Submitted by किल्ली on 29 September, 2021 - 13:39
:गटणे काका mode चालू :
जीवनाच्या समरात असे प्रसंग येतात की एखाद्या व्यक्तीकडून आपण गृहीत धरलेली साधी अपेक्षा पूर्ण होतं नाही आणि समोर भलतंच वास्तव आ वासून उभं राहतं.
असं झालं की घायाळ होणं आलंच. मनावरचे हे ओरखडे कालांतराने पुसट झाले तरी त्याची खूण राहतेच!
याउलट कधी कधी अजिबात अपेक्षा नसताना आनंदाच्या सुखद सरी कोसळू लागतात आणि आपण त्यात चिंब न्हाऊन निघतो.
:गटणे काका mode बंद :
तुमच्यासोबत कधी असं घडलंय का?
चला तर मग आपापले वास्तविक, काल्पनिक, मित्र मैत्रिणींचे, शेजार पाजाऱ्यांचे अनुभव येथे लिहूयात.
Expectation vs reality
बघू कोणी कोणी अपेक्षा भंगाचा कडू रस पचवलाय आणि कुणाकुणाला मस्त surprizes मिळाली आहेत
....
तळटीप :
धागा विरंगुळा ग्रुपात आहे, मजेदार प्रतिसाद येतील अशी अपेक्षा आहे बघूया वास्तव काय असेल!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सॉरी किल्ली सुरुवात
.
Expectation:
Expectation:
"सुन" "सूना"
"आती क्या खंडाला?"
Reality:
"सुन" "सूना"
"अ function at() { [native code] }इ क्या खंडाला?"
(And then we wonder... पूर्वी मायबोलीवर लग्न जुळायची म्हणे... )
सी कसं सुचतं गं ?
सी कसं सुचतं गं ?
अपेक्षा - बँक खातं फुगत चाललय
अपेक्षा - बँक खातं फुगत चाललय आणि आपण रोडावत.
अनुभव - बरोब्बर उलटे
function at() { [native code]
function at() { [native code] }
गूगल इंडिक कीबोर्ड वापरला तर असले प्रकार होत नाहीत।
कुणीतरी गेलेलं दिसतंय हं
कुणीतरी गेलेलं दिसतंय हं खंडाळ्याला गूगल इंडिक कीबोर्ड वापरून.....
का खंडाळ्याला जाऊन कीबोर्ड
का खंडाळ्याला जाऊन कीबोर्ड वापरला ?
सामो तुमची पोस्ट का बरे खोडली
सामो तुमची पोस्ट का बरे खोडली? चालली असती..
सी ताई
"अ function at() { [native
"अ function at() { [native code] }इ क्या खंडाला?">>>>> हा अनुभव सिमंतीनीला पण आला ? मला वाटले माझ्याच कडे काहीतरी गंडलेय.
अपेक्षा - वॅक्सीन उपलब्ध
अपेक्षा - वॅक्सीन उपलब्ध झाल्यावर इथली जनता उड्या मारत जाऊन लसवंत होईल
वास्तव - इथल्या अनेक लोकांना कोविड ही एक अफवा आहे आणि लस घेणं हे अंधश्रद्धेला खतपाणी देणं आहे असे वाटत आहे.
हा अनुभव सिमंतीनीला पण आला ?
हा अनुभव सिमंतीनीला पण आला ? >> इश्श, नाही ... तुमच्या दाजींना कांदेपोहे खाऊ घालण्यात दिवस कसे गेले ते कळलंच नाही...
(No subject)
अनुभव सिमंतीनीला पण आला ? >>
अनुभव सिमंतीनीला पण आला ? >> इश्श, नाही ... तुमच्या दाजींना कांदेपोहे खाऊ घालण्यात दिवस कसे गेले ते कळलंच नाही... Wink>>>
सगळ्यांच्या पोस्ट
नवरा पंधरा-वीस दिवसांसाठी
नवरा पंधरा-वीस दिवसांसाठी परदेशी जाणार कळल्यावर मनात अगदी कस्सं बाई काय बाई! कित्ती त्याला मिस्स करणार, आपलं कस्सं होणार वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात तो गेल्यावर तसं काहीच न वाटणे.. एक दोन दिवस फक्त चुकल्याचुकल्यागत वाटणे आणि मग रिकाम्या घराचा आनंद लुटणे... ऑफिस-बिफिस चा रगाडा नसल्याने कामाच्या बायांना सुट्ट्या देऊन वाट्टेल ते, वाट्टेल त्या वेळी आणि वाट्टेल तितके करणे, खाणे, झोपणे, नेटफ्लिक्स पाहाणे...
