या घरात आपल्या मुला-बाळांबरोबर आजी-आजोबाही असावेत >> कोणते आजी-आजोबा? आईचे आई-वडिल की वडिलांचे आई-वडिल? की दोन्ही?

कोणाचे आई-वडील याबाबत काही नियम नसावा. प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे ते ठरू शकेल. मुलगा व सून दोघेही आईवड्लांचे एकुलते एक असतील, तर अश्या घरात दोन्ही आई-वडीलही राहू शकतीलच. अश्या वेळी काही आव्हानं समोर येऊ शकतीलच. (तशीही प्रत्येक एकत्र कुटुंबात एकत्र राहण्यामुळे काही आव्हानं ही असतातच. दोन्हीही पिढ्यांसाठी!) त्यावर योग्य संवादपूर्वक मार्ग काढणे आवश्यक असते. (शक्य असल्यास, एकाच इमारतीत अगदी जवळजवळ flat घेणे वगैरे मार्ग काढून दोन्हीही आई-वडील मुला-सुनेच्या/मुलगी-जावयाच्या व नातवंडांच्या अगदी जवळ राहू शकतात.) अनेक कुटुंबात आज तसे केलेही जाते. यामुळे प्रत्यक्षात वेगळे राहूनही प्रत्येक अडी-अडचणीला, आनंदाच्या प्रसंगांनाही सारे अगदी समीप असतात.

हे शक्य आहे.
माझे सासू सासरे यांना 3 मुले आहेत. आम्ही दूर आहोत. पण बाकी दोघेही एकाच गावात राहतात.
सासू-सासरे कुणाकडेही राहत नाहीत, दोघेच राहतात पण तब्येत ठिक नसेल डबा देणे, दवाखान्यात नेणे अशा वेळेस दोघेही दिर तयार असतात.
त्या गावात कोरोना केसेस वाढत आहेत, त्यामुळे सरकारी नियमानुसार 60 वर्षांवरील व्यक्तींना एकटे राहता येणार नाही असे सांगितले. मागच्या महिन्यापासून ते मुलाच्या घरी राहताएत.

एकत्र कुटुंबात रहायला मुळात तितकी प्रजा तरी हवी आणि तितकी जागाही हवी
आताच्या पिढीत एकच मूल असते

आणि शहरात तिघांच्यासाठी 400 फुटाचे घर घ्यायचे म्हटले तर अर्धे इन्कम जाते

एकत्र कसे रहाणार ?

मोतीलाल काश्मिरात होते , मग पंडितजी अलाहाबाद , दिल्ली , इंदिरा दिल्ली , दोन सुना एक इकडे खासदार , एक तिकडे खासदार , राहुलजी केरळ , प्रियंका इंग्लड .

एकाच घरात सगळे तिथेच बसायचे तर मोठा शनवार वाडा बांधायला पायजे . मग नावेपण बदलत नाहीत , नुसते आकडे बदलायचे , पहिला बाजीराव , मग दुसरा , आजज्याचे नाव नातवाला

एकत्र कुटुंब पद्धती ही आदर्श पद्धती च आहे.
पूर्वी म्हणजे जास्त पूर्वी नाही 100 वर्ष पूर्वी पर्यंत ती पद्धत भारतात अस्तित्वात होती.
लोकांचे गुजराण मुख्यतः शेती वर असायचे.
नोकरी हा प्रकार तेव्हा तसा कमीच.
लोकांच्या गरजा कमी होत्या,जमिनी खूप होत्या,वर्षभर पुरेल एवढा अन्न धान्य शेतातच पिकायचे.
घर मोठी होती,राहणीमान साधं होत.
तेव्हा तीन पिढ्या पर्यंत ची लोक एकत्र राहत होती तेव्हा.
घरातील ज्येष्ठ नागरिक ला मान होता .त्याची मत विचारात घेतली जात.
सुख दुःखात कुटुंब म्हणून सर्व एकत्र असतं.
त्या मुळे एकटे पण कधीच जाणवायचे नाही.
कोणी आजारी पडलं तरी त्याची काळजी सर्व मिळून घेत.
आता सर्वच बदल आहे ,विभक्त कुटुंब पद्धती चा जमाना आहे.परिस्थिती पण बदलली आहे नोकरी साठी वणवण फिरावे लागत आहे.शहरात जागेची कमतरता आहे,लोकांकडे वेळ नाही,स्वार्थ वाढला आहे स्वतः पुरता विचार लोक करत आहे.
काही वर्षा पूर्वी नवरा,बायको,आणि मुल इथपर्यंत स्वीकारले जात होते आता अजुन सुधारणा होवून
नवरा,बायको,मुल हे तीन वेगवेगळ घटक झाले आहे.
नवरा ,बायको नी एकत्र राहवे स्वतंत्र इथ पर्यंत विभक्त कुटुंबाची व्याख्या बदलली आहे.

