:गटणे काका mode चालू :
जीवनाच्या समरात असे प्रसंग येतात की एखाद्या व्यक्तीकडून आपण गृहीत धरलेली साधी अपेक्षा पूर्ण होतं नाही आणि समोर भलतंच वास्तव आ वासून उभं राहतं.
असं झालं की घायाळ होणं आलंच. मनावरचे हे ओरखडे कालांतराने पुसट झाले तरी त्याची खूण राहतेच!
याउलट कधी कधी अजिबात अपेक्षा नसताना आनंदाच्या सुखद सरी कोसळू लागतात आणि आपण त्यात चिंब न्हाऊन निघतो.
:गटणे काका mode बंद :
तुमच्यासोबत कधी असं घडलंय का?
चला तर मग आपापले वास्तविक, काल्पनिक, मित्र मैत्रिणींचे, शेजार पाजाऱ्यांचे अनुभव येथे लिहूयात.
- (अर्धशतक शब्दकथा)
"त्याने सतत तुझाच विचार करत रहावं अशी इच्छा आहे का तुझी ?"- ती जरा घुश्श्यातच प्रश्नार्थी झाली,
"अजिबात नाही; त्याने निदान तसं भासवू तरी नये, इतकीच अपेक्षा आहे माझी" - ती हि निश्चयाने उत्तरली.
तिच्या त्या उत्तराने 'हरवलेली ती पुन्हा सापडली' या आनंदाने'; आरशातली 'ती'ही सुखावली.
.....मयुरी चवाथे-शिंदे
बागेश्री ती तिच्या दुनियेत मग्न राहायची. ती स्वच्छंदी असल्यामुळे सगळ्या सोबत रमायची. पण आजोळी यायला टाळायची आप्पा मुळे. आप्पाच्या फटकळ वागण्यामुळे तिला इथे करमायचे नाही. आनंद आपल्या लाडक्या भाचीला आणि बहिणीला घेण्यासाठी स्टेशन वर आला होता. आप्पा खुप आनंदात होते. आज दिवाळी निमित्त घरी पाहुणे आले होते. नातवंडे, पाहुणे, सुना, मुला मध्ये आप्पाचा जीव रमायचा. आप्पाची मुलगी वसुधा सुद्धा आपल्या मुलीला बागेश्रीला सोबत घेऊन आली होती. तसे बागेश्रीचे जास्त काही जमायचे नाही आजोबा सोबत पण आईच्या आग्रहा खातर ती आली होती. पण या वेळेस बागेश्री आप्पा आनंदी वाटले नाहीत.
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे.
श्री गणरायाच्या आगमनाच्या तयारीत मग्न असतानाच एकीकडे चाहूल लागते दिवाळीची आणि अर्थातच दिवाळी अंकाची.
हितगुज दिवाळी अंकाचं यंदाचं हे तेरावं वर्ष. या वर्षीचा दिवाळी अंकदेखील आजवरच्या मायबोलीच्या वाचनीय दिवाळी अंकाच्या परंपरेला साजेसा असावा, हीच तुम्हां-आम्हां प्रत्येक मायबोलीकराची इच्छा! 'वाचकांच्या पसंतीस उतरेल' असा दिवाळी अंक प्रकाशित करण्याच्या कामात सर्वात मोलाचा सहभाग हा अर्थातच आपणा वाचकांचाच ...