तुमच्या दाजींना कांदेपोहे खाऊ
तुमच्या दाजींना कांदेपोहे खाऊ घालण्यात दिवस कसे गेले ते कळलंच नाही... Wink>> हि पोस्टपण कुणा कुणासाठी अपेक्षाभंग आणि वास्तव यात बसू शकेल (कडू रस की सरप्राईझ ज्याचं त्याने ठरवा )
सगळ्या posts
सगळ्या posts
अपेक्षा : ( स्टोअरच्या
अपेक्षा : ( स्टोअरच्या मालकिणीच्या) ही असेल ह्याची काकु , मावशी आत्या वगैरे वगैरे...
वास्तव : हा माझा बायको "पार्वती"
पलवली(जोडाक्षर लिहिता येत
पलवली(जोडाक्षर लिहिता येत नाहीये गुगल वर)
आमच्याकडे पाठवून द्या लशी. आम्ही वापरू
हा माझा बायको "पार्वती" >>
हा माझा बायको "पार्वती" >> दोन सुलट , चार उलट
अपेक्षा - आज फ्रायडे आहे, लवकर काम संपवून कलटी मारू. मूवी+डिनर
वास्तव- संध्याकाळी ४ वाजता - critical customer escalation
आपल्या वाढदिवशी नवरा काहीतरी
आपल्या वाढदिवशी नवरा काहीतरी भेट देईल अश्या आशेवर असतो. संध्याकाळी घरी यायला त्याला उशीर होतो तेव्हा तर खात्रीच पटते गिफ्ट ची. दारात बघते तर त्याच्या हातात शॉपिंग च्या पिशव्या ही दिसतात. उत्सुकतेने आपण अगदी अधीरतेने घेतो त्याच्या हातातून त्या पिशव्या. उघडल्यावर मात्र पार पोपट होतो आपला. त्याच्याच कपड्यांचे खोके असतात सगळे. वरती बुमारँग ही येतं अंगावर , मी आणलेलं तुला काही पसंत पडत नाही , सगळं बदलून आणतेस म्हणून पडलोच नाही त्या भानगडीत ...
अश्या तऱ्हेने मस्त साजरा होतो आपला वादि.
बुधवार सकाळी 8 वाजता : किती
बुधवार सकाळी 8 वाजता : किती पसारा झालाय कपाटात , आयत्यावेळी एक गोष्ट सापडत नाही. आता धावपळीत एकेक काम वाढतं . किती वेळ गेला शोधाशोधीत.आवरायला पाहिजे कपाट शनिवारी.
शनिवार दुपारी 3 वाजता : शनिवार अर्धा दिवस स्वयंपाक बनवण्यातच जातो. थकायला झालं.एक आरामाचा दिवस मिळतोय .जरा लोळूया. काम काय नेहमीच.
स्वस्ति अगदी अगदी.
स्वस्ति अगदी अगदी.
पार्वती
किल्ली पहील्याचह प्रतिसादाने मूड बनू नये म्हणुन डिलीट मारला. शिवाय फारच तिखट झालेला तो प्रतिसाद. इतनाभी नही है
मी आणलेलं तुला काही पसंत पडत
मी आणलेलं तुला काही पसंत पडत नाही >>> हे मात्र खरे आहे. मी आजवर बायकोला एकही गिफ्ट घेतले नाही शहाणपणा करून. तुम्ही जश्या एक्प्सेक्टेशन्स वाढवत जाणार तितकी रिअॅलिटी त्यापासून दरवेळी दूर पळणार
केस वाढवताना....
केस वाढवताना....
एक्पेक्टेशन्स
.
आणि रिअॅलिटी - https://www.maayboli.com/node/80232
विरंगुळामधे आहे म्हणून मला
विरंगुळामधे आहे म्हणून मला अगदी अगदी वाटणारे मीम्स, कायप्पावरून साभार.
*
*
*
बापरे ती बाहुली केक बघून मी
बापरे ती बाहुली केक बघून मी गडबडा लोळले.
(No subject)
अस्मिता हे लय भारी ए
अस्मिता हे लय भारी ए
(No subject)
नेल्डइट नावाचा शो बघा
नेल्डइट नावाचा शो बघा नेफ्लिवर.
अशीच भारी रेस्पी नवख्या लोकांना करायला सांगुन त्याचं भजं झालं की हसायचं असतं. मजा येते.
Pages