आदर्श पद्धत असती तर पूर्ण टिकून राहिली असती.
एकत्र रहायचे असल्यास सद्यपरिस्थीतीचा, सर्व गृहसदस्यांच्या गरजा, निकड, आवड निवड यांचा नीट विचार करून, सर्वांचे समुपदेशन केल्यास खूप फायद्याचे ठरेल.
आमच्यावेळी किंवा आताही आमच्याकडे कुठे गरज पडली समुपदेशनाची? आम्ही व्यवस्थितच रहातो असे कुणाचे म्हणणे असेल, तर त्यांचे हार्दिक अभिनंदन तुम्ही अपवाद आहात.

फक्त मोठी घरं असून पण उपयोग नाहिये जुन्या आणि नव्या पिढीचे आपसात पटलं ही पाहीजे ना. रोजच्या तुतु मैंमैं पेक्षा वेगळे राहिलेले ठिक वाटतं खुपदा.

कासव सिनेमामधे कुटुंबाची एक वेगळी व्याख्या केली आहे. केवळ रक्ताच्या नात्याने बांधलेलो असलो म्हणजे आपण एकत्र कुटुंब असूच असे आजच्या काळात घडत नाही. करीअर, शिक्षण अशा निमित्ताने कुटुंबातले सदस्य विखुरलेले असतात. अशावेळी मित्रमैत्रिणी, शेजारी, अॉफिसमधले सहकारी हे सगळे आपल्या extended कुटुंबाचाच भाग असू शकतात. सख्ख्या नातेवाईकांपेक्षा देखील हे सगळेजण आपल्याला अधिक जवळचे असतात. मग असं कुटुंब असलं तरी काय हरकत आहे?

प्रत्येकाने वेगळं रहावं व ठराविक दिवशी एकत्र वेळ घालवावा.सगळ्या घराचं करत बसायला आजच्या मुली सोशिक नाहीत आणि त्यांनी करावे तरी का? वेगळे रहावे व मजा करावी.

सगळ्या घराचं करत बसायला आजच्या मुली सोशिक नाहीत आणि त्यांनी करावे तरी का? वेगळे रहावे व मजा करावी.

हे बरोबर की चुक माहिती नाही कारण लहानपणचे आठवते, आई करायची कि सगळ्यांचं रोजच आणि सणासुदीला पण.
पण नाहीच जमत आजकालच्या (माझ्यासारख्या) मुलींना.
तेव्हाच्या लोकांना मुलांना वाढवताना सगळ्यांची मदतही असायची. आजकाल गर्भारपण,बाळंतपण, लहानमुलं सांभाळून नोकरी सगळं करावच लागते.
मजेचा भाग कमीच असतो.. असं मला तरी वाटतं.

