"स्वत:चे ठेवायचं झाकून अन दुसर्याच बघायचं वाकून"ही म्हण आपल्याला माहित आहे. यात आपल्या त्रुटी/चुका/विसंगती झाकून ठेवायच्या व दुसर्याच्या चुका/ त्रुटी/विसंगती याबद्दलच फक्त बोलायच असाही एक अर्थ अभिप्रेत आहे.
राजकारणामधे जेव्हा सत्तारुढ वा विरोथी पक्षाकडून काही भूमिका मांडल्या जातात त्यावेळी त्याची समाजमाध्यमातही चर्चा होते. एकमेकांच्या चुका दाखवण्यात पक्षीय विचारवंत हिरिरीने वाद घालतात. नैतिक, राजकीय,सामाजिक,कायदेशीर,सांस्कृतिक अशा विविध पैलूंवर ही चर्चा होत असते. समाजमाध्यमातून हे खंडन मंडन चालू असते. आपल्याच पक्षातील एखाद्या नेत्याचे,अनुयायाचे,कार्यकर्त्याचे वर्तन जेव्हा आपल्या पक्षाच्या भूमिकेशी विसंगत असते त्यावेळी पक्षीय विचारवंत त्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करतात. कधी कधी चक्क कानउघाडणी करतात. याला मग वर्तमानपत्रात 'अमुक तमुक यांना घरचा आहेर' अशी बातमी येते.
राजकीय पक्ष वा संघटना हे एक विशाल कुटुंब असते.आपल्याच कुटुंबातील लोकांबद्दल का सार्वजनिक नाराजी व्यक्त केली जाते? कारण तुम्ही सार्वजनिक व्यासपीठांवर सार्वजनिक प्रश्नांबद्दल काही प्रबोधनपर भूमिका घेतलेली असते. त्याच्याशी विसंगत वर्तन जेव्हा आपल्याच कुटुंबातून होते त्यावेळी सार्वजनिक रित्या नाराजी व्यक्त करावी लागते. नाहीतर लोका सांगे ब्रह्म ज्ञान आपण कोरडे पाषाण अशी स्थिती होते. तुमची व तुमच्या कुटुंबाची भूमिका वेगळी असू शकते हे समाजाला अजून पटत नाही. राजकीय पक्षाची,संघटनेची भूमिका व कार्यकर्त्याचे त्याच संबंधीचे वर्तन यात विसंगती असू शकते. पण जेव्हा त्यामुळे राजकीय वा सामाजिक वाटचाली मधे ही मोठ्या प्रमाणात अडथळा आणणारी बाब ठरते त्यावेळी एकतर त्या कार्यर्कत्याला/ नेत्याला पक्षातुन काढून टाकले जाते किंवा तो नेता वा कार्यकर्ता पक्षांतर्गत शिस्त या नावाखाली घुसमट झाल्याने स्वत:हून आपला पक्ष, संघटना बदलतो व त्याच्या भुमिकेशी सुसंगत वाटेल अशा पक्षात वा संघटनेत जातो अथवा स्वायत्त राहतो.
पोलिस, लष्कर इत्यादी शिस्त प्राधान्य खात्यात खात्यांतर्गत शिस्त हा नावाखाली घुसमट होते. मग सहन ही होत नाही व सांगताही येत नाही अशी अवस्था होते. त्यामुळे इथे आत्महत्यांचे प्रमाण देखील अधिक आहे.
थोड्याबहुत प्रमाणात अशा गोष्टी आपल्याही कुटुंबात घडत असतात.
घरचा आहेर
Submitted by प्रकाश घाटपांडे on 29 May, 2024 - 05:36
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजची लोकसत्तामधील या
आजची लोकसत्तामधील या विषयावरील बातमी
जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्याने छगन भुजबळांना घरचा आहेर; हसन मुश्रीफ म्हणाले, “मनुस्मृतीचा विषय बाजूला पडेल…”
इथे लोक अमेरिकन झेंडा
इथे लोक अमेरिकन झेंडा घराबाहेर लावतात. मध्यंतरी कोणत्या तरी जजने , अमेरीके चा झेंडा मुद्दाम उलटा लावला होता. अप साईड डाउन. त्याबद्दलही टिका झालेली होती.
जजने से वागू नये असे वाटाते.
मी बातमी पूर्ण वाचलेली नाही. तेव्हा कोणत्या गोष्टीचा निषेध म्हणुन त्याने असे वर्तन केले ते काही माहीत नाही.
पॉइन्ट हा आहे की प्रोफेशनल व पर्सनल हे दोन स्फिअर्स आहेत. निदान जजने डेकोरम राखावे असे वाटलेले मात्र.