अपेक्षा

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 10 May, 2019 - 06:47

- (अर्धशतक शब्दकथा)

"त्याने सतत तुझाच विचार करत रहावं अशी इच्छा आहे का तुझी ?"- ती जरा घुश्श्यातच प्रश्नार्थी झाली,

"अजिबात नाही; त्याने निदान तसं भासवू तरी नये, इतकीच अपेक्षा आहे माझी" - ती हि निश्चयाने उत्तरली.

तिच्या त्या उत्तराने 'हरवलेली ती पुन्हा सापडली' या आनंदाने'; आरशातली 'ती'ही सुखावली.

.....मयुरी चवाथे-शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

अज्ञातवासी- प्रेमात किंवा नात्यात अडकलेल्या, 'स्व'ला विसरलेल्या स्त्रीचा स्वसंवाद आहे हा.

मयुरी धन्यवाद!
या दृष्टिकोनातून बघितली आणि आवडली....