:गटणे काका mode चालू :
जीवनाच्या समरात असे प्रसंग येतात की एखाद्या व्यक्तीकडून आपण गृहीत धरलेली साधी अपेक्षा पूर्ण होतं नाही आणि समोर भलतंच वास्तव आ वासून उभं राहतं.
असं झालं की घायाळ होणं आलंच. मनावरचे हे ओरखडे कालांतराने पुसट झाले तरी त्याची खूण राहतेच!
याउलट कधी कधी अजिबात अपेक्षा नसताना आनंदाच्या सुखद सरी कोसळू लागतात आणि आपण त्यात चिंब न्हाऊन निघतो.
:गटणे काका mode बंद :
तुमच्यासोबत कधी असं घडलंय का?
चला तर मग आपापले वास्तविक, काल्पनिक, मित्र मैत्रिणींचे, शेजार पाजाऱ्यांचे अनुभव येथे लिहूयात.
साधा भोळा चेहरा होता चांगल्यापैकी गुण होते
जगाच्या बाजारामध्ये यातले काहीच चालणार नव्हते
कपडे अगदी साधे होते बूट काय ते माहीत नव्हते
दुर्लक्षाचे कटाक्ष त्यामुळे अंगावर मात्र पडत होते
वशिल्याची काही तट्टे होती त्यांचे मात्र बरे होते
दाखवण्यापुरते त्यांना नाटक फक्त करायचे होते
फिरणारे काही दलाल होते दादासारखे वावरत होते
आणि मालवाल्या धेंडाकडे आशेने तर बघत होते
साधे अर्ज टोपलीत होते नाटक पूर्ण झाले होते
गल्लाभरुंच्या जमान्यामध्ये धंदे सगळे जोरात होते
झेप ही उत्तुंग
नभी गवसणी |
विसरली गाणी
भुईतली ||
स्वनामात दंग
वरलिये रंग |
आप्तांचे अभंग
दुभंगले ||
सांगू जाता कोणी
आळूवर पाणी |
स्वमग्न अंतरी
शिरेचिना ||
- संदीप मोघे
08989160981
Sandeep.moghe@yahoo.com