लघुकथा
खिडकी आणि ती
अनमोल भेट!
उत्साह अमृततुल्य आज नेहमीप्रमाणेच गजबजलेले होते. चहाचे कप इथून तिथे नाचत होते, पोहे आणि उप्पित चा वास परिसरात घमघमट होता.
अनिरुद्ध आपल्या चहाचा आस्वाद घेत असताना त्याचे लक्ष एका चिमुरडी कडे गेले. ती सर्वांकडे आशाळभूत नजरेने पाहात होती; कोणीतरी आपल्याला काही मदत करेल असा आर्विभाव तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. कर्दमलेले केस, मळकट चेहरा, व फाटलेले कपडे पाहून अनिरुद्धला तिची दया आली. शेवटी अनिरुद्ध ने तिला जवळ बोलावले.
"तुला भूक लागली आहे का? काही खायला हवे का?" अनिरुद्ध ने त्या चिमुरडीला विचारले. त्यावर तिने नुसतीच होकारार्थी मान हलवली.
काही अतिलघु कथा
श्री. कुणाल हजेरी यांनी लिहिलेल्या 'अती सूक्ष्म कथा' या पुस्तकाच्या संकल्पनेवरून मी लेखनाचा केलेला प्रयत्न!
(अश्या प्रकारच्या लेखनाचा माझा हा पहिलाच प्रयत्न असल्याने कृपया चूक-भूल क्षमस्व!)
भेट
रिंग वाजली.
नंबर unknown!
काही क्षणात ट्रू काॅलरनं नंबर आयडेंटीफाय केला.
वीस एक वर्षांनी तिचा फोन आलेला पाहून तो थरारला. हृदयाचे ठोके वाढले.
'बोल!' तो एवढंच बोलला.
'आज ब्लू डायमंडमध्ये ५ला भेटुया?'
तो पावणे पाचलाच ब्लू डायमंडला पोचला.
मोरूचा बाप!
"मोरू उठ! आज शनिवार! बरीच कामे पडली आहेत!" मोरूचा बाप मोरूला म्हणाला.
"बाबा झोपू द्या ना. विकेंड आहे. रोज सकाळीच उठाव लागता ना? आणि रात्री तसही प्रोजेक्टमुळे जागरण पण झालाय!" मोरू पांघरुणात घुसमटत म्हणाला.
"मोऱ्या, बापाला शानपन शिकवायचं नाही! उत्तिष्ठ! म्हणजे उठ!"
कुटुंब!
शांतारामने समोरच्या आरश्यात आपल्याच प्रतिबिंबावर नजर टाकली. अंगावरचा सफारी, त्याच्या पोक्त वयाला शोभून दिसत होता. त्याने समाधानाने मान डोलावली.
या सफारीच काम तंबाकू सारखं असत, तंबाकू जशी लग्नाच्या मांडवापासून ते मसणवट्या पर्यंत कुठेच वर्ज नसते, तसेच सफारीच असत. सफारी घाला डोक्याला, फेटा बांधून वरातीत नाचा, नाहीतर टापशी बांधून मयतीत सामील व्हा! सगळीकडे शोभून दिसते. म्हणून शांताराम कामगिरीवर निघताना आवर्जून सफारी घालतो.
पुरून उरिन! ('माझ्या नेटक्या गोष्टी'तुन."
खंडूआण्णा म्हणजे बारा बोड्याचा माणूस. खप्पड गाल, चेहऱ्यावरचं मास झडून गेलेलं, त्यामुळे कोरड्या कवटीला जून कातडं घट्ट चिटकवल्या सारखा तो दिसायचा. अंधारात काय, उजेडात सुद्धा, नवखा माणूस घाबरून जायचा. वय जनरीतीला धरून, वर्षात मोजल तर पासष्ठीला एक वर्ष कमी, आणि त्याला विचारलं तर---! नका ना विचारू त्याला.
का?
पहा विचारून!
'किती असेल हो तुमचं वय?'
' कशाला? पोरगी लग्नाची आहे का? माझी तयारी आहे! तिला विचारून ये!'
मदतनीस!
त्यांनी सभोतालच्या पुस्तकावरून नजर फिरवली. अभिमानाने! आणि का नसावा अभिमान? इतकी संपदा लिहायला, इतर लेखकांना चार जन्म घ्यावे लागतील! पाच पन्नास 'चारोळ्या' किंवा 'कविता' लिहल्या कि, यांचं 'कवित्व' कोरड पडत. चार मासिकात (हो, या जमान्यात दिवाळी शिवाय कोणी छापत नाही. सगळं ऑन लाईन!) दोन कथा आल्याकी शेफारून जातात! 'मी लेखक - मी लेखक' म्हणून ढोल पिटून घेतात. आपल्या सारख्या शेकड्याने कथा आणि चाळीशीच्या आसपास कादंबऱ्या लिहणाऱ्या, लेखकाने 'अभिमान' बाळगू नये तर काय करावे?
डिकोस्टा!
परदेशातला, बहुदा त्यागराजचा हा शेवटचा प्रोजेक्ट होता. तो सध्या वयाच्या पन्नाशीच्या टप्यात होता. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या आजून दक्षिणेला, श्रीलंकेच्या आधिपत्यातल्या, एका नगण्य बेटावर, तो प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आला होता. या खडकाळ आणि डोंगराळ बेटावर काही ब्रिजेस बांधायची होती. भारतातल्या कॉन्स्ट्रक्शन कंपनीने त्याला पाठवले होते. याला दोन कारणे होती. एक तर तो सडाफटिंग होता. कुटुंब बायका पोर! काही पाश नव्हते. कारण त्याचा 'कुटुंब' व्यवस्थेवर अजिबात विश्वास नव्हता. आजाद पंछी! सुख पैशात खरेदी करता येतात, हे याच जगाने, त्याला शिकवले होते. आणि दुसरे कारण त्याची भटकंतीची हौस!
रघु अण्णांचा उद्योग!
रघु अण्णांचा उद्योग!
कोकणच्या एका आडबाजूच्या वाडीतील, रघु नाईकचा वाडा आज मोठा प्रसन्न दिसत होता. अन का दिसू नये? चार दिवस झाले होते, त्याची लेक, जावई आणि बिट्ट्या, गोड नातू आले होते. एरवी गोदाआक्का आणि रघुआण्णा दोघेच रहायचे. त्यामुळे एक उदासवाणी शांतता तेथे नांदायची.
हिरव्या पोपटी शालूवर, एखादी केशरी आंगठी ठेवावी तस वाड्याचं कौलारू छत, लांबून दिसत होत.