दोन पिढी तील लोकांचे विचार जुळत नाहीत म्हणून विभक्त कुटुंब पद्धती हवी हा लंगडा प्रतिवाद आहे.
असा विचार केला तर एकाच पिढी मधील दोन व्यक्ती ची मत सुद्धा जुळत नाहीत ,मतभेद होतात .
मग स्त्री आणि पुरुष नी लग्न ह्या नावाखाली एकत्र राहणे पण शक्य नाही.
99 percent नवरा ,बायको मध्ये मतभेद असतात adjust करून च ते एकत्र राहत असतात.
कुटुंब एक संस्था आहे.
जसे ऑफिस एक संस्था आहे तिथे कोणाचेच कोणाशी पटत नाही तरी ते एकत्र काम करत असतात.
कारण ऑफिस चालवायचे असतं तिथून तुम्हाला तुमच्या कामाच्या बदल्यात पैसे मिळतात .
प्रत्येकाची जबाबदारी ठरवलेली असते आणि त्याच ठरवलेल्या मर्यादेत राहवे लागते तुमची इच्छा असू अगर नसू.
कुटुंब ही सुधा एक संस्था आहे प्रतेक सदस्याची काही तरी जबाबदारी आहे त्या बदल्यात तुम्हाला मोबदला म्हणून काही तरी मिळत असते.
वारसा हक्काने संपत्ती मिळते.
वारसा हक्काने समाजातील पत मिळते.
आजारी पडल्या वर तुमची काळजी कुटुंबातील सदस्य च घेतात.
सुरक्षा मिळते.
हे सर्व कुटुंब संस्थे मध्ये तुम्ही असाल तरच हे रिटर्न मिळतात.
पगार हवा पण ऑफिस मध्ये काहीच जबाबदारी नको ,काम नको हे जसे हास्यास्पद आहे.
कुटुंबाचे फायदे हवेत पण जबाबदारी नको हे सुद्धा तसेच हास्यास्पद आहे.
ऑफिस उघडा
One man show
तुम्हीच बॉस,तुम्हीच कामगार,तुम्हीच झाडू pochhawale.
अस राहायला जमतंय का बघा.

म्हटल तर एकत्र म्हटल तर स्वतंत्र असे मॉडेल हल्ली वापरतात. म्हणजे स्वातंत्र्य व परस्पर उपयुक्तता असे दोन्ही फायदे मिळतात.

मुलगी शिकली प्रगती झाली !
बदलत्या कुटुंबसंस्थेचेही गुपित यातच लपले आहे.

पुर्वीच्या काळी समाज पुरुषप्रधान होता तसेच पितृसत्ताक पद्धती अवलंबली जायची. म्हणजे मुलगी लग्नानंतर सासरी जाणार.
तसेच तेव्हा मुली आर्थिक दृष्ट्या सक्षम नव्हत्या. चूल आणि मूल सांभाळण्यात धन्यता मानायच्या. सासूसुनेच्या एकमेकींवर कुरघोडी चालल्या तरी दोघी घरातल्या कर्त्या पुरुषाचे कर्तुत्व वा श्रेष्ठत्व मान्य करायच्या. एकंदरीत एकत्र कुटुंबपद्धतीत सर्व वयोगटातील बायका आणि पुरुषही कुटुंबातले आपले स्थान आणि भुमिका मान्य करून त्यानुसार योगदान द्यायचे.

आता झालेय काय,
तर पितृसत्ताक पद्धती तशीच आहे. आजही लग्नानंतर मुलीच नवर्‍याच्या घरी जातात आणि त्याचे नाव लावतात.
पण त्याचवेळी पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व कमी होतेय. स्त्रीपुरुष समानता येतेय. दोघांमधील दरी कमी होतेय. स्त्रिया शिकताहेत, कमवताहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
मग अश्या परिस्थितीत त्या उगाच कोणाच्या बापाचे का ऐकून घेणार. (हे उगाच नवर्‍याच्या आईबापाचे का ऐकून घेणार असेही वाचू शकता)

त्यामुळे संभाव्य वाद टाळायला लग्न होताच आईबाप आणि पोरांचे संसार वेगळे होत आहेत.

मुलगी आणि मुलगा ह्या मध्ये शरीर रचना सोडली तर काही फरक नाही.
स्त्री सुद्धा माणूस च तिला सुद्धा प्रेमाची भाषा ,जबाबदारी समजते.
त्या मुळे विभक्त कुटुंब पद्धती ली शिकलेली स्त्री जबाबदार आहे हे वाक्य पटत नाही.
इथे आई वडील आर्थिक बाबतीत यशस्वी आणि मुल अयशस्वी.
आई ,वडील आर्थिक बाबतीत अयशस्वी आणि मुल यशस्वी असे दीन प्रकार सुद्धा महत्वाचे असतात.
मुकेश अंबानी चा मुलगा स्वप्नात तरी मुकेश अंबानी पासून वेगळा राहायचं विचार करेल का.
किती ही हुशार असला तरी जास्तीत जास्त 10 लाखाच्या वर त्याला कोणीच पगार देणार नाही.
त्याची हिम्मत होईल का वेगळे राहण्याची.

