भूमिका
"आता आवाज येतोय ना नीट ? ओरडून ओरडून बसलेला "
"हो येतोय,काहीच प्रॉब्लेम नाही"
"हा ते वाक्क्य बोलेल ना, तिथे मग मी 'अच्छा' म्हणेन आणि पुढचं वाक्क्य घेईन,असं चालेल ना ?"
"हा,असच पाहिजे,काही नाही ग निवांत कर,बिनधास्त कर,होतंय सगळं नीट"
"ए ऐक ना,इथं बोलत नका बसू,आपल्या आधीची संपेल आता,५ मिनटात आहे आपली,
सगळं नेपत्थ्य आलंय ? घरातलं,स्टुडिओतलं ?"
"हो,आलंय"
"ओके,प्रत्त्येकानं आपापली प्रॉपर्टी बघा आपल्यासोबत आहे का ते,ठीके ? चान्गलीच होणारे आपली,मस्त प्रॅक्टिस झालंय सगळ्यांचं ! ऑल द बेस्ट सगळ्यांना !"
"थँक यु"