म्हणजे मुलगी लग्नानंतर सासरी जाणार.
चूल आणि मूल सांभाळण्यात धन्यता मानायच्या
कर्त्या पुरुषाचे कर्तुत्व वा श्रेष्ठत्व मान्य करायच्या
>>
objection on मानायच्या, करायच्या my lord. Except few, most of them were 'Forced to'. They did not had any choice. No say. No Freedom of decision.

Proud

पुरुषांवर पण हे लादलेलेच आहे , तू कमी पगारवाली बाई ने

पगार मिळवणाऱ्या बायांनी कमी पगारवाले नवरे घरजावई करून न्यावेत
मी आनंदाने जाईन

objection on मानायच्या, करायच्या my lord. Except few, most of them were 'Forced to'. They did not had any choice. No say. No Freedom of decision.
>>>>>>>

मी तेच तर म्हटलेय भाऊ
Freedom of decision. हे त्या कमवायला लागल्यानेच मिळालेय आता त्यांना

पगार मिळवणाऱ्या बायांनी कमी पगारवाले नवरे घरजावई करून न्यावेत
मी आनंदाने जाईन
>>>>>>

माझा हे धागे जरूर वाचा आणि वरही काढा. तुम्ही जे आनंदाने म्हणत आहात ते तसे नसते हे तुम्हाला समजून येईल.

१) आपल्या समाजात पुरुषांवर कमवायचे आणि कमावत राहायचे दडपण असते का?
https://www.maayboli.com/node/72167

२) न कमावणारया बायकांना कोणते अधिकार असावेत वा नसावेत?
https://www.maayboli.com/node/73677

३) स्त्री बॉसच्या हाताखाली काम करणे पुरुषांना त्रासदायक जाते का?
https://www.maayboli.com/node/72173

थोतांड आहे हे.. जे राहतात एकत्र आणि पटत नाही एकमेकांशी त्यांना च माहित काय घुसमट होते ते.. इतरांना लांबून बोलायला काय जातंय.. i believe in जिओ और जीने दो.. दुरून संबंध जास्त चांगले राहतात. नो डाउट गरजेला किंवा वेळेला एकमेकांसाठी उपलब्ध असले पाहिजे. पण त्यासाठी रोजचं कोणाला सहन करायची गरज नाही.

थोतांड शब्द खूप दिवसांनी ऐकला

पूर्वी मायबोलीवर थोतांड शब्द सारखा चालायचा

ज्योतिष सत्य की थोतांड ?
मातृभाषा शिक्षण सत्य की थोतांड ?
इंग्रजी भाषा व प्रगती सत्य की थोतांड ?
अमुक कल्ट सत्य की थोतांड ?

काश वो जमाने मे रुन्मेष होता

सास भी कभी बहू थी aur आज की बहु भी sas बनेगी.
तेव्हा हेच विचार राहू ध्या म्हणजे झाल.
मत nehmi ठाम असावीत ती कोणत्याच स्थिती मध्ये बदलली गेली नाही पाहिजेत.
पुढच्या सूनांची खूप मज्जा असणार .
आताच्या सासवा मुलगा 22 वर्षाचा झाला की त्याला सोडून स्वतचं वेगळे राहायला सुरू करतील.

वेगळे राहण्याची योग्य वेळ कोणती.
जे विभक्त कुटुंबाचे समर्थक आहेत त्यांच्या साठी.
1) मुलगा किंवा मुलगी 21 वर्षाची झाली की तिने /त्यांनी वेगळे राहवे
2) स्वतः च घर शोधावे,स्वतचं नोकरी शोधावी,लग्न करावे.
3) शिक्षण पूर्ण झाले किंवा 21 वर्ष पूर्ण झाली की आई वडिलांचा 1 रुपया सुद्धा घेवू नये.
मग च त्या विभक्त राहण्याच्या विचारला तात्विक पाठबळ मिळेल.
आई वडिलांच्या घरात राहणार,त्यांच्याच मदतीने आयुष्यात स्थिर होणार आणि नंतर असे मत व्यक्त करणार त्याला काही ही अर्थ नाही.